Latest Marathi News Live Update  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Lok Sabha Maharashtra Politics: देश-विदेश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तुम्हाला याठिकाणी वाचायला मिळतील.

सकाळ वृत्तसेवा

नरेंद्र मोदींनी इटलीच्या पंतप्रधानांना दिल्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. पंतप्रधानांनी त्यांना स्वातंत्र्य दिनाबद्दल शुभेच्छा दिल्या.

महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक पुढे ढकलली

दिल्लीच्या महापौर आणि उपमहापौरांची नियोजित निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. MCD सचिवांनी जारी केलेल्या नोटीसमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

वर्षा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर

काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांना पक्षाने उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी जाहीर केली आहे. दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरुन पक्षात नाराजी पसरली होती. त्यानंतर पक्षाने वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मतदारसंघातून संधी दिली आहे.

लहान मुलांच्या वादात एकाची हत्या

लहान मुलांच्या वादात एकाची हत्या झाल्याची घटना धुळ्यामध्ये घडली आहे. धुळ्यातल्या शिरपूरमध्ये ही घटना घडली.

ठाकरेंच्या शिवसेनाचा वचननामा जाहीर; उद्धव ठाकरेंनी मांडली भूमिका

पालघर लोकसभेसाठी बविआकडून राजेश पाटलांना उमेदवारी

पालघर लोकसभेसाठी बविआचा उमेदवार ठरला. बोईसरचे आमदार राजेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

बारामतीत अनोळखी लोक फिरताहेत; सुनंदा पवारांनी व्यक्त केली 'ही' भीती 

आज बारामतीच्या प्रत्येक गावामध्ये अनोळखी लोक फिरताना दिसत आहेत आणि वेगळ्या भाषेत बोलताना दिसत आहेत. शेवटच्या दोन-तीन दिवसांमध्ये धनशक्तीचा आणि दडपशाहीचा वापर होईल, असा दावा आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी केला आहे. बारामती तालुक्यातील जळगाव सुपे गावात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारानिमित्त झालेल्या सभेत सुनंदा पवार बोलत होत्या.

Ajit Pawar: अन् उपमुख्यमंत्र्यांनीच तोडले वाहतूकीचे नियम; अजित पवार यांचा ताफा उलट्या दिशेने

पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ तसेच शिरूरचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे अजित पवार आले होते. यावेळी काही वेळ ते जिल्हाधिकारी कार्यालयात थांबून पुन्हा बाहेर आले व निघताना त्यांचा गाड्यांचा ताफा हा उलट्या दिशेने गेला. आश्चर्य म्हणजे पोलिसांनी देखील त्यांना अडवले नाही

Loksabha Election 2024: पुणे जिल्ह्यातील १ हजार ६६२ जणांची टपाल मतदानास पसंती

पुणे,बारामती,मावळा आणि शिरूर या चारही लोकसभा मतदारसंघातील ८५ वर्षापेक्षा अधिक वय असलेले मतदार व दिव्यांग मतदार यांच्यासाठी घरीच टपाली मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिले आहे.

या सुविधेसाठी मतदारांना १२ ड हा अर्ज भरून देणे आवश्यक होते त्यानुसार या चारही मतदारसंघातील ८५ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या १ हजार ३९७ मतदारांनी तर २६५ दिव्यांग मतदार असे एकूण १ हजार ६६२ मतदारांनी घरातून मतदान करण्यास परवानगी आहे.

पाटण्यातील हॉटेलला भीषण आग

पाटणा येथील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोलंबरजवळील एका हॉटेलला भीषण आग लागली आहे. दरम्यान बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला असून, १२ जणांची सुटका करण्यात आली आहे.

सांगलीतील मेळाव्यात कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

सांगलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलायला उभारल्यानंतर विश्वजीत कदमांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.

Arvind Kejriwal : ईडीची मुख्यमंत्री केजरीवालांविरोधात सुप्रीम कोर्टात तक्रार

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तपासादरम्यान आपल्या मोबाईलचा पासवर्ड सांगायला नकार दिला. केजरीवाल तपासला सहकार्य करत नाहीत, तपासात टाळाटाळ करणारी उत्तर केजरीवाल देत आहेत, त्यामुळं तपास करताना अडचणी येत आहेत. ED ने कोर्टात प्रतिज्ञापत्राद्वारे माहिती सादर केली.

Sangli Lok Sabha : भाजपचा कारभार पाहून बाबासाहेब आंबेडकरांना देखील वाईट वाटत असेल; विश्वजित कदमांचा हल्लाबोल

सांगली : सांगली जिल्ह्याचा इतिहास सर्वांना माहीत आहे. कॉंग्रेस पक्षाने स्वातंत्र्याच्या विचारला बळ दिले असून अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी काँग्रेसचा विचार लक्षात घेऊन लढ्यात सहभागी झाले. राजारामबापूचे देखील जिल्ह्याच्या विकासात योगदान आहे, असे आमदार विश्वजित कदम यांनी भाषणात सांगितले. भाजपने पहिल्यांदा सत्तेवर येताना जनतेला फसवलं आणि तात्पुरता स्वार्थ साधून घेतला. 2014 ते 19 मध्ये अनेक बाबतीत जनतेची फसवणूक झाली. मागील 5 वर्षात तर अनेक कटकारस्थान सत्ताधारी मंडळीकडून करण्यात आलीत. यंत्रणाचा वापर करून लोकशाहीला घातक करण्याचे काम केले जातेय, असा आरोपही त्यांनी केला. ज्या पद्धतीनं भाजपाचा कारभार सुरू आहे, ते पाहून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना देखील वाईट वाटत असेल, असंही त्यांनी नमूद केलं.

