Lok Sabha Election 2024 eknath shinde Shivsena BJP conflicts over seat sharing political news 
महाराष्ट्र बातम्या

Lok Sabha Election : भाजपचं सर्वेक्षण शिंदे गटाच्या अंगलट; विद्यमान खासदारांच्या जागा बळकावत असल्याचा होतोय आरोप

शिंदे गटाचे अनेक विद्यमान खासदार व काही ज्येष्ठ नेते खाजगीत भाजपचे तथाकथित सर्वेक्षण आमच्या अंगलट आल्याचे मान्य करत हे सर्वेक्षण भाजप सोईप्रमाणे वापरत असल्याचा आरोप करत आहेत.

महेश जगताप

मुंबई, ता.२: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील (एकनाथ शिंदे गट) काही विद्यमान खासदारांना तिकीट मिळवण्यासाठी प्रचंड खास्ता खाव्या लागत असल्याचे चित्र, जागा वाटपातही इच्छेप्रमाणे जागांची संख्या मिळत नसल्याने शिंदे गटातील अनेक दिवसांपासूनची मनामध्ये असणारी खदखद बाहेर पडायला सुरुवात झाली आहे. शिंदे गटाचे अनेक विद्यमान खासदार व काही ज्येष्ठ नेते खाजगीत भाजपचे तथाकथित सर्वेक्षण आमच्या अंगलट आल्याचे मान्य करत हे सर्वेक्षण भाजप सोईप्रमाणे वापरत असल्याचा आरोप करत आहेत.

शिंदे गटाचे माजी मंत्री सुरेश नवले यांनी भाजपवर सणसनाटी आरोप करताना भाजप मित्रपक्षांना संपवत आहे. आम्ही राजकीय आयुष्य पणाला लावून तुमच्यासोबत आलो आहोत तर मग बाकी कारणे द्यायचा संबंधच कुठे येतो? आम्ही निवडून येवो किंवा न येवो हा आमचा प्रश्न आहे. जो आपण शब्द दिला होता तो भाजपने पाळायला हवा. मात्र भाजप सