Lek Ladki Yojana Maharashtra esakal
महाराष्ट्र बातम्या

Lek Ladki Yojana : आता कुटुंबात 'लेक लाडकी' ठरणार भाग्यशाली; पालकांना मिळणार एक लाख रुपये

राज्यातील विशेषतः गरीब कुटुंबात जन्मणाऱ्या लेकींसाठी योजना वरदान ठरणार आहे.

हिम्मतराव नायकवडी

पिवळे व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबातील मुलींना पाच टप्प्यात एक लाख एक हजार रुपये एवढा लाभ मिळेल.

बिळाशी : राज्य शासनाच्या एकात्मिक बाल विकास विभागाने (Ekatmik Balvikas Yojana) ‘लेक लाडकी’ योजनेच्या (Lek Ladki Yojana Maharashtra) माध्यमातून मुलीच्या (Girls) भवितव्यासाठी हातभार लावण्यासाठी तिच्या जन्मापासूनच टप्प्याटप्प्याने पालकांच्या खात्यात एक लाख एक हजार रुपये जमा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. परिपत्रकही निघाले आहे. लक्ष्मीच्या पावलांनी येणारी ‘लेक लाडकी’ भाग्यशालीच ठरणार आहे.

मुलींचा जन्मदर वाढावा, शिक्षणाला चालना मिळावी, मृत्युदर कमी व्हावा, बालविवाह रोखावेत, कुपोषण कमी व्हावे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर यावे, मुलींना, त्यांच्या पालकांना प्रोत्साहन मिळावे, मुलींचे सक्षमीकरण व्हावे, या उद्देशाने ‘लेक लाडकी’ ३० सप्टेंबर २०२३ पासून ही योजना सुरू केली आहे. योजनेच्या नोंदणीचे काम एकात्मिक बालविकास विभागाच्या वेब (Integrated Child Development Scheme) पोर्टलद्वारे लाभार्थ्यांची नोंदणी होईल. विशेषतः अंगणवाड्यांतील सेविकांकडे हे काम असेल. राज्यातील विशेषतः गरीब कुटुंबात जन्मणाऱ्या लेकींसाठी योजना वरदान ठरणार आहे.

...यांना मिळणार लाभ

थेट लाभार्थी हस्तांतरणाद्वारे (डीबीटी) लाभार्थी रक्कम संबंधित पालकांना अदा करण्यात येणार आहे. त्यांचे वार्षिक उत्पन्न लाखांपेक्षा कमी असावे, मुलीचा जन्म १ एप्रिल २०२३ नंतर झालेला असावा, एका अथवा दोन मुलींना, त्याचप्रमाणे एक मुलगा, एक मुलगी असल्यास मुलीला लाभ मिळेल. दुसऱ्या प्रसूतीवेळी जुळी अपत्ये जन्मल्यास मुलींना योजनेचा लाभ मिळेल. पिवळे व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबातील मुलींना पाच टप्प्यात एक लाख एक हजार रुपये एवढा लाभ मिळेल.

एकूण मिळणार १ लाख ५ हजार

कौटुंबिक परिवारात मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार, पहिलीत गेल्यावर ६ हजार, सहावीत गेल्यावर ७ हजार, अकरावीत गेल्यावर ८ हजार, अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार, असे १ लाख ५ हजार रुपये मिळणार आहेत.

मुलींच्या जन्माच्या स्वागतासाठी योजना पूरक ठरेल. मुलींचा जन्मदर वाढेल. शिक्षणाला आणखी चालना मिळेल. पर्यायाने मृत्युदरही कमी होईल. मुलींचे सक्षमीकरण होईल.

-सौ. छबूताई दळवी, अंगणवाडी शिक्षक.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT