नाशकात उभ्या कारवर झाड कोसळले असून जुने सीबीएस परिसरात ही घटना घडली आहे. कारमध्ये कुणीही नसल्यानं जीवितहानी झाली नाही. गुल मोहोराचे झाड कोसळल्याने कारचे नुकसान झाले आहे.
विधान परिषद निवडणुकनंतर शरद पवार ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत. शरद पवार महाराष्ट्राच्या सहा दिवस दौऱ्यावर असणार आहेत. आजच शरद पवार पुण्याला रवाना झाले असूनउद्या त्यांचा पुण्यात बालगंधर्व येथे कार्यक्रम आहे.
उद्या मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, आँरेंज अर्लट हवामान खात्याने दिला आहे.
प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी नांदेडमध्ये आज आणि उद्या येलो अलर्ट जाहीर केला. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता. नांदेडमध्ये दुपार पासून दोन सुरू आहे कुठे रिमझिम तर कुठे जोरदार पाऊस सुरू आहे.
आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनानिमित्त (१५ जुलै) महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाद्वारे 'उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था' पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. सदर सोहळा केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय परिसरात संपन्न झाला. सर्वांगीण दृष्टीने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था निवडून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रशिक्षणार्थींनी विविध क्षेत्रात मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले.
कोकण रेल्वेची वाहतूक सुरु झाली. पहिली ट्रेन मुंबईच्या दिशेने रवाना झाली. २६ ते २७ तासापासून कोणर रेल्वेची वाहतूक बंद होती. आता दरळ हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस खासदार विजयी झाल्यानंतर महाविकास आघाडीतील शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षाच्या जिल्हा शाखांनी स्वतंत्रपणे विविध जागांची मागणी करत वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न चालविला आहे अशी प्रतिक्रिया आमदार सुभाष धोटे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा हा शहरी नक्षलवाद विरोधात आणण्याचा सरकारचा हेतू असला तरी हा कायदा विरोधकांवर दबाव आणण्यासाठी केला जात आहे. या कायद्यामुळे लोकशाहीला मोठा धोका निर्माण होत आहे. कोणी सरकार विरोधात आंदोलन केले, एखादे स्टेटमेंट दिले तरी कारवाई करण्याची तरतूद आहे. अधिवेशन संपण्याच्या दोन दिवस आधी हे बिल आणले ह्याला आम्ही विरोध केला म्हणून ते मंजूर होऊ शकले नाही. आता अध्यादेश आणण्याची चर्चा आहे, ह्याला आमचा विरोध कायम राहील गरज पडली तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
विशाळगड परिसरात झालेल्या अतिक्रमणादरम्यान हिंसक वळण लागलं होतं यामध्ये पोलिसांनी चार विविध प्रकारचे गुन्हे दाखल केले आहेत यामध्ये 400 ते 500 संशयतांचा समावेश असून २१ संशयतांना ताब्यात घेतला आहे. त्यांना अटकही केली आहे. त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी ही मिळाली आहे. मात्र संभाजीराजे यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे का या प्रश्नावर पोलीस निरोत्तरी झाले आहेत. संभाजी राजांच्या प्रश्नावरती पोलिसांनी कोणतेही प्रतिक्रिया दिली नाही.
अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणातील SEBIच्या चौकशीला मान्यता द्या, म्हणणारी रिव्ह्यू पीटिशन सुप्रीम कोर्टाने फेटाळली. सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकालावर दाखल केलेली याचिका फेटाळली. न्यायालयाच्या देखरेखीखाली SIT किंवा CBI द्वारे तपास करण्याची मागणी याचिकेत केली होती. सुप्रीम कोर्टाच्या पीठानं ३ जानेवारी रोजी या प्रकरणाचा निकाल दिला होता. मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या पीठानं ही याचिका फेटाळली.
रत्नागिरीत रेल्वे रुळावर दरड कोसळल्यानं रेल्वे सेवा ठप्पा झाली आहे. या दुर्घटनेला आता २४ तास उलटून गेले तरीही अद्याप रेल्वे सेवा पूर्ववत होऊ शकलेली नाही. दरड कोसळलेल्या ठिकाणी चिखल, मलबा काढण्याचं काम सुरू आहे. 50 कर्मचारी, 2 जेसीबी, 2 पोकलेन, ट्रॅक्टर आदी यंत्रसामुग्रीनं मलबा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामात पावसाचाही अडथळा येतोय.
आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणीला परिधान करण्यात येणारा भरजरी पोशाख आता मंदिरात दाखल झाला आहे. बेंगलोर येथून हस्त कलेतून विणलेले महावस्त्र एक भाविकाने अर्पण केले आहे. आषाढीच्या दिवशी नित्य पूजेच्यावेळी पांडुरंगास अंगरखा, सोवळे, शेला आणि रुक्मिणी मातेस साडी असा पोशाख केला जातो.
माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या 'पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ' (पीटीआय) या पक्षावर बंदी घालण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला आहे.
आषाढी वारीला भाजप सोडणार विशेष ट्रेन. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे नियोजन. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दुपारी ३.३० वाजता दाखवणार हिरवा कंदील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून सुटणार विशेष ट्रेन
मुसळधार पावसामुळे हवामान खात्याने रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे. यासोबतच मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
कोंकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे - प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई
हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा गावच्या शिवारात अचानक आकाशातून पिवळ्या रंगाचे थेंब कोसळत असल्याने चर्चांना उधाण आले होते, ग्रामस्थांनी याची माहिती प्रशासनाला दिले असून प्रशासन या सगळ्या प्रकाराचा अभ्यास करत आहे.
विशाळगड परिसरात तोडफोड केल्याप्रकरणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह 50 ते 60 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर संभाजी राजे छत्रपती शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत.
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी अयोध्येत झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर आक्षेप घेतला होता. प्राणप्रतिष्ठा सोहळा शास्त्रानुसार होत नसल्याचं शंकराचार्यांचे म्हणणं होतं. यावेळी शंकराचार्यांच्या या भूमिकेला उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता.
दुसरीकडे राहुल गांधी यांनी हिंदुत्व आणि हिंसा यासंदर्भात काही दिवसांपूर्वी संसदेत भाषण करताना जो मुद्दा उपस्थित केला होता त्याला सुद्धा अविमुक्तेश्वरानंद यांनी समर्थन दर्शवलं होतं.
CAA वर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले आतापर्यंत फक्त दोन लोकांनी अर्ज केला आहे. 2015 पूर्वी भारतात आलेले कोणीही (CAA नुसार) त्यांना नागरिकत्वासाठी अर्ज करण्याचा अधिकार आहे. जर त्यांनी अर्ज केला नाही तर आम्ही 2015 नंतर आलेल्यांना हद्दपार करू. 2015 पूर्वी आलेल्या पाच अर्जांपैकी तीन अर्ज दाखल झाले नाहीत. दोघांनी CAA साठी अर्ज केला आहे."
तेलंगणा पोलिसांनी हैदराबादमध्ये आंदोलन करणाऱ्या ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या (एआयएसएफ) सदस्यांना ताब्यात घेतले. प्रलंबित शिष्यवृत्ती आणि शुल्क प्रतिपूर्तीसाठी निधी जाहीर करण्याची त्यांची मागणी होती.
पूजा खेडकर वादात सापडल्यानंतर त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होऊ लागला. ज्यात त्या स्थानिक शेतकऱ्याला धमकावत आहेत, तिच्या पालकांविरुद्ध दाखल केलेल्या FIRवर, प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर म्हणाली, मी यावर भाष्य करू शकत नाही, असे मी यापूर्वीही सांगितले आहे. जे काही आवश्यक असेल ते मी समितीसमाेर मांडेन.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली आहे. ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जातं.
छगन भुजबळांची महायुतीमध्ये हेळसांड होत आहे हे नाकारता येत नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर गेले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे नवनियुक्त पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांचे अभिनंदन केले आहे. शर्मा हे तिसऱ्यांदा नेपाळचे पंतप्रधान झाले आहेत.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेत मंत्री छगन भुजबळ शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी फुटल्यानंतर भुजबळ आणि पवार यांच्यात पहिल्यांदाच भेट होत आहे. मात्र, ही भेट कशासंबंधी आहे हे अद्याप समजले नाही.
अहमदाबाद-वडोदरा एक्स्प्रेस हायवेवर आज सकाळी बसची ट्रकला धडक बसून झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत.
कोकणात आडकलेल्या प्रवाशांसाठी एसटीची सोय करण्यात आली आहे. मुंबईपर्यंत ही सोय करण्यात आली आहे.
आषाढी एकादशीच्या पंढरपूर यात्रेसाठ एसटी महामंडळाच्या परभणी विभागाने परभणी व हिंगोली या दोन जिल्हयासाठी विशेष बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
Nashik : हिरा वाईन्स या दुकानात दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास सोनू भागवत याने फुकट दारू देत नाही म्हणून रागाच्या भरात आग लावली.
Lonavala live Update: लोणावळ्यात धोकादायक पर्यटन करणाऱ्या 12 जणांवर लोणावळा पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे
Konkan railway Latest Update: कोकण रेल्वे ठप्प, प्रवाशांचे प्रचंड हाल
मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला मोठा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे दिवाणखवटी बोगद्याजवळ दरड कोसळली असून गेल्या जवळपास १४ तासांपासून कोकण रेल्वे सेवा ठप्प आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.