लता मंगेशकर यांचे डॉक्टरांना पत्र ई सकाळ
महाराष्ट्र बातम्या

लतादीदी नगरच्या डॉक्टरला म्हणाल्या, सदा सुखी रहा...

वांद्रे-कुर्ला संकुलातील कामाबद्दल पत्राद्वारे केले कौतुक

सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकारातून वांद्रे-कुर्ला संकुलात २ हजार २०८ रूग्ण क्षमतेचे कोविड सेंटर (covid center) आहे. त्या केंद्राचे प्रमुखपद रेणवडी (ता.पारनेर) येथील डॉ.राजेश डेरे यांच्याकडे आहे. दिवस-रात्र ते काम करीत आहेत. आतापर्यंत २२ हजार रूग्ण तेथे उपचार घेऊन कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांच्या कार्याचे बॉलीवूडमधील सेलिब्रेटी तसेच अनेक राजकीय नेत्यांनी कौतुक केले आहे. (Lata Mangeshkar's letter to Ahmednagar doctor)

मुंबईत कोरोनाच्या पहिल्या लाटेत रूग्णसंख्या वेगाने वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एमएमआरडीएच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या कोविड समर्पित रूग्णालयाचे मुंबई महानगर पालिकेच्या माध्यमातून हस्तांतरण करण्यात आले. तेथे २ हजार २०८ रूग्ण क्षमता आहे. या जम्बो कोविड सेंटरमध्ये ८६८ क्षमतेचे ऑक्सिजनसहीत डायलेसीससाठी १२ बेड उपलब्ध आहेत.

आतापर्यंत २२ हजार ७३८ रूग्ण येथुन मोफत उपाचार घेऊन कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. याच ठिकाणी लसीकरण कक्षही करण्यात आला आहे. येथून दोन लाख ३१ हजार २१४ नागरिकांना आतापर्यंत लसीकरण करण्यात आले आहे. एकूण ३७८ डॉक्टर, ३९९ परिचारिका, ५१३ वार्ड बॉय तेथे काम करीत आहेत.

डॉ. डेरे हे या कोविड सेंटरच्या प्रमुख पदाच्या माध्यमातून ही सर्व व्यवस्था चोखपणे सांभाळत आहेत. डॉ. डेरे हे मुंबई मधील सात हजार रूग्ण क्षमतेच्या सात जम्बो कोविड सेंटरमध्येही समन्वयकाची भूमिका बजावत आहेत. या ठिकाणी अजून तीन कोविड सेंटरचे उभारणीचे काम सुरू आहे. शिर्डीमधील (Shirdi) नव्याने होत आसलेले चार हजार रूग्ण क्षमतेचे कोविड सेंटरमध्येही डॉ.डेरे यांचाच अनुभव कामी येते आहे. तेथेही ते राज्य सरकारकडून समन्वयकाची भूमिका बजावत आहेत.

जागतिक सर्वेक्षणात मुंबईमधील कोविड सेंटरचे काम चांगल्या प्रकारे सुरू असल्याचे सांगण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray), ज्येष्ठ गायिका भारतरत्न लता मंगेशकर (lata mangeshkar), सचिन पिळगावकर यांच्यासह अनेक कलाकारांनी या कामाचे कौतुक केले आहे. लतादीदींनी डॉ. डेरे यांना पत्र पाठवत आपण करीत असलेल्या रूग्णसेवेला सलाम अशा शब्दांत त्यांचे आभार मानले आहेत.

रूग्णांची अद्ययावत व्यवस्था येथे करण्यात आली आहे. पी.पी.ई. किटशिवाय अधिकृत कारणाशिवाय कोणालाही या सेंटरमध्ये प्रवेश दिला जात नाही. रूग्णांच्या बाहेरून येणा-या इतर वस्तुंसाठीही ठराविक जागा ठेवण्यात आली आहे. तेथून पी.पी.टी किट धारण कर्मचारी ती वस्तु सॅनिटायझर करून आत नेतो. डॉ. डेरे याबाबत सांगतात की रूग्णांवर वेळेत उपचार व वेगात करण्यात येणारे लसीकरण हा एकमेव उपाय कोरोना आजारावर आहे.

दीदींच्या पत्रामुळे बळ मिळाले

नागरीकांनी लक्षणे दिसल्यास घाबरून न जाता टेस्ट करावी. त्यावर उपचार घ्यावेत. हा आजार बरा होतो त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. लतादीदींच्या या पत्रामुळे आम्हा सर्वच वैद्यकीय कर्मचा-यांना अधिक जोमाने रूग्णसेवा करण्याचे बळ मिळाले आहे.

- डॉ. राजेश डेरे

(Lata Mangeshkar's letter to Ahmednagar doctor)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT