Ladki Bahin Yojna esakal
महाराष्ट्र बातम्या

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा लाभ अमृता फडणवीसांनाही; रक्षाबंधनादिवशी झाला नव्या नात्याचा जन्म

Amruta Fadnavis: नागपुरात दिव्यांग बांधवांसोबत रक्षाबंधनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर माध्यमांशी बोलताना अमृता फडणवीस पुढे म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस यांनी बहिणींच्या रक्षणसाठी लाडकी बहीण योजना आणली आहे. या योजनेतून त्यांचा कसलाही राजकीय दृष्टीकोन नाही.

संतोष कानडे

Devendra Fadnavis: लाडकी बहीण योजनेवरुन सत्तापक्षाने मोठी राजकीय खेळ केल्याचं दिसून येत आहे. मागच्या आठवड्यापासूनच या योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये थेट जमा होत आहेत. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला महिलांना पैसे मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे. तिकडे नागपूरमध्ये तर अमृता फडणवीस यांना या योजनेचा वेगळाच फायदा झालाय.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला. फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजप दिव्यांग आघाडीकडून रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. अमृता फडणवीस यांच्यासह भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी दिव्यांग बांधवाना राखी बांधली.

यावेळी अमृता फडणवीसांनी भावना व्यक्त करताना लाडकी बहीण योजनेमुळे आपल्याला राज्यात भावजयी मिळाल्या असल्याचं म्हटलंय. त्या म्हणाल्या की, माझं आता राज्यातल्या बहिणींसोबत नणंद-भावजयीचं नवीन नातं जोडलं आहे.. हे नवीन नातं आहे. आपण एकमेकांचे सुख-दुःख वाटून घेऊ, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीसांनी दिली.

नागपुरात दिव्यांग बांधवांसोबत रक्षाबंधनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर माध्यमांशी बोलताना अमृता फडणवीस पुढे म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस यांनी बहिणींच्या रक्षणसाठी लाडकी बहीण योजना आणली आहे. या योजनेतून त्यांचा कसलाही राजकीय दृष्टीकोन नाही.

अमृता फडणवीस म्हणतात...

''लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना कोट्यवधी बहिणी लाभल्या आहेत. त्यामुळे मलाही तेवढ्याच नणंद लाभल्या आहेत. आमचं नवीन नणंद-भावजयीचं नातं सुरू झालंय.''

त्या पुढे म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस यांच्या पारदर्शकपणावर, प्रामाणिकपणावर विरोधक शंका घेत आहेत. याआधी सुरू केलेल्या जलयुक्त शिवारसारख्या अनेक चांगल्या योजनांवरही विरोधकांनी टीका केली होती. त्यामुळे ते आताही टीका करत आहेत.

''सरकारने चांगल्या हेतूने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. ती पुढेही सुरू ठेवतील.. त्यात आवश्यक वाढ करतील अशी अपेक्षा आहे. मी आधी माझ्या दोनच भावांना राखी बांधायचे आता दिव्यांग बांधवाना राखी बांधत आहे, त्यामुळे मला विशेष आनंद आहे.'' अशा भावना त्यांनी शेवटी व्यक्त केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT