Legislative Council elections fight between Prasad Lad and Bhai Jagtap mumbai sakal
महाराष्ट्र बातम्या

विधान परिषद निवडणूक : प्रसाद लाड व भाई जगतापांमध्ये अस्तित्वाची झुंज

पक्षाच्या मदतीसही स्वतःची रणनीती ठरविण्याची गरज

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत पाचवी जागा खेचून आणून एकमेकांना शह देण्यासाठी भाजप आणि काँग्रेस आपापल्यापरीने समीकरणे जुळवत असली तरी या लढतीपेक्षा भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांना राजकीय अस्तित्वासाठी झुंजावे लागणार आहे. त्यामुळे पुन्हा आमदार होऊन भाजपमधील आपल्या ‘वजना’साठी धडपडणाऱ्या लाड यांना पुढचा आठवडा पायाला भिंगरी लावून मते गोळा करावी लागणार आहे. भाई जगताप यांनाही हक्काच्या मतांसह वैयक्तिक करिष्म्यावर दहा मते मिळवायची आहेत. परिणामी या निवडणुकीत लाड आणि भाई जगताप यांच्यामधील संघर्ष लक्ष वेधून घेणारा ठरणार आहे.

काँग्रेसला दुसरा उमेदवार निवडून आणताना नाकीनऊ येणार असल्याचे स्पष्ट असूनही या दोन्ही पक्षांच्या भूमिकांमुळे निवडणूक होत आहे. निवडणुकीतील विजयासाठी २७ मते आवश्यक असली; तरीही भाजपकडे लाड यांच्या विजयासाठी आठ-दहा नव्हे तर २२ मते फोडावी लागणार आहेत. राज्यसभा निवडणुकीत भाजपने धनंजय महाडिक यांच्यासाठी नऊ-दहा मते फोडली आणि सहावी जागा जिंकली. पण विधान परिषदेला शक्य नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे लाड यांच्यासाठी ही निवडणूक अग्निपरीक्षा असेल. पाच वर्षांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत लाड आणि भाई जगताप यांच्यातील सामन्यात भाई जगताप यांचा विजय झाला होता.

लाड यांना पक्ष आणि फडणवीस यांच्यासह स्वत:चीही रणनीती वापरावी लागेल. दुसरीकडे, लाड पुन्हा विधान परिषदेत आलेच तर ते भाजपमधील काही नेत्यांना डोईजड होण्याची भीतीही अनेकांना आहे. या चक्रात फसण्यापेक्षा लाड यांना एकेका मतासाठी स्वपक्षीयांसह अपक्ष, छोट्या पक्षांच्या आमदारांच्या मतांसाठी कसरत करावी लागेल. सध्या काँग्रेसची ताकद कमी असली तरी भाई जगताप हे कमी पडणारे नाहीत. भाई जगताप यांचे जुने संबंध पाहता राज्यसभा निवडणुकीत भाजपकडे झुकलेली काही मते भाईंच्याही पारड्यात पडू शकतात, याचा अंदाज लाड यांना असावा.

‘अर्थ’नीती जोमदार

ही निवडणूक जिंकण्यासाठी भाई जगताप व प्रसाद लाड हे नेते ‘अर्था’नेही सक्षम असल्याने घोडेबाजार झाला तरीही हे दोघेही कुठेच कमी पडण्याची शक्यता नाही. त्यामुळे या दोघांना समोरासमोर आणून भाजप-काँग्रेसनेही पक्षीय पातळीवरचे ओझे थोडे कमी केल्याचे दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: विधानसभा निवडणुकीत दुबईत आला पैसा, क्रिप्टोकरन्सीद्वारे बेकायदा फंडिंग; भाजपचा मविआवर खळबळजनक आरोप

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र नोंदवेल का ६५ टक्के मतदान? दहा वर्षांपासून ६० टक्केच नोंद

Women’s Asian Champions Trophy: भारतीय संघाची पाचव्यांदा फायनलमध्ये धडक; जपानला सेमीफायनलमध्ये केलं पराभूत

Hitendra Thakur: एका मताच्या जोरावर विलासराव देशमुखांचं सरकार तारणारे हितेंद्र ठाकूर; बदल्यात काय घेतलं होतं?

Anil Deshmukh : तुम्ही दगड मारा किंवा गोळ्या झाडा, अनिल देशमुख मरणार नाही, आणि तुम्हाला सोडणारही नाही

SCROLL FOR NEXT