महाराष्ट्र बातम्या

Ladki Bahin Yojna: 'या' तारखेला येणार लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता; मंत्री तटकरे यांची माहिती

संतोष कानडे

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते एकत्रित जमा झाले होते. आता पुढच्या हप्त्याची लाभार्थी महिलांना प्रतीक्षा आहे. आता तिसऱ्या हप्याची तारीख जाहीर झाली आहे.

२९ सप्टेंबर रोजी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा होणार आहे. रायगडमध्ये योजनेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं असून तेव्हाच २ कोटी महिलांना तिसरा हप्ता वितरित करण्यात येईल, असं मंत्री आदिती तटकरे यांनी सोमवारी सांगितलं.

आदिती तटकरे म्हणाल्या की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा कार्यक्रम २९ सप्टेंबर रोजी रायगडमध्ये होणार आहे. २९ तारखेला तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम होत असून सप्टेंबरपर्यंत आलेल्या अर्जांचे लाभ वितरित करण्यात येतील.

त्या पुढे म्हणाल्या, ज्या महिलांना स्क्रूटिनीमुळे अद्याप लाभ प्राप्त झाला नाही त्यांचे सर्व लाभ दिले जाणार आहेत. २ कोटी महिलांना लाभ दिले जाणार असून लाभार्थ्यांची प्रतीक्षा संपणार आहे.

दोन हप्त्यांचा एकत्रित लाभ

ज्या महिलांना अर्ज भरण्यास विलंब झाला होता, त्या महिलांना ऑगस्ट आणि सप्टेंबरचे एकत्र तीन हजार रुपये सप्टेंबर महिन्याच्या शेवटी मिळणार आहेत, अशी माहिती रविवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील एका कार्यक्रमात दिली होती.

लाभार्थ्यांसाठीचे निकष

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवाशी महिलांनाच दिला जातो

  • योजनेचा लाभ केवळ त्या महिलांनाच मिळेल ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे.

  • 21 ते 65 वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात

  • जर महिलेच्या कुटुंबातील कोणतीही सदस्य सरकारी नोकरीत असेल किंवा कर भरत असेल तर त्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Badlapur School Crime: आरोपी अक्षय शिंदेनं पोलिसांच्या बंदुकीतून स्वतःवर झाडली गोळी! नेमकं काय घडलंय? जाणून घ्या

BMC New Advertisement: मुंबई महापालिकेच्या 1,846 लिपिकपदांसाठी निघाली नवी जाहिरात; 'ती' अट झाली रद्द

Irani Cup 2024: अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपदाची जबाबदारी; शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यरलाही मिळणार संघात संधी

Israel-Hezbollah Conflict: इस्त्रायलचा लेबनॉनवर मोठा हल्ला, सुमारे 50 लोक ठार, 300 हून अधिक जण जखमी

Girish Mahajan: फर्दापूरचं रेस्ट हाऊस अन् दारुचा बॉक्स; खडसे-महाजन भांडणाचं कारण आलं समोर! गोपीनाथ मुंडेंना करावी लागली होती मध्यस्थी

SCROLL FOR NEXT