PM मोदी, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्याची होणार चौकशी? ECI नं धाडली नेत्यांना नोटीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निवडणूक प्रचारातील वक्तव्याची ECI ने दखल घेतली असून दोन्ही नेत्यांना नोटीस बजावली आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांवर धर्म, जात, समुदाय किंवा भाषेच्या आधारे द्वेष आणि फूट पाडल्याचा आरोप आहे. ECI ने 29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत उत्तर मागितले आहे.

Pune Lok Sabha : फडणवीसांच्या उपस्थितीत मोहोळांची प्रचार रॅली तर अजितदादांच्या हजेरीत आढळराव पाटलांची पुण्यात रॅली सुरु

पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुरलीधर मोहोळ यांची प्रचार रॅली तर अजित पवार यांच्या उपस्थितीत आढळराव पाटलांची पुण्यात प्रचार रॅली सुरु आहे. तर, जळगावमधून स्मिता वाघ यांनी अर्ज भरला आहे.

Central Government : इथेनॉलला केंद्र सरकारची परवानगी

नवी दिल्ली : केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली होती. ही बंदी आता सरकारने मागे घेतली आहे. त्यामुळे साखर उत्पादकांना फायदा होणार आहे. 6 डिसेंबर 2023 ला केंद्र सरकराने ही बंदी घातली होती. या निर्णयामुळे 700 कोटी रुपयांचा फायदा हा शेतकऱ्यांना (Farmers) होणार आहे.

Sangli Lok Sabha : प्रचारादरम्यान माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर हल्ला

सांगली : काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांच्या प्रचारादरम्यान जत तालुक्याचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. जत तालुक्यातल्या जिरग्याळ येथे तीन अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज वाहतूक ब्लॉक

यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज एमएमआरडीए हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमअंतर्गत गॅन्ट्री बसविण्याचं काम हाती घेणार आहे. त्यासाठी आज दोन तासांचा वाहतूक ब्लॉक घेण्यात आला आहे. दुपारी 12 ते 2 दरम्यान हे काम करण्यात येणार आहे.

अँटॉप हिल परिसरात कारमध्ये अडकून दोघा चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू

अँटॉप हिल परिसरात कारमध्ये अडकून दोघा चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू. यावेळी खेळता खेळता गाडीत अडकून गुदमरून यामुलांचा मृत्यू झाल्याचा पोलिसांना संशय आहे.

Crime News: पोलिसांची मोठी कारवाई; गव्हाच्या पोत्याखाली लपवून आणलेला ९ लाख किमतीचा गुटखा जप्त

गव्हाच्या पोत्याखाली लपवून आणला गेलेला गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा पकडण्यात तुर्भे पोलिसांना यश आले आहे. याची किंमत ९ लाख ५० हजार रुपये आहे. तसेच २० लाख रुपये किमतीचा ट्रकही यात जप्त करण्यात आला आहे. हा साठा मध्य प्रदेशमधून नवी मुंबईत विक्रीसाठी आणण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

सेप्टिक टँकमध्ये पडून दोन कामगारांचा मृत्यू; एकाची प्रकृती गंभीर

मालाड पूर्व येथे काम सुरु असलेल्या इमारतीच्या सेप्टीक टँकमध्ये पडून दोन कामगारांचा मृत्यू झाला. काल दुपारी ही दुर्घटना घडली. एकजण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नजीकच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आग्नीवीर योजना रद्द करणार; शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यात नोंद

शरद पवार गटाचा आज जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला आहे. या जाहीरनाम्याला शपथनामा असं नाव देण्यात आलं आहे.या वेळी आग्नीवीर योजना रद्द करणार असल्याचे यात म्हटले आहे.

Sharad Pawar: शरद पवार गटाच्या जाहीरनाम्याला 'शपथनामा' असं नाव

शरद पवार गटाचा आज जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला आहे. या जाहीरनाम्याला शपथनामा असं नाव देण्यात आलं आहे.

Priyanka Gandhi: प्रियंका गांधी देखील निवडणुकीच्या मैदानात उतरणार?

राहुल गांधी अमेठी तर प्रियंका गांधी रायबरेली मतदार संघातून निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. उद्या वायनाड मतदार संघातील मतदान झाल्यानंतर नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Pune Lok Sabha: महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

उमेदवारी अर्ज भरण्याआधी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचे कुटुंबियांनी औक्षण केले. यावेळी मोहोळ यांनी आई-वडिलांचे आशीर्वादही घेतले. मुरलीधर मोहोळ यांनी प्रकाश जावडेकर यांची भेट घेतली.

Sandipam Bhumre: संदीपान भूमरे आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार

संदीपान भूमरे आज औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा आज जाहीरनामा प्रसिद्ध होणार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा आज जाहीरनामा प्रसिद्ध होणार होणार आहे. तसेच प्रचारगीत देखील आज जाहीर केले जाईल.

Lok Sabha Election: स्मिता वाघ, रक्षा खडसे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

स्मिता वाघ आणि रक्षा खडसे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. स्मिता वाघ जळगाव आणि रक्षा खडसे या रावेरमधून अर्ज दाखल करणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी पार पडणार आहे. त्यामुळे सध्या प्रचार थंडावला आहे. मुंबई-पुणे महामार्गावर आज दोन तास वाहतूक ब्लॉक असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आज जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी सॅम पित्रोदा यांच्या विधानावरुन काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

मतदान कर्मचाऱ्यांना यंदा भत्ता मिळणार ऑनलाईन! ट्रायल पेमेंटसाठी आज 1 रुपया पाठवला जाईल; बॅंक खात्यांची होईल खात्री अन्‌ बुधवारपासून उर्वरित रक्कम मिळणार

SCROLL FOR NEXT