Chief Minister Eknath Shinde  esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : ''आता त्याग पुरे झाला, मित्रपक्षांना आणखी जागा सोडू नका..'', मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत पदाधिकारी आक्रमक

सकाळ वृत्तसेवा

Lok sabha election 2024 : महायुतीमधील जागावाटपावरून शिवसेनेची (शिंदे गट) झालेली कोंडी कायम असतानाच शनिवारी याच गटातील मंत्री आणि आमदारांनीही मात्र आता त्याग पुरे झाला.. मित्रपक्षांना आणखी जागा सोडू नका अशी गळ थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच घातली. भाजपने मोठ्या भावाप्रमाणे वागायला हवे अशी भावना यावेळी अनेकांकडून व्यक्त करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांनी मात्र समन्वयाची भूमिका कायम ठेवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशामध्ये भाजपखालोखाल शिवसेनेचा देखील मोठा वाटा असायला हवा, असे आवाहन उपस्थितांना केले. छत्रपती संभाजीनगर, ठाणे, नाशिक, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, पालघर आणि मुंबईतील दोन जागा आपल्याला मिळायलाच हव्यात असे सांगत उपस्थित मंत्री आणि नेत्यांनी आता त्याग पुरे झाला अशी भूमिका घेतली. मुख्यमंत्री या नात्याने राज्यातील महायुतीचे कर्णधार आपण आहात, त्या भूमिकेतूनच धाराशीव, परभणी हे दोन लोकसभा मतदारसंघ आपण मित्र पक्षांना सोडले. आता मात्र बस्स झाले..! अशी भावना अनेक नेत्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तब्बल दोन तास शिवसेनेच्या कोअर समितीची बैठक सायंकाळी पार पडली. या बैठकीला मंत्री आणि आमदार उपस्थित होते.

आम्हाला गृहीत धरले जाते

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाला भाजप उदार अंत:करणाने सर्व मदत करीत आहे पण वैचारिक मित्र असतानाही आम्हाला मात्र गृहीत धरले जाते. याबाबतच्या आमच्या तीव्र भावना भाजपकडे पोहोचवाव्यात, अशी विनंती यावेळी उपस्थित नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना केली. शिंदे यांनी सर्व सहकाऱ्यांच्या भावना लक्षात घेत योग्य ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले.

विभागनिहाय समित्या नेमणार

नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण निवडणूक लढवीत आहोत याचा विसर पडू देऊ नका. महाराष्ट्रात उत्तरप्रदेशाखालोखाल सर्वाधिक जागा आहेत अन् त्या जिंकवून देणे ही आपलीही जबाबदारी असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी नेत्यांना समजावून सांगितले. ज्या जागांवर राष्ट्रवादी कॉँग्रेस मदत करत नाही किंवा भाजपकडून अधिक सहकार्य अपेक्षित आहे अशा सर्व जागांवर समन्वयासाठी विभागनिहाय समित्या नेमल्या जाणार आहेत. उमेदवार बदल तसेच जागांबाबत सुरू असलेला घोळ यामुळे शिंदे गटाचे खासदार आमदार तसेच प्रमुख कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले आहेत. या नाराजीची दखल घेत आजची बैठक बोलाविण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT