CM Eknath Shinde  Esakal
महाराष्ट्र बातम्या

अद्याप तोडगा नाहीच! OBC आरक्षणास कायदेशीर मान्यता घ्या; आमदार-खासदारांची मुख्यमंत्र्यांकडे शिफारसपत्रे

समाजबांधवांनी आमदार-खासदारांनाही भेटून याप्रश्नी माहिती देऊन त्यांच्याकरवी राज्य शासनावर दबाव आणावा, असा निर्णय झाला.

सकाळ डिजिटल टीम

आरक्षणाबाबत राज्य शासनाने वरिष्ठ ॲडव्होकेट जनरलही नियुक्त करून न्यायालयात ठोस म्हणणे सादर करावे. आरक्षणास कायदेशीर मान्यता घेऊन द्यावी, अशी मागणी केली आहे.

विटा : राज्य शासनाने ३० नोव्हेंबर १९९४ ला मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानुसार ओबीसीमधील अनेक जातींसाठी विशेष मागास प्रवर्गाची निर्मिती करीत स्वतंत्र २ टक्के आरक्षण (OBC Reservation) देण्याचा निर्णय घेतला. परंतु, हे आरक्षण ५० टक्क्यांवर जात असल्याने कायदेशीर मान्यता मिळाली नव्हती.

आरक्षण १९९४ पासून सतत वादात सापडले. अद्याप तोडगा निघालेला नाही. यूथ फॉर इक्वॅलिटी संस्थेने आरक्षण ५० टक्क्यांवर जात असल्याने रद्द करा, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) दाखल केली. राज्य शासनाने याप्रकरणी म्हणणे सादर केले नसल्याने उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी राज्याने याप्रश्नी म्हणणे सादर करण्याचे आदेश दिलेत.

विशेष मागास प्रवर्गातील विविध जातीच्या संघटनांनी १५ मे २०२३ ला पुण्यात व्यापक बैठक घेऊन संयुक्त कृती समिती स्थापन केली. न्यायालयात राज्य शासनाने म्हणणे सादर करण्यासाठी तज्ज्ञ वरिष्ठ वकील नेमावेत. १९९४ पासून प्रलंबित कायदेशीर मान्यता मिळवून द्यावी, अशा मागणीचे निवेदन राज्य शासनास देण्याचा निर्णय घेतला.

समाजबांधवांनी आमदार-खासदारांनाही भेटून याप्रश्नी माहिती देऊन त्यांच्याकरवी राज्य शासनावर दबाव आणावा, असाही निर्णय झाला. त्यानुसार पंधरा दिवसांत राज्यातील आमदार/खासदारांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्रे लिहिली आहेत. आरक्षणाबाबत राज्य शासनाने वरिष्ठ ॲडव्होकेट जनरलही नियुक्त करून न्यायालयात ठोस म्हणणे सादर करावे. आरक्षणास कायदेशीर मान्यता घेऊन द्यावी, अशी मागणी केली आहे.

संयुक्त बैठकीचे आयोजन करावे, अशीही मागणी लोकप्रतिनिधींनी केली असून मुख्यंमत्र्यांनीही तातडीने बैठक आयोजित करण्याचे आदेश दिलेत, अशी माहिती महाराष्ट्र विणकर समाज संयुक्त कृती समिती सदस्य किरण तारळेकर यांनी दिली.

१९९४ मध्ये गोवारी समाजासह इतर मागास जातींच्या संघटनांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशन काळात, नागपूर विधानभवनावर आरक्षणप्रश्नी मोठा मोर्चा काढला. चेंगराचेंगरीत ११४ आंदोलकांचा मृत्यू झाला होता. आंदोलन चिघळले. त्याची गंभीर दखल घेत तत्कालीन शासनाने मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानुसार ओबीसीमधील जातींसाठी विशेष मागास प्रवर्गाची निर्मिती करीत स्वतंत्र २ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय केला. हे आरक्षण ५० टक्क्यांवर जात असल्याने कायदेशीर मान्यता मिळाली नव्हती.

-किरण तारळेकर, सदस्य, महाराष्ट्र विणकर समाज संयुक्त कृती समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT