Latest Marathi News Live Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Latest Marathi News Update: मुंबई : ताडदेवमध्ये प्लास्टिकच्या गोदामाला आग; 5 अग्निशमनच्या गाड्या घटनास्थळी

Maharashtra Latest political Update: आज दिवसभरातील देश-विदेश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तुम्हाला या ठिकाणी वाचायला मिळतील.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ताडदेवमध्ये प्लास्टिकच्या गोदामाला आग; 5 अग्निशमनच्या गाड्या घटनास्थळी 

ताज हॉटेल उडवून देण्याची धमकी देणारा अटकेत

जीडीपीची आकडेवारी पाहून मोदींनी मानले कष्टकऱ्यांचे आभार

एक्झिट पोलच्या चर्चेत सहभाग न होण्याबाबत काँग्रेस नेत्याने स्पष्ट केली भूमिका

काँग्रेस नेते पवन खेरा यांनी ट्विट केले आहे की, "आगामी एक्झिट पोलच्या चर्चेत सहभागी न होण्याच्या पक्षाच्या निर्णयावर आमचे विधानः मतदारांनी मतदान केले आहे आणि मतदानाचे निकाल मशीनमध्ये बंद झाले आहेत. निकाल ४ जून रोजी जाहीर होतील. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नजरेत, निकाल जाहीर होण्याआधी कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक अंदाज बांधून टीआरपीच्या खेळात सहभागी होण्याचे कोणतेही औचित्य दिसत नाही" कोणत्याही चर्चेत सहभागी होण्याचा उद्देश लोकांच्या ज्ञानात भर टाकणे हा असतो. काँग्रेस पक्ष चार जून पासून पुन्हा डिबेट्समध्ये आनंदाने सहभागी होईल.

मणिपूरमधील इम्फाळच्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पूर  

मणिपूर: संततधार पावसामुळे इम्फाळच्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पूर आल्याने बचाव आणि स्थलांतराचे काम सुरू आहे.

Rajinikanth : अभिनेता रजनीकांत यांनी घेतलं केदारनाथचे दर्शन 

सुप्रसिद्ध अभिनेता रजनीकांत यांनी केदारनाथ आणि बद्रीनाथ धामचे दर्शन घेतले.

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आसाम, मणिपूरसाठी केलं ट्विट

रेमल वादळामुळं हानी झालेल्या आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोरम, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल राज्यातील प्रभावित लोकांविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून सहवेदना व्यक्त केल्या. तसेत केंद्र सरकार परिस्थितीवर नजर ठेवून आहे आणि राज्यांना आवश्यक ती सर्व मदत करणार असल्याचं सांगितलं.

Amit Shah : रेमल वादळामुळं आसाम, मणिपूरमध्ये मोठं नुकसान; गृहमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता

गृहमंत्री अमित शहा यांनी रेमल वादळामुळं आसाम, त्रिपुरा, मणिपूर, मेघालय, मिझोरम राज्यात झालेल्या हानीवर चिंता व्यक्त केली. त्याबरोबर याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना माहिती देण्यात आली असल्याचही सांगितलं.

Heat Wave : बिहारमधील औरंगाबाद हॉस्पिटलमधील 5 लोकांचा उष्माघातामुळे मृत्यू

बिहारमधील औरंगाबाद रूग्णालयातील 5 लोकांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. बिहारमधील उष्माघातामुळे मृत्यू होणाऱ्या लोकांची संख्या आता 17 वर पोहचली आहे.

Delhi CM Arvind Kejriwal : केजरीवालांच्या सहाय्यकला दिल्ली पोलिसांनी रूग्णालयात केलं दाखल

दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा सहाय्यक बिभव कुमारला अरूणा असफ अली सरकारी रूग्णालयात दाखल केलं आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने बिभव कुमारच्या अटकेविरूद्ध दाद मागणाऱ्या याचिकेचा निकाल राखून ठेवला आहे.

Mallikarjun Kharge: इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा दावेदार कोण? मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिले उत्तर

लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या 6 टप्प्यांसाठी मतदान झाले आहे, तर सातव्या टप्प्यासाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे. यावेळी इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे.

इंडिया आघाडीच्या वतीने भाजप पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहे. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, 'निवडणुकीनंतर घटक पक्षांची बैठक होऊन या विषयावर निर्णय घेतला जाईल.'

Sangli News: विवाहित गर्भपात मृत्यू प्रकरणात सांगली पोलिसांची मोठी कारवाई

  • गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या मृत महिलेच्या कुटुंबीयांसह, कर्नाटक, सांगली आणि जयसिंगपूर मधील डॉक्टर, डॉक्टरांचे सहकारी अशा सात जणांना घेतले ताब्यात

  • सांगली पोलिसांनी पुढील चौकशीसाठी कर्नाटकातील महालिंगपुर पोलिसांच्या दिले ताब्यात

  • महलिंगपुरा येथे अवैध गर्भपात वेळी महिलेचा झाला होता मृत्यू

Bomb Threat Call: दिल्लीहून काश्मीरकडे जाणाऱ्या विस्तारा फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची धमकी देणारा कॉल

  • दिल्लीहून काश्मीरकडे जाणाऱ्या विस्तारा फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची धमकी देणारा कॉल

  • एअर ट्रॅफिक कंट्रोल रुमला आला होता कॉल

  • श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानतळ प्राधिकरणाने तत्काळ फोनची घेतली दखल

  • हा फोन खोटा असल्याचं चौकशीतून समोर

  • पुन्हा विमान सेवा पूर्ववत सुरू

Air India: डीजीसीएने एअर इंडियाला पाठवली नोटीस

दिल्लीत सॅन फ्रान्सिस्कोच्या विमानाला 20 तासांपर्यंत उशीर झाल्यानंतर डीजीसीएने एअर इंडियाला एक नोटीस पाठवली आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणे आणि प्रवाशांची आवश्यक काळजी न घेतल्याबद्दल नोटीस पाठवण्यात आली आहे.

Pune Porsche Accident: पुणे कार अपघात प्रकरणात मोठी घडामोड

पुणे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीचे वडील आणि आजोबा दोघांनाही कोर्टाने 14 दिवस न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे

Mumbai News: दक्षिण मुंबईत वीजपुरवठा खंडीत

दक्षिण मुंबईत वीजपुरवठा खंडीत झाला आहे. यामुळे मंत्र्यांच्या बंगल्यांची वीज गेली आहे. गेल्या अर्ध्या तासापासून वीज गेली आहे. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Mumbai Local News: ६३ तासांचा जम्बो ब्लॉक, प्रवाशांचे प्रचंड हाल

ठाणे स्थानकांवरील प्लॅटफॉर्म क्रमांक पाच- सहाची रुंदी वाढण्यासाठी ६३ तासाच्या आणि सीएसएमटी स्थानकात दहा- अकरा प्लँटफॉर्मच्या विस्तार करण्याकरिता ३६ तासांचा ब्लॉक घेण्यात येत आहे. यामुळे लोकल विलंबाने धावत असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत.

UP News: मेरठमधील लाला लजपत राय मेमोरियल मेडिकल कॉलेजमध्ये लागली आग .

उत्तर प्रदेश मधील मेरठमधील लाला लजपत राय मेमोरियल मेडिकल कॉलेजमध्ये आग लागली आहे.

Maharashtra: अमरावती जिल्ह्यामधील गावातील स्थानिकांना प्यावं लागतंय गढूळ पाणी  

Maharashtra: अमरावती जिल्ह्यातील गावातील स्थानिक हे सध्या गढूळ पाण्याच्या समस्येचा सामना करत आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पत्नीसह केली तिरुपती बालाजी मंदिरात पूजा

आंध्र प्रदेश: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि त्यांची पत्नी सोनल शाह यांनी तिरुपती बालाजी मंदिरात पूजा केली.

