Literary and Former MLA Ramdas Futane esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : महाराष्ट्रात मिशा पिळायच्या अन् दिल्लीला साडी नेसून जायचं; 'या' साहित्यिकानं कोणावर साधला निशाणा?

राजकारणात पैशाला महत्त्व आले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न ७५ वर्षे सुटलेले नाहीत.

सकाळ डिजिटल टीम

अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प गुजरातला गेल्याने राज्यात बेरोजगारी वाढली.

कऱ्हाड : ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला सुसंस्कृतपणा दिला. विलासराव उंडाळकर काकांच्या राजकारणातही संस्कृतपणा होता. काका हा माणसातला माणूस होता. आयुष्यभर त्यांनी माणसे जोडण्याचे काम करून राजकारणातला सुसंस्कृतपणा जपण्याचे काम त्यांनी शेवटपर्यंत केले, असे मत साहित्यिक व माजी आमदार रामदास फुटाणे यांनी केले.

माजी सहकारमंत्री (कै.) विलासराव पाटील उंडाळकर यांच्या ८५ व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते (Ramdas Futane) बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार श्रीनिवास पाटील होते.

रयत साखर कारखान्याचे अध्यक्ष ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, कवी इंद्रजित घुले, इंद्रजित चव्हाण, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, दादा उंडाळकर स्मारक समितीचे विश्वस्त गणपतराव कणसे, ज्येष्ठ नेते दादासाहेब गोडसे, पुरुषोत्तम माने, शेती मित्र अशोकराव थोरात, निवासराव थोरात, बंडानाना जगताप आदी उपस्थित होते.

फुटाणे म्हणाले, ‘‘सर्व राजकीय पक्ष अस्थिर आहेत. महाराष्ट्राची विचित्र परिस्थिती आहे. राजकारणात पैशाला महत्त्व आले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न ७५ वर्षे सुटलेले नाहीत. महाराष्ट्रात मिशा पिळायच्या अन् दिल्लीला साडी नेसून जायचे अशी राजकारणाची स्थिती आहे. अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प गुजरातला गेल्याने राज्यात बेरोजगारी वाढली.

सत्ता शेतकरी, गरीब, कामगार, रोजगार, मजूर यांच्यासाठी वापरली गेली पाहिजे. मात्र, प्रत्यक्षात धर्मांधता वाढवण्यासाठी तिचा वापर होत आहे. देशातील अर्थव्यवस्था २० टक्के कुटुंबाच्या ताब्यात आहे. मात्र, ८० टक्के कुटुंबाच्या पदरी आज ही निराशा आहे. एकदा आपल्या शेतकऱ्याला सहा हजार दिले आणि सगळे खूष झाले; पण डिझेल, पेट्रोलमधून किती पैसे काढले. गॅसमधून किती पैसे काढले, त्याचा हिशोब कोणीच करत नाही.’’

खासदार पाटील यांनी ग्रामीण भागातील, डोंगरदऱ्यातील जनतेच्या डोळ्यातील अश्रू पुसणारा निःस्वार्थी नेता म्हणून काकांचा महाराष्ट्रभर नावलौकिक आहे. त्यांनी आजपर्यंत जे कमावले ते स्वतःसाठी नसून केवळ गोरगरीब सर्वसामान्य जनतेसाठीच मिळवले आणि ते उदार हस्ते जनतेला वाटूनही टाकले. असा निःस्वार्थी नेता शोधूनही सापडणार नाही, असे सांगितले. अॅड. पाटील-उंडाळकर यांनी प्रास्ताविक केले. गणपतराव कणसे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Firing On School Van: उत्तर प्रदेशात देशाला हादरवणारी घटना! स्कूल व्हॅनवर तरुणांकडून गोळीबार

Chh. Sambhajinagar Assembly Election 2024 : छत्रपती संभाजीनगर ‘वंचित’ मतांमध्येही आघाडी घेणार का?

IND vs NZ 2nd Test : ७ बाद १०३ धावा! Yashasvi Jaiswal ने इतिहास रचला, पण विराटसह इतरांनी पार केला कचरा

भारत स्वातंत्र्यानंतर मुंबई इलाख्यात कोल्हापूर अन् पहिल्या आमदारांपैकी बाबासाहेब खंजिरेंनाच मिळाली पुन्हा संधी!

IND vs NZ: काल अ‍ॅक्टींग करत मैदान गाजवले, आज ९व्या चेंडूवर त्रिफळे उडाले! Virat Kohli चे दोन भिन्न Video

SCROLL FOR NEXT