Madhuca longifolia  Google
महाराष्ट्र बातम्या

मोहफुलाचा दारुसाठीच नाही, तर औषधासाठी देखील वापर होतो; जाणून घ्या 'मोहफुल' काय आहे?

'मोह' हा उष्ण, कोरड्या जमिनीत येणारा पानझडी वृक्ष असून ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.

बाळकृष्ण मधाळे

सातारा : 'मोह' हा उष्ण, कोरड्या जमिनीत येणारा पानझडी वृक्ष असून ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. मोहाची फुले (Madhuca longifolia) पहाटे गोळा करतात आणि ती वाळवून, साठवून ठेवली जातात. जेव्हा रोख पैशांची गरज असेल, तेव्हा ती बाजारात विकतात. मोहाच्या फळामध्ये असणाऱ्या बीजाला 'टोळी' असे म्हटले जाते. या बीपासून तेल काढले जाते. पूर्वीच्या काळी खाण्यासाठी मध्य भारतातील आदिवासी (Tribals In India) हेच तेल वापरत असत. अजूनही या भागातील गरीब लोक हे तेल वापरतात. फुले व फळे मार्च ते मे या कालावधीत मिळतात. या झाडाची मुळे व फांद्या इंधन म्हणून वापरतात. मोहाचे लाकूड मोठे असते. पण, जास्त काळ टिकत नाही. मोहफुले मार्च महिन्यात येतात. देवा-धर्मात, औषधात मोहफुलांचा सर्रास उपयोग होतो. या फुलांपासून दारूही काढली जाते. आदिवासींचा कल्पवृक्ष असलेल्या मोहाच्या फुला-फळांपासून भाकरीची सोय होईल इतपत पैसे मिळत असल्याने हे झाड आदिवासींसाठी वरदान ठरते आहे. सध्या उन्हाळा सुरू झाला असून वनौषधी वृक्षांना बहर आला आहे. (Lifting Of The Ban On Madhuca longifolia Benefits The People Of Tribal Areas)

काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने मोहफुलावरील बंदी उठवण्याच्या निर्णय घेतला. यामुळे जंगलालगतच्या ग्रामस्थांना, तसेच गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम भागातील आदिवासींना याचा मोठा लाभ होणार आहे.

मोहफुलाचे फायदे (Madhuca longifolia Benefits) व उपलब्धता

कोकणात जसा नारळ कल्पवृक्ष समजला जातो, तसा मोह हा आदिवासींचा कल्पवृक्ष आहे. मोहाच्या फुला-फळांपासून त्यांना रोजगार मिळतो. संपूर्ण देशात मोहफूल उत्पादन २२ लाख टन आहे. विदर्भात 5 ते 6 कोटी मोहफूल झाडे आहेत. मोहफुलामध्ये अल्कोहोलचे प्रमाण ६७.९ टक्के आहे. एक टन मोहफुलापासून सुमारे ३४० लिटर शुद्ध अल्कोहोल मिळते. मोहफुलाची केवळ दारूच काढता येते अशातला भाग नाही, तर आज मोहफुलाचे लाडू, तेल, कपडे धुण्याचे साबण, मेणबत्ती तथा सॅनिटायझर अशा विविध वस्तू तयार करता येत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. मोहफुलामध्ये प्रोटीन १.४० टक्के, खनिज ७०, काबरेहायड्रेड २२.७०, कॅलरिज १११, कॅल्शियम ४५, लोहतत्त्व २३ तर व्हिटॅमिन सी ४० टक्के असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे.

मोहफुलांचा हंगाम : जंगलव्याप्त भागात वास्तव्यास असलेल्या स्थानिक आदिवासींचे अर्थकारण भाताची शेती तसेच तेंदूपत्ता, मोहफूल तथा इतर वनउपजावर आधारित आहे. तेंदूपत्ता हंगामासोबतच (पावसाळा) मोहफुलांचा हंगामदेखील एक महिन्याचा असतो. या कालावधीत जंगलाशेजारच्या गावातील ग्रामस्थ पहाटे जंगलात जाऊन मोहफुले गोळा करतात आणि ती वाळवून, साठवून ठेवली जातात.

कोणत्या कायद्याखाली बंदी घालण्यात आली होती?

मोहफुलांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कायद्याअंतर्गत बंदी लादण्यात आली होती. लगतच्या छत्तीसगड (Chhattisgarh), मध्यप्रदेश, आसाम, बिहार (Bihar), ओडिशा येथे मोहफुलावर बंदी नाही. महाराष्ट्रात बंदी असल्यामुळे मोहफुलाची वाहतूक, गोळा करणे, ते स्वत:जवळ बाळगणे कायद्याने गुन्हा होता. मात्र, आमदार नाना पटोले (Nana Patole) यांनी विदर्भातील आदिवासींचा तसेच जंगलालगत वास्तव्य असलेल्या ग्रामस्थांचा हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय लावून धरल्याने शेवटी मोहफुलावरील बंदी मागे घेण्यात आली. यामुळे आदिवासी पाड्यातील लोकांना याचा लाभ होणार आहे.

सरकारला एवढे उत्पन्न मिळू शकेल : मोहफुलाच्या एका झाडापासून पन्नास किलो फुले मिळतात. पन्नास रुपये प्रतिकिलो प्रमाणे हा आकडा १२५० कोटीच्या घरात जातो. मोहफुलाचा वापर सेंद्रिय दारू तथा पशुखाद्य म्हणून केल्यास राज्य सरकारला एक हजार कोटीहून अधिकचे उत्पन्न होऊ शकते, असे अभ्यासकांचे मत आहे. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवरचा भार हलका होणार आहे.

यापूर्वी चोरून होत होती मोहफुलाची विक्री : पूर्वी व्यापारी पोलिस तथा वन विभागाच्या कारवाईच्या भीतीने लपूनछपून हा व्यापार करत होते. जंगलाशेजारच्या गावातील ग्रामस्थ पहाटे जंगलात जाऊन मोहफुले गोळा करतात. अभ्यासकांच्या मते साधारणत: एक कुटुंब ५० किलो ते एक क्विंटल मोहफुले गोळा करतात. ही गोळा केलेली मोहफुले व्यापाऱ्याला विक्री करतात. महाराष्ट्रातील नव्वद टक्के मोहफूल छत्तीसगड, झारखंड, मध्यप्रदेशात दारू तयार करण्यासाठी पाठवले जातात. यामुळे राज्य शासनाचा कोट्यवधीचा कर बुडत होता. मात्र, आता बंदी उठल्यानंतर या सर्व गोष्टींचा फायदा होणार आहे.

Lifting Of The Ban On Madhuca longifolia Benefits The People Of Tribal Areas

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Patil: पवारांची साथ मिळूनही हर्षवर्धन पाटलांसाठी निवडणूक सोप्पी नाही? घरातूनच बसला धक्का

Pune News : नव्या पाहुण्यासाठी हवा सरकारी दवाखाना; खासगीपेक्षा अधिक पसंती, अडीच वर्षांत ६९ हजार प्रसूती

Sakal Podcast: अमेरिकेत ट्रम्प येणार की हॅरिस? ते अर्जुन तेंडुलकर CSK च्या जर्सीत दिसणार?

आपापल्या उमेदवारांसाठी ‘हे’ १७ बडे नेते सोलापुरात! पंतप्रधान मोदी, राहुल गांधी, शरद पवार, योगी, रेवंथ रेड्डी, सिद्धरामय्या, उद्धव व राज ठाकरे, ओवैसी यांच्या प्रचारसभा, वाचा...

कौटुंबिक वारसा जपताना...

SCROLL FOR NEXT