सिंहगड रस्त्याला आणि इतर पर्यायी रस्त्याला वाहनांच्या रांगा

आजही सिंहगड रस्त्याला आणि इतर पर्यायी रस्त्याला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Nashik Teachers Constituency: ठाकरेंचा विधानपरिषदेचा आमदार शिंदे यांच्या संपर्कात?


शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार किशोर दराडे शिंदेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नाशिक शिक्षक मतदारसंघातून टीडीएफ शिक्षक संघटनेकडून उमेदवारी मिळालेले संदीप गुळवे यांना ठाकरे गटाचा देखील पाठिंबा असल्याची चर्चा आहे. परिणामी किशोर दराडे शिंदेंच्या शिवसेनेचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची सूत्रांची माहिती.

Supreme Court: पुनर्मतदानासाठी निवडणूक आयोगाला निर्देश मागणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

बिहारमधील मुंगेर लोकसभा मतदारसंघात पुनर्मतदानासाठी निवडणूक आयोगाला निर्देश मागणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला, जेथे कथित बूथ कॅप्चरिंग स्थानिक प्रशासनाच्या संगनमताने घडले होते. सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले.

Delhi News: राजधानी दिल्लीत भीषण पाणीटंचाई; अनेक भागात टँकरने पाणीपुरवठा

चाणक्यपुरी भागात टँकर आल्यानंतर पाण्यासाठी नागरिकांची धावाधाव सुरु होत आहे. यमुना नदीतील पाणी पातळी कमी झाल्याने दिल्लीवर पाणीटंचाईचे सावट आहे. अनेक भागात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. भीषण गर्मी आणि पाणीटंचाईमुळे दिल्लीकर हैराण झाले आहेत

PM Narendra Modi meditates : पंतप्रधान मोदींची कन्याकुमारीमध्ये ध्यानधारणा सुरु; व्हिडिओ आला समोर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडूच्या कन्याकुमारी येथे ध्यानधारणा सुरु केली आहे. १ जूनपर्यंत त्यांची ही ध्यानधारणा सुरु असणार आहे.

Mumbai Traffic: मुलुंड ते कांजूरच्या दरम्यान पूर्व द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

मध्य रेल्वे वरील जम्बो ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रस्त्यावर वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळत आहे. आपल्या खाजगी वाहनाने मुंबईकर हे कामाच्या दिशेने निघालेले आहेत. त्यामुळे मुलुंड ते कांजूरच्या दरम्यान पूर्व द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहेत

Prajwal Revanna: प्रज्वल रेवण्णाला आज कोर्टात हजर केले जाणार

प्रज्वल रेवण्णा आज जर्मनीवरुन भारतात आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. आजच त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे.

PM Narendra Mod: पंतप्रधान मोदींची कन्याकुमारीमध्ये ध्यानधारणा सुरु, पाहा व्हिडिओ

पंतप्रधान मोदी हे तमिळनाडूतील कन्याकुमारी येथे काल दाखल झाले आहेत. याठिकाणी त्यांनी ध्यानधारणा सुरु केली आहे. १ जूनपर्यंत पंतप्रधान मोदी याच ठिकाणी ध्यानधारणा करतील.

Mumbai Rain News: मुंबईत १ ते ३ जूनदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता

मुंबईत १ ते ३ जूनदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मान्सून दोन दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला आहे. त्याची आगेकूच सुरळीत सुरु असल्याचं सांगण्यात आलंय.

Mumbai Central Local News: मध्य रेल्वेवर आजपासून तीन दिवस जम्बोब्लॉक

मध्य रेल्वेवर आजपासून तीन दिवस जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होणार आहेत. तीन दिवसाच्या ब्लॉकमध्ये ९३० फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्याकुमारी येथे ध्यानधारणेला सुरुवात केली आहे. आजपासून मुंबईकरांचे हाल होणार आहेत. कारण मध्य रेल्वेवर जम्बोब्लॉक घेण्यात आला आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाला असून त्याची आहेकूच सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Trending News : काॅंग्रेसचे दोन गट भररस्त्यात भिडले, तितक्यात अॅम्बुलन्स आली अन् पुढे जे घडलं...

SCROLL FOR NEXT