निलंगा: निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासून एक वर्षाच्या कालावधीत सक्षम प्राधिकारी यांच्याकडे सादर करणे बंधनकारक होते. मात्र ज्या उमेदवारांनी वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर केले नाही.
अशा पाच सरपंच व १०४ ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केली आहे. या कारवाईने अपात्र ठरलेल्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांमध्ये एकच तारांबळ उडाली आहे.
सन २०२१ मध्ये झालेल्या निलंगा तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतीच्या राखीव जागेवर निवडणूक लढवून निवडून आलेल्या उमेदवारांनी त्यांच्या जातीचे वैधता झालेले प्रमाणपत्र संबंधित विभागाकडे सादर करणे अवश्यक होते.
राखीव जागेवर निवडणूक लढवीत असताना नामनिर्देशन पत्र भरते वेळी निवडून आलेल्या तारखेपासून एक वर्षाच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याचे शपथपत्र देऊनही ज्या सरपंच व सदस्यांनी वेळेत प्रमाणात सादर केले नाही अशांना जिल्हाधिकारी यांनी थेट अपात्र ठरविले आहे.
त्यात निलंगा तालुक्यातील अंबुलगा (मेन), लांबोटा, आंबेगाव, शिरोळ (वांजरवाडा), हंद्राळ या पाच गावचे सरपंच अपात्र झाले आहेत तर बामणी, पिरुपटेलवाडी, टाकळी, कासार बालकुंदा, कासारसिरसी, खडकउमरगा, आनंदवाडी (अ.बू), हंचनाळ.
केळगाव, बुजरुकवाडी, शिरोळ (वांजरवाडा), वळसांगवी, वांजरवाडा, वाडीशेडोळ, माळेगाव (जेवरी), कोकळगाव, हाडगा, अंबुलगा (मेन), शिऊर, नदीवाडी, माळेगाव (कल्याणी), वाकसा, सावरी, ताडमुगळी, गौर.
ताजपुर, कोराळी, हंद्राळ, डोंगरगाव, गुऱ्हाळ, लांबोटा, जाजनुर, सरवडी, सिंगनाळ, बडूर, तगरखेडा या ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश आहे.
अनेकांचे प्रमाणपत्र मेलवरती
दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करतांना अनेकांनी ''मेलआयडी'' दिला होता त्या मेलवरती कांहीचे वैधता प्रमाणपत्र जात पडताळणी समितीकडून पाठवली आहे. मात्र त्या उमेदवारांनाही याबाबतची माहीतीच नाही त्यामुळे त्यांना अपात्रतेच्या कारवाईला सामोरे जावे लागले.
अनेकजणांनी मेल चेक केल्यानंतर त्यांचे वैधता सन २०२२ मध्येच झाली आहे तर काहीना इमेल व पासवर्ड माहीती नसल्याने गोंधळ उडत आहे.
तर अनेकांनी जात वैधता प्रमाणपत्र तहसील व पंचायत समिती कार्यालयात वेळेत दाखल करुनही त्यांना अपात्र ठरविण्यात आले. त्यांनी सादर केलेली ओसी त्यांच्याकडे पुरावा म्हणून आहे. तरीही अपात्र केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.