Girish Mahajan esakal
महाराष्ट्र बातम्या

Girish Mahajan Audio Clip : धनगर उपोषणकर्त्यांबद्दल गिरीश महाजन काय म्हणाले? रमेश कराड यांच्यासोबतची ऑडिओ क्लिप व्हायरल...

Latur Dhangar Hunger Strike : व्हायरल ऑडिओ क्लिपनुसार पालकमंत्री उपोषणाकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप धनगर बांधवांनी केला आहे. अशा असंवेदनशील पालकमंत्र्याला लातूर जिल्ह्यात फिरू देणार नसल्याचा इशारा यावेळी धनगर बांधवांनी दिला.

संतोष कानडे

लातूरः राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. भाजप नेते रमेश कराड यांनी धनगर उपोषणकर्त्यांबाबत महाजनांकडे पाठपुरावा केला मात्र महाजन यांनी उपोषण सोडण्यासाठी येऊ शकत नसल्याचं स्पष्ट केलं.

''धनगर आरक्षणाच्या उपोषणाकडे डोळे-झाक करणाऱ्या पालकमंत्र्यांना लातूर जिल्ह्यात फिरू देणार नाही.'' असा इशारा लातूरमधल्या धनगर बांधवांनी दिला आहे. धनगर समाजाला एसटीमधून आरक्षणाची अंमलबजावणी करा, या मागणीसाठी गेल्या 10 दिवसापासून दोन धनगर बांधव अमरण उपोषण करत आहेत. या दरम्यान सोशल मीडियावर पालकमंत्री गिरीश महाजन आणि आमदार रमेश कराड यांच्यातील संवादाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

व्हायरल ऑडिओ क्लिपनुसार पालकमंत्री उपोषणाकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप धनगर बांधवांनी केला आहे. अशा असंवेदनशील पालकमंत्र्याला लातूर जिल्ह्यात फिरू देणार नसल्याचा इशारा यावेळी धनगर बांधवांनी दिला. सचिन दाणे यांनी 'साम टीव्ही'ला प्रतिक्रिया दिली आहे.

महाजन-कराड यांच्यातील कथित संवाद

रमेश कराड:- भाऊ, रमेश बोलतोय लातूर वरून....

गिरीश महाजन : हॅलो.. हा रमेश बोला बोला

रमेश कराड:- नऊ दिवसापासून आमच्या लातूरमध्ये धनगर समाजाचे बांधव उपोषणाला बसले आहेत.. परिस्थिती गंभीर आहे.. त्यांची एकच इच्छा आहे की प्रशासनाच्या वतीने कमीत कमी पालकमंत्र्यांनी येऊन आम्हाला शब्द द्यावा

गिरीश महाजन :- काय?

रमेश कराड:- उपोषण सोडण्यासाठी...

गिरीश महाजन:- त्यांना काय पत्र पाहिजे ते पत्र दिलंय

रमेश कराड:- पत्रावर नाही भागणार भाऊ, त्यांचं पुन्हा कसं झालय..

गिरीश महाजन:- ही पद्धत झालीय.. कुणीतरी एक मंत्र्यांनी यावं सोडा सोडा म्हणावं..

रमेश कराड:- धनगर समाज आपल्याबरोबर आहे, भाजपबरोबर पहिल्यापासून

गिरीश महाजन :- परवा बैठक झाली CM बरोबर DCM बरोबर 5, 6 दिवसांपूर्वी. तरीपण त्यांचं समाधान होत नाही करायचं? काय आपण...

रमेश कराड:- नाही आपण जर थोडंसं नाही केलं...

गिरीश महाजन :- आमच्याकडे बोगस आहे म्हणतात तेच म्हणतात

रमेश कराड:- तुम्ही पालकमंत्री आहात, पालक आहात आमचे

गिरीश महाजन:- हो खरं आहे..

रमेश कराड :- तुम्ही नेतेच आहात भाऊ महाराष्ट्राचे...

गिरीश महाजन :- तिथल्या मंत्र्यांना सांगतो.. मला इथे बैठक आहे उद्या.. अधिवेशन आहे मला अधिवेशन सोडून येणे शक्य नाही... हॅलो, आता इथे अधिवेशन चालू आहे आपल्याला कल्पना आहे...

रमेश कराड:- हो ना...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT