Ketaki Chitale Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ketaki Chitale : केतकी चितळेच्या 'त्या' पोस्टवर कायदेशीर कारवाई होणार?

गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा केतकी चितळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे

सकाळ डिजिटल टीम

मराठी मनोरंजन विश्वामध्ये नेहमीच आपल्या परखड आणि आक्रमक स्वभावामुळे आणि वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणारी केतकी चितळे ही नेहमीच तिच्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे बराच वाद निर्माण झाला होता. त्यामुळे तिला तुरुंगातही जावे लागले होतं. मात्र तरीही ती आपलं मत मांडत असते.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा केतकी चितळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी केतकीने सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. कोरेगाव-भीमा येथील ऐतिहासिक लढाईची आठवण म्हणून साजरा करण्यात येणाऱ्या शौर्यदिनाच्या निमित्ताने तिने कोरेगाव भीमा येथे शौर्य दिनाबद्दल काहीही पोस्ट न टाकल्यामूळे तिच्यावर टिका करण्यात आली, यावर केतकीने प्रतिक्रिया दिली. त्यामूळं ती पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिच्या व्हिडिओला एका नेटकऱ्यानं कमेंट करत लिहिलं होतं की ,“तमाम भारतीयांना भिमा कोरेगाव शौर्य दिनी शुभेच्छा द्याल असे वाटले होते. तुमच्याकडून आजचा दिवस दुर्लक्षित होणे अनपेक्षित आहे”.

या कमेंटवर केतकी भडकली आणि तिने त्या कमेंटवर खोचक प्रतिक्रिया दिली. ती कमेंट करत म्हणाली, “भिमा कोरेगाव म्हणजे तीच जागा जिथे ब्रिटिश सैन्यातील तुकडी पेशव्यांच्या विरोधात लढली?! ब्रिटिश सरकारच्या बाजूने मराठा सैन्याविरुद्ध लढणाऱ्या लोकांना मी शुभेच्छा देण्याची तुम्ही अपेक्षा ठेवता म्हणजे एक तर तुम्हाला मी राष्ट्रद्रोही (धर्मद्रोही) वाटते, किंवा तुम्हाला खरा इतिहास माहिती नाही. यातील नेमके काय?” केतकीच्या या प्रतिक्रियेमुळे तिच्यावर पुन्हा टिका होत आहे.

केतकीच्या या वादग्रस्त पोस्टची सरकारने तत्काळ दखल घ्यावी. तिच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते सचिन खरात यांनी केली आहे. नववर्षानिमित्त तिने सोशल मीडियावर याविषयी भाष्य केलं होतं. सचिन खरात म्हणाले, सतत केतकी चितळे वादग्रस्त पोस्ट करत आहे. भीमा कोरेगाव प्रकरणातील पोस्टची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायदेशीर दखल घ्यावी आणि तिच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आम्ही करत आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! लोकप्रिय मालिकेच्या सेटवर मोठी दुर्घटना; शुटिंगदरम्यान कॅमेरा असिस्टंटचं निधन

Latest Maharashtra News Updates : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना राहुल गांधींनी केला फोन, काय आहे कारण?

Nitin Gadkari: आमदार निवडताना जात का महत्त्वाची? नितीन गडकरींचा मतदारांना सवाल

Vastu Tips: घरात 'या' ठिकाणी ठेवा मोरपिस, कुटुंबात होईल भरभराट

व्यसनाधीन मुलाच्या त्रासाला कंटाळून बापाने डोक्यात टिकाव घालून मुलाचा केला खून, आदित्यने मुलगी पळवून आणली अन्..

SCROLL FOR NEXT