महाराष्ट्र बातम्या

Ladki Bahin Yojna: शिंदेंची वेगळीच खेळी; महाराष्ट्राच्या नकाशातूनच अजित पवारांचा फोटो गायब, लाडकी बहीण योजनेवरुन राजकारण पेटलं

संतोष कानडे

Ajit Pawar: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवाद सुरु झाला आहे. अजित पवारांनी त्यांच्या प्रचारसभांमध्ये केवळ स्वतःचा फोटो वापरुन मुख्यमंत्री हा शब्द गायब केला होता. त्यामुळे शिवसेनेकडून संताप व्यक्त झाला होता.

त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या गटाने अजित पवारांचा फोटो गायब केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर योजनांचा देखावा उभा करण्यात आलेला आहे. या देखाव्यातून अजित पवार यांचा फोटो गायब आहे. अजित पवार यांच्याऐवजी श्रीकांत शिंदे यांचा फोटो वापरण्यात आलेला आहे.

ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या माहिती देखाव्यात केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो आहेत. महाराष्ट्रातील देखाव्यातही देखील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि श्रीकांत शिंदे यांचा फोटो आहे. अजित पवार यांचा फोटो केवळ वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या पोस्टरवर झळकत आहे.

ड्रीम प्रोजेक्ट, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आणि महाराष्ट्रच्या नकाशातून देखील अजित पवार गायब झाल्याने श्रेयवादाचं राजकारण पेटल्याचं दिसतंय. अगोदर अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना डावलण्याचा प्रयत्न केला. आता मुख्यमंत्र्यांकडून अजित पवारांना बाजूला लोटण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.

मुख्यमंत्री म्हणाले मीच टीमचा कॅप्टन

६ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रेयवादाच्या लढाईवर उत्तर दिलं होतं. 'साम टीव्ही'वरील मुलाखतीदरम्यान ते बोलतो होते. मुख्यमंत्री म्हणाले की, सरकारने सर्वसामान्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा विचार करुन अनेक योजना आणल्या आहेत. मला काय मिळतंय, यापेक्षा सर्वांना काय मिळतंय, हे आमचे विचार आहेत. लाडकी बहीण योजनेमध्ये शेवटी मुख्यमंत्री हाच टीमचा कॅप्टन आहे.. पण श्रेय बहिणींचे आहे.

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, आमचे टीमवर्क आहे. राज्याचा विकास, लोकांना न्याय, हेच आमचे काम आहे. कामाची पोचपावती लोक देतीलच. पण दिल्लीच्या गल्ली-गल्लीत मला चेहरा करा, असे बोलणारे आहेत. आम्ही जादू नाही काम करतो. चोविस तास काम करतो, दहा वर्षांमध्ये एक दिवस पण सुट्टी घेत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs BAN 1st Test : R Ashwin चा वर्ल्ड रेकॉर्ड! एकाही ऑल राऊंडरला हे जमलं नाही, जे 'अण्णा'ने केलं; ४ भारी विक्रम

The Sabarmati Report : 'द साबरमती रिपोर्ट' रिलीजची तारीख ठरली या दिवशी होणार चित्रपट रिलीज !

Chandrayaan 4 Budget : अवकाश मोहिमांना मोदी सरकारने दिले बळ; चांद्रयान-४ अन् ‘गगनयान’सह शुक्राच्या अभ्यासासाठी किती कोटींचं बजेट मंजूर?

Congress : वादग्रस्त वक्तव्य भोवलं! 'या' बड्या नेत्याची काँग्रेसमधून हकालपट्टी, रेड्डींवर अध्यक्षपदाची जबाबदारी

Latest Marathi News Live Updates : नंदूरबार येथे माळीवाडा परिसरात दोन गटात तुफान दगडफेक

SCROLL FOR NEXT