राहुल नगर sakal
महाराष्ट्र बातम्या

सुलतानपूर गावाचे 'राहुल नगर' असे नामकरण, 26/11 हल्ल्यातील वीरपुत्राला वाहिली श्रद्धांजली

शहीद झालेल्या जवानाच्या नानावरून गावाचे नावं बदलेले आहे.

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रातील सुमारे 1,000 लोकसंख्या आणि 600 घरे असलेल्या सुलतानपूर गावातील लोकांनी 2008 मध्ये 26/11 च्या मुंबई हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या जवानाच्या नानावरून गावाचे नावं बदलेले आहे. गावकऱ्यांनी गावाचे नावं 'राहुल नगर' असे बदलले आहे. राज्य राखीव पोलीस दलातील हवालदार राहुल शिंदे यांनी 14 वर्षांपूर्वी या दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त केली होती. दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याची बातमी मिळताच दक्षिण मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेलमध्ये प्रथम पोहोचलेल्या आणि प्रवेश करणाऱ्या पोलिसांमध्ये राहुल शिंदे यांचाही समावेश आहे.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

दहशतवाद्यांनी राहुल शिंदे यांच्या पोटात गोळी झाडली आणि त्यांना प्राण गमवावे लागले. राहुल शिंदे हे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील सुलतानपूर गावचे रहिवासी होते. त्यांच्या सर्वोच्च बलिदानाबद्दल सरकारने त्यांना मरणोत्तर राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान केले. सुलतानपूरच्या रहिवाशांनी राहुल शिंदे यांच्या स्मरणार्थ गावाचे नावं बदलण्याचा निर्णय घेतला.

राहुल शिंदेचे वडील सुभाष विष्णू शिंदे यांनी 26/11 हल्ल्याच्या एक दिवस आधी पीटीआयला सांगितले की, "गावाचे नाव बदलण्याची सर्व अधिकृत औपचारिकता पूर्ण झाली आहे. आता आम्ही अधिकृत नाव बदलण्याच्या कार्यक्रमाची वाट पाहत आहोत." ते म्हणाले, "आम्ही मान्यवरांकडून तारीख निश्चित होण्याची वाट पाहत आहोत आणि लवकरच ते निश्चित केले जाईल."

दहशतवादी हल्ल्याच्या वेळी मुंबईचे पोलिस उपायुक्त असलेले विश्वास नांगरे पाटील यांनी या प्रक्रियेत मला मदत केल्याचे त्यांनी सांगितले. सुभाष विष्णू शिंदे म्हणाले, “मी गेली 10 वर्षे यावर काम करत आहे. अखेर ते घडले. मी आता समाधानी आहे आणि मला दुसरे काहीही नको आहे. हे गाव माझ्या मुलाच्या नावाने ओळखले जाईल याचा मला अभिमान वाटतो.

आपल्या मुलाच्या बलिदानाचा उल्लेख करताना ते म्हणाले की, दहशतवाद्यांशी लढताना त्याने धैर्य दाखवले आणि देशासाठी बलिदान दिले. ते म्हणाले, मला माझ्या मुलाचा अभिमान आहे.

ते म्हणाळे, “राहुलची आई अजूनही दुःखामध्ये आहे. ती अजूनही परिस्थितीनुसार स्वत:ला सावरू शकली नाही, राहुल आता या जगात नाही हे अजूनही तिला मान्य नाही.” ते म्हणाले, “राहुल शहीद झाल्यानंतर सरकारने आम्हाला नियमानुसार आर्थिक मदत केली. आम्हाला मुंबईत फ्लॅट आणि तालुक्यात गॅस एजन्सीही मिळाली, ज्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.” शिंदे कुटुंबाने 2010 मध्ये गावात राहुलच्या नावाने एक स्मारकही बांधले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT