solapur
शेतात पाणीच पाणी. सकाळ
महाराष्ट्र

लोकसभा निवडणुकीप्रमाणे सोलापुरातील ‘या’ तालुक्यात पाऊसही लिडवर! ‘या’ 19 महसूल मंडळांमध्ये सर्वाधिक पाऊस; 4 दिवसांत उजनी धरणात वाढले 3 टीएमसी पाणी

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्ह्यात ५ जूनपासून पावसाला सुरवात झाली असून मागील दोन दिवसांत जिल्ह्यात संततधार सुरू आहे. जिल्ह्यातील १०१ महसूल मंडलांपैकी १९ मंडलांमध्ये ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. दुसरीकडे अद्याप करमाळा, माढा, पंढरपूर, मंगळवेढा व माळशिरस या पाच तालुक्यांमध्ये इतर तालुक्यांच्या तुलनेत पाऊस कमीच झाला आहे.

उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी (१०४.३ मिमी), मोहोळ तालुक्यातील नरखेड (१०० मिमी) व सावळेश्वर (१११.१ मिमी) व मोहोळ (१२५.६ मिमी) या चार महसूल मंडळांमध्ये मागील दोन दिवसांत (सोमवार व मंगळवार) सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. जिल्हाभरात ५ ते ११ जून या काळात सरासरीच्या तुलनेत १४६.८ टक्के म्हणजेच १५०.५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यात मागील तीन दिवसांपासून कमी- अधिक प्रमाणात संततधार सुरूच आहे. कोरड्याठाक नद्यांमध्ये पाणी आले असून लघू-मध्यम प्रकल्पांमध्येही पावसाचे पाणी साचले आहे. ओढे-नाल्यांनाही पाणी आले असून ठिकठिकाणी पाण्याचे डोह साचल्याची स्थिती आहे. सध्या जिल्ह्यातील पावसामुळे दुष्काळाने होरपळलेल्या जमिनीला दिलासा मिळाला असून पेरणीसाठी आता पोषक वातावरण तयार झाले आहे.

दोन दिवसांत ‘या’ मंडलांमध्ये सर्वाधिक पाऊस

१० जून व ११ जूनच्या सकाळी आठ वाजेपर्यंत मार्डी, वडाळा, सोलापूर, मंद्रूप, निंबर्गी, आगळगाव, वैराग, पांगरी, पानगाव, नारी, कामती, टाकळी, पेनूर, नरखेड, सावळेश्वर, शेटफळ, मोहोळ, सांगोला (कोळा) व मंगळवेढा (मारापूर) या १९ महसूल मंडलांमध्ये ६५ मिलिमीटरहून जास्त पाऊस झाल्याची नोंद कृषी विभागाकडे झाली आहे.

चार दिवसांत उजनीत तीन टीएमसी पाणी

जिल्ह्यातील विशेषत: धरण परिसरातील पावसामुळे मागील चार दिवसांत सोलापूर, नगर, पुणे (इंदापूर, बारामती) जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात तीन टीएमसी पाणी वाढले आहे. धरणात सध्या दौंड व स्थानिक परिसरातून तीन हजार ७०० क्युसेकचा विसर्ग जमा होत आहे. उन्हाळ्यात उणे ६० टक्क्यांवर पोचलेले धरण आता उणे ५४.५० टक्क्यांपर्यंत आले आहे.

तालुकानिहाय आतापर्यंतचा पाऊस (मिमीमध्ये)

तालुका एकूण पाऊस

  • उत्तर सोलापूर १७५.८

  • दक्षिण सोलापूर १०९.३

  • बार्शी १३१

  • अक्कलकोट ८५.२

  • मोहोळ २२८.९

  • माढा १६३.९

  • करमाळा १८९.६

  • पंढरपूर १७३.६

  • सांगोला १६७.७

  • माळशिरस ११४.१

  • मंगळवेढा १३५.८

  • एकूण १५०.५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat Bus Accident: सापुतारा घाटात भयानक अपघात! 70 प्रवासी असलेली बस कोसळली, दोन मुलांचा मृत्यू

Jagannath Rath Yatra 2024: पुरीमध्ये जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी; 400 हून अधिक भाविक जखमी

MS Dhoni Birthday: 'भाईजान'सोबतच्या वाढदिवशी धोनीला CSK च्या कर्णधाराचा आला व्हिडिओ कॉल, Photo व्हायरल

Mahua Moitra FIR: बेताल वक्तव्य भोवलं! महुआ मोईत्रांविरुद्ध नवीन कायद्यानुसार गुन्हा, जाणून घ्या काय आहे प्रकरण

महिलेला वाचवण्यासाठी ११ ते १२ वर्षांच्या मुलींनी तलावात घेतल्या उड्या, महिला वाचली पण ४ मुलींचा मृत्यू

SCROLL FOR NEXT