निलंगा : निलंगा तालुक्यातील हासोरी-बु. यासह परिसरातील सहा गावात मागील काही दिवसापासून येत असलेले आवाज हे भुगर्भातील आवाज नव्हे तर भुकंप असल्याचे सिध्द झाले आहे. आज पहाटे भूगर्भात झालेल्या आवाजाची २.० रिश्टर स्केल भुकंपांची नोंद झाली असल्याची माहीती मिळाली आहे. ही नोंद दिल्ली येथील राष्ट्रीय भूकंप विभागाच्या साइटवरती झाली आहे. २९ वर्षांपूर्वी लातूर जिल्ह्यातील किल्लारी गावात भूंकपा झाला होता. निलंगा तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के जावणल्याने किल्लारीच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. किल्लारी येथे ३० सप्टेंबर १९९३ रोजी ६.२ रिश्टरस्केल भूकंप झाला होता. (earthquake news in Marathi)
तालुक्यातील हासोरी गावासह अन्य सहा गावांमध्ये मागील पंधरा दिवसापासून मोठा आवाज होत होता. १२ सप्टेंबर रोजीही रात्री सव्वा दहा वाजता जमीन हादरली होती ( भूगर्भात हालचाल) भूकंपाच्या भीतीने परिसरातील लोक भयभीत झाले होते. यावरून नागरिकांनीही प्रशासनाच्या विरोधात थेट राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे कैफियत मांडली होती. भूकंप असल्याच्या भीतीने लोक रस्त्यावर रात्र जागून काढली. दुसरीकडे प्रशासन मात्र भूकंप नसल्याचा दावा करून हात झटकून मोकळे होत होते.
तालुक्यातील हासोरी गावासह परिसरातील गावात ५ आणि ७ सप्टेंबरला भूकंपा सारखा धक्का जाणवल्याची माहिती गावकऱ्यांनी लोकप्रतिनीधी आणि प्रशासनाला दिली होती. त्यानंतर लातूर येथील भूगर्भ शास्त्रज्ञांनी ७ सप्टेंबर रोजी भेट देऊन लोकांशी चर्चा केली. तसेच हा भूकंप नसून तशी कोणतीही नोंद भुकंप केंद्रात झालेली नाही, त्यामुळे लोकांनी भिऊ नये असे अवाहन केले होते.
तरीही परत सोमवारी रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांनी भूकंप झाल्याचे लोकाला जाणवल्याने. लोक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर येऊन ओरडा करू लागाले होते. हासोरी, जवळगा, ऊस्तुरी, बडूर, हरीजवळगा, भूतमुगळी, बोळेगाव या गावांतही असाच आवाज जाणवला असल्याची माहिती देत असताना या गावाला जिल्हाधिकारी स्वतः भेट देऊन नागरिकांनी शांत रहावे याबाबत लवकरच दिल्ली येथील पथकांना पाचारण केले जाईल असा विश्वास दिला होता.
भुकंप असल्याची नोंद लातूर व नांदेड येथील कोणत्याही ठिकाणी होत नसल्याने हा भुगर्भातील आवाज आहे म्हणून गावकर्यांचे समाधान करावे लागले. अखेर दोन दिवसापूर्वी दिल्ली येथील राष्ट्रीय भुकंप शास्त्र विभागाचे वैज्ञानिक डॉ. अजयकुमार वर्मा, भारतीय हवामान खात्याचे प्रमुख डॉ. राजीवकुमार चावला यांनी गावाला भेट देऊन पाहणी केली. शिवाय गेल्या पंधरा दिवसापासून
रायगड येथील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे समाधान कडू, धुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे योगेश्वर आव्हले यांनी 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबरपर्यंत गावात राहून संपूर्ण बाबीचा आभ्यास केला. त्यामध्ये शुक्रवारी २३ रोजी पहाटे ३:३८ मिनीटाला पुन्हा आवाज होऊन जमीन हादरली. या प्रकाराची नोंद वेबसाईटवर 2.0 स्केल अशी नोंद झाली असल्याने व मागील झालेले धक्केही भुकंपच असल्याचे सिध्द झाले आहे.
सध्या गावात महसूल विभागाचे व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आधिकारी रवाना झाले असून पक्या व कच्च्या घरांच्या नोंदी घेणे सुरू आहे. गावच्या दक्षिण बाजूलाच भुकंपाचे केंद्र असल्याचे सांगण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.