Ladki Bahin Yojana Registration Step-by-step guide  esakal
महाराष्ट्र बातम्या

लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला पण सबमिट झाला नाही का? "In Pending To Submitted" असा पर्याय दिसत असेल तर ही बातमी वाचा

Sandip Kapde

Ladki Bahin Yojana Application Form:

महायुती सरकारने सुरु केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने'ला राज्यभरातून तुफान प्रतिसाद मिळत आहे. योजनेची नोंदणी सुरु झाल्यापासून अवघ्या २५ दिवसांत १ कोटी ८० लाखांहून अधिक अर्ज सादर झाले आहेत. ३० ते ४० वयोगटातील महिलांचे अर्ज मोठ्या प्रमाणात आले आहेत, त्यात वैवाहिक, घटस्फोटीत, आणि अविवाहित महिलांची संख्याही लक्षणीय आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक अर्ज दाखल झाले आहेत तर वाशिम जिल्ह्यात सर्वात कमी नोंदी आहेत.

नारीशक्ती दूत ॲपमुळे सोपी प्रक्रिया-

नारीशक्ती दूत या ॲपमुळे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जलद आणि सोपी झाली आहे. या ॲपमधून दररोज ७ ते ८ लाख अर्ज सादर होत आहेत आणि आतापर्यंत ८८ लाख डाऊनलोड्स झाले आहेत. प्रत्येक मिनिटाला या ॲपचे ८०० डाऊनलोड्स होत असून, प्रत्येक मिनिटाला ६५० अर्ज सादर केले जात आहेत.

अर्ज सबमिट का झाला नाही?

काही अर्जदारांना अर्ज सबमिट झाली की नाही याबाबत चिंता आहे. अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जासमोर "In Pending To Submitted" असा पर्याय दिसत असेल तर घाबरु नका. हे म्हणजे तुमचा अर्ज नामंजूर झाला नाही. अर्ज सबमिट झाला आहे आणि आता वरिष्ट पातळीवर अधिकारी अर्जाची पडताळणी करतील. अर्ज मंजूर की ना मंजूर हे नंतर कळेल.

अर्जाचे स्टेटस कसे चेक करावे-

अर्जाचे स्टेटस चेक करण्यासाठी अर्ज भरल्यानंतर स्क्रीनवर उजव्या हाता "i" हा चिन्ह दिसत असेल तर त्यावर क्लिक करा. तुम्हाला तुमच्या अर्जाचे स्टेटस चेक करता येईल. (ladki bahin yojana status pending)ladli behna yojana last date

SMS Verification Done-

अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला "SMS Verification Done" हा पर्याय दिसत असेल तर तुमच्या अर्जाची पडताळणी झाली आहे.

अर्ज दुरुस्त करण्याची संधी-

तिसरा पर्याय "Edit" चा आहे. तुम्ही तुमचा अर्ज दुरुस्त करुन पुन्हा सबमिट करु शकता.

ऑनलाईन आणि ऑफलाइन अर्ज प्रक्रिया-

आतापर्यंत १ कोटी ३० लाख ऑनलाईन आणि ५० लाख ऑफलाइन अर्ज सादर झाले आहेत. या योजनेसाठी सरकारने २ कोटी ते २.५ कोटी महिला पात्र ठरतील असे उदिद्ष्ट ठेवले आहे. आज ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत आलेले अर्ज स्वीकारण्यात येतील.

पैसे कधी मिळणार?

अर्ज केलेल्या ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली असेल अशा कोट्यवधी महिलांच्या बँक खात्यात येत्या १७ ऑगस्ट २०२४ रोजी जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून ३,००० रुपये जमा होतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna Accident: भीषण दुर्घटना! जालना-वडीगोद्री मार्गावर एसटी बस अन् ट्रकची टक्कर, ५ जणांचा मृत्यू

ही वाट्टेल तशी खेळते आणि... मीरा जग्गनाथने अंकितावर साधला निशाणा; पण नेटकऱ्यांनी घेतली तिचीच शाळा

ENG vs AUS 1st ODI : २५ चेंडूंत ११० धावा! Travis Head ला रोखणं झालंय अवघड; ख्रिस गेल स्टाईल सेलिब्रेशन

Share Market Opening: शेअर बाजाराची दमदार सुरुवात; निफ्टी 25,500च्या वर, मिडकॅप निर्देशांक तेजीत

Assembly Election : राजू शेट्टी, संभाजीराजेंसमोर 'होमपीच'वरच आव्हान; उमेदवार ठरवताना तिसऱ्या आघाडीची लागणार कसोटी

SCROLL FOR NEXT