मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. दोघांचंही अमेरिकेतील मराठी बांधवांनी जोरदार स्वागत केलं.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल सीबीआय मुख्यालयात पोहोचल्या आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना नुकतेच सीबीआय मुख्यालयात आणण्यात आले. अबकारी धोरण प्रकरणी राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने त्यांना 3 दिवसांच्या सीबीआय कोठडीत पाठवले
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी एका मोठ्या कारवाईत आणखी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तर चौथ्या दहशतवाद्याचा शोध सुरू आहे.
सुरक्षा दलांनी डोडा जिल्ह्यात दहशतवादविरोधी कारवाई सुरू ठेवत बुधवारी तीन दहशतवाद्यांना ठार केले.
राउस अन्हेन्यू कोर्टाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तीन दिवसांच्या सीबीआय रिमांडमध्ये पाठवले आहे.
दोडा | डोडा जिल्ह्यातील गंडोह, भदरवाह सेक्टरमध्ये सुरू असलेल्या संयुक्त कारवाईत आणखी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. त्यांच्या ताब्यातून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे: एडीजीपी जम्मू
जेडी(एस) चे माजी खासदार प्रज्वल रेवन्ना आणि त्याचे वडील एचडी रेवन्ना यांच्याविरुद्ध होलेनरसीपुरा पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या बलात्काराच्या तक्रारीच्या संदर्भातील जामीन विशेष लोकप्रतिनिधी न्यायालयाने अर्ज फेटाळला.
भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन सत्यशोधक पद्धतीने करा, असे निवेदन भिडेवाडा बचाव मोहिमेच्या संस्थापक प्रशांत फुले यांनी राज्य शासनाला दिले आहे. या स्मारकाचे भूमिपूजन जुलै महिन्यात करण्यात येणार आहे.
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार याची चर्चा सुरु होती. पण आता मविआच्या नेत्यांनी स्पष्ट केलंय की विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतरच मुख्यमंत्री कोण असेल हे ठरवलं जाईल.
नाशिक शिक्षक मतदारसंघात शिक्षकांनाच पैसे वाटप करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अशा प्रकारे पैसे वाटताना एका अटक करण्यात आली आहे.
मुंबईतील असल्फा परिसरातील दरड प्रवण क्षेत्राची मुख्यमंत्र्यांनी पाहाणी केली. यावेळी महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी देखील उपस्थित होते. दरड दुर्घटनेतून बचावासाठी उपायोजना केल्या जात आहेत. याच कामाची पाहाणी त्यांनी केली.
पुण्यातील ड्रग प्रकरणानंतर पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून सूस रस्ता, बाणेर या भागांमधील हॉटेल आणि बारवर कारवाईला सुरूवात झाली आहे.
इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादून घटनेवर प्रहार केला. असे ओम बिर्ला म्हणाले. लोकसभा अध्यक्षांनी निवेदन दिल्यानंतर विरोधकांनी गदारोळ घातला
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले, "मला पुन्हा एकदा सभागृहाचा अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी पार पाडण्याची संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान मोदी आणि सभागृहातील सर्व सदस्यांचे आभार मानतो. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो"
संसदेत खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, 5 वर्षात तुम्ही खूप चांगलं काम केलंय. पण जेव्हा माझ्या 150 सहकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं, तेव्हा आम्हा सर्वांना दु:ख झालं. येत्या 5 वर्षात तुम्ही निलंबनाचा विचार करणार नाही हे पाहण्यासाठी आम्ही नेहमी संवादासाठी तयार आहोत"
बुधवारी (26जून) न्यायालयात सुनावणी सुरू असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रकृती खालावली. मुख्यमंत्री केजरीवाल यांची रक्तातील साखरेची पातळी खाली गेली आहे. यानंतर त्याला दुसऱ्या खोलीत बसवण्यात आले. त्यांना चहा आणि बिस्किटे देण्यात आली. सीएम केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवालही कोर्ट रूममध्ये उपस्थित होत्या.
समाजवादी पक्षाचे खासदार आणि सपा प्रमुख अखिलेश यादव म्हणाले, "मी लोकसभेच्या नवनिर्वाचित अध्यक्षांचे अभिनंदन करतो. तुम्ही ज्या पदावर आहात त्याच्याशी अतिशय गौरवशाली परंपरा जोडलेली आहे. लोकसभेचे अध्यक्ष या नात्याने प्रत्येक पक्षाला समान संधी आणि सन्मान मिळेल अशी अपेक्षा आहे.'' अखिलेश यादव म्हणाले, लोकसभा अध्यक्ष, तुमचं नेहमी विरोधकांवर नियंत्रण असतं, पण सत्ताधारी पक्षाच्या खासदारांवरही तुमचं नियंत्रण असेल अशी आम्हाला आशा आहे.
धाराशिव जिल्ह्यातील बेंबळी येथील एका शिक्षकाची 45 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. डॉलरच्या नावाखाली अज्ञाताने शिक्षकाला हा गंडा घातलाय.साबर पोलिसात कलम 420, सह माहिती तंत्रज्ञान सुधारीत अधिनियम 2008 कलम 66 सी, 66 डी अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
आम्हाला लोकांचा आवाज संसदेत पोहवण्याची योग्य संधी द्या. यांदा विरोधी पक्ष मोठ्या प्रमाणावर सदनात आहेत. यामुळे आम्हला जनतेचा आवाज पोहोचवायचा आहे. आम्हाला योग्य संधी द्या असे राहूल गांधी ओम बिर्ला यांना म्हणाले
भारताच्या या आमृत काळात ओम बिर्ला अध्यक्ष झाले आहेत. यामुळे ओम बिर्लांवर मोठी जबाबदारी आहे असे मोदी म्हणाले.
ओम बिर्ला यांची लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. आवाजी मतदानाने ही निवड करण्यात आली.
पंतप्रधान मोदींना आता पळ काढता येणार नाही. कारण, आता राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाले आहेत. विरोधी पक्षाची ताकद दाखवून द्यायची आहे, असं ठाकरे गटाचे संजय राऊत म्हणाले आहेत.
पंढरपुरात पदस्पर्श दर्शन रांगेत गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात वारकरी पंढरपुरात जमा झाले आहेत.
रेस कोर्सची १२० एअर जागा बीएमसीला देण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे बीएमसीला याठिकाणी निर्माण कार्य हाती घेता येणार आहे.
12 जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं लग्न आहे. यानिमित्त मुकेश अंबानींनी शिंदे कुटुंबियाला वर्षा बंगल्यावर जाऊन लग्नाचं निमंत्रण दिलं.
मंगळवारी रात्री महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांची वर्षा बंगल्यावर बैठक झाली आहे. यावेळी नेत्यांमध्ये दोन तास चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर आज महायुतीची पत्रकार परिषद होणार आहे. यात मोठ्या घोषणेची शक्यता आहे.
आज लोकसभा निवडणुकीसाठी अकरा वाजता निवडणुका होणार आहे. भाजपचे ओम प्रकाश बिर्ला आणि काँग्रेसकडून के सुरेश हे दोघे अध्यक्षपदासाठी उभे आहेत. आजच्या घडामोडींकडे लक्ष असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.