Legislative Council Elections  
महाराष्ट्र बातम्या

Legislative Council Elections : पदवीधर-शिक्षक मतदारसंघांची निवडणूक कशी होते? अशी असते प्रक्रिया

सकाळ डिजिटल टीम

Legislative Council Elections : विधानपरिषदेच्या शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली. नाशिक, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, कोकण शिक्षक या मतदारसंघात ह्या निवडणुका होणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम जाहीर केला आहे. नुकत्याच नागपूर हिवाळी अधिवेशनात राजकीय धुराळा पाहायला मिळाला. तो संपत नाही तर आता शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे राजकीय पक्ष ताकदीने मैदानात उतरले आहेत. ही निवडणूक नेमकी कशी असते, या निवडणुकीत मतदान कोण करतं, निवडणूक प्रक्रिया कशी असते, हे आपण समजून घेऊया. (Legislative Council Elections news in Marathi)

शिक्षक, पदवीधर मतदारसंघ हे शब्द आपल्या कानावर पडले असेल. पण अन्य निवडणुकांच्या तुलनेत ही निवडणूक वेगळी असते. लोकसभा, विधानसभा मतदार संघांच्या होणाऱ्या निवडणुका आपल्याला माहित असतात. त्या चर्चेत देखील असतात. मात्र विधान परिषद सदस्यांच्या एकूण सदस्यांपैकी ७ सदस्य शिक्षक, तर ७ सदस्य पदवीधर मतदार संघातून निवडून जातात. दरम्यान २ पदवीधर आणि ३ शिक्षक मतदार संघातील रिक्त होणाऱ्या एकूण ५ जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या कार्यक्रमानुसार ३० जानेवारीला मतदान होणार असून २ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. तर ४ फेब्रुवारीला मतदानाची सर्व प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक आणि राष्ट्रपती पदासाठीची निडणूक प्रक्रीयेत काहीसे साम्य आहेत. या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन द्वारे मतदान केले जात नाही. तर बॅलेट पेपर द्वारे मतदान केले जाते. पसंती क्रमांकाच्यानुसार उमेदवार निवडले जातात.

पदवीधर मतदार संघ

पदवीधर मतदार संघातील उमदेवाराला नोंदणी आवश्यक असते. मतदार संघात हजर राहून मतदान करावे लागते. यासाठी काही निकष ठरवले जातात. मतदार भारतीय नागरीक तसेच मतदार संघाचा रहीवाशी असावा. निवडणूक जाहीर होण्याच्या तीन वर्षाआधी मतदाराने आपला पदवी अभ्यासक्रम पुर्ण केलेला असावा. यासोबत विहीत अर्ज १८ भरलेला असावा. हे मतदार मतदान करण्यास पात्र असतात.

प्रत्येक पदवीधर निवडणूक लढवण्यास पात्र असतो. प्रत्येक जिल्हाला पदवीधर मतदार सघ असतो. सर्व नोंदणीकृत पदवीधर उमेदवाराला मतदान करतात. व त्याला निवडून देतात. पदवीधर आमदाराने पदवीधरांचे प्रश्न विधानपरिषदेत मांडावे, अशी अपेक्षा पदवीधर मतदारांची असते. निवडून गेलेले उमेदवार विधानरीषदेत आमदार म्हणून काम करतात. व आपल्या भागाचे प्रतिनिधित्व करतात.

हेही वाचा: ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

शिक्षक मतदार संघ

शिक्षक मतदार संघात राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक उमेदवाराला मतदान करतात. यातून निवडून गेलेल्या शिक्षक आमदाराने विधानपरिषदेत शिक्षकांचे प्रश्न मांडावे, अशी अपेक्षा मतदार शिक्षकांची असते.

विधानपरिषदेची रचना

राज्यात विधानसभा आणि विधानपरिषद असे दोन मोठे सभागृह आहेत. यामध्ये विधानपरिषद वरीष्ठ सभागृह आहे. विधानपरिषदेत ७८ सदस्य असतात. यापैकी ३१ सदस्य विधानसभेतील आमदार निवडून देतात. तर २१ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून जातात. १२ सदस्यांची निवड राज्यपाल करतात. ७ सदस्य शिक्षक मतदार संघातून तर ७ सदस्य पदवीधर मतदार संघातून निवडून जातात. पुणे, मुंबई, कोकण, नाशिक, अमरावती, नागपूर, औरंगाबाद हे शिक्षक व पदवीधर मतदार संघ आहेत.

भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीत सामना

समाजातील प्रत्येक घटकाला विधानपरीषदेत नेतृत्व करण्याची संधी मिळावी म्हणून ही निवडणूक प्रक्रिया राबवली जाते. मात्र ही निवडणूक आता राजकीय सावटाखाली होते. प्रत्येक पक्ष ही निवडणूक प्रतिष्ठने लढतो. पक्षाशी बांधिलकी आणि विचारांशी सहमत असलेल्या शिक्षक आणि पदवीधरांना उमेदवारी दिले जाते. आता देखील होऊ घातलेल्या निवडणुकीत ५ जागांसाठी भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीत सामना होणार आहे.

राष्ट्रवादीकडून विक्रम काळे पुन्हा रिंगणात

पदवीधर मतदारसंघांमध्ये नाशिक मतदारसंघात आमदार डॉ. सुधीर तांबे आणि अमरावती मतदारसंघातून डॉ. रणजीत पाटील यांची मुदत ७ फेब्रुवारीला संपत आहे. तर शिक्षक मतदार संघापैकी औरंगाबाद, नागपूर आणि कोकणमध्ये विद्यमान आमदारांची मुदतही ७ फेब्रुवारीला संपणार आहे. त्यामुळे निवडणुका होणार आहेत. तसेच औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीकडून आमदार विक्रम काळे पुन्हा रिंगणात असणार आहेत. नागपूर शिक्षक मतदार संघात शिक्षक परिषदेने आमदार नागो गाणार यांना पुन्हा याच मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.

कोकणात चुरशीची लढत

कोकण शिक्षक मतदार संघातून शेकाप आमदार बाळाराम पाटील यांना पुन्हा पक्षाकडून संधी देण्यात आली आहे. याच मतदारसंघात शिंदे गटाच्या शिक्षक सेनेचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी देखील कंबर कसली आहे. मात्र भाजप ज्ञानेश्वर म्हात्रे यांची गोची करण्याच्या तयारीत आहे. म्हात्रे यांच्याविरोधात भाजप शिक्षक आघाडीने जोरदार लॉबिंग सुरू केली आहे. ठाणे जिल्ह्यातील विद्यमान केंद्रीय मंत्री यांच्या पुतण्याला ऐनवेळी भाजप उमेदवारी देऊ शकतो. तर माजी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांना मानणारा एक गट ऐनवेळी रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे कोकणात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्रामधील मतमोजणीपूर्वी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवण्याची तयारी सुरु

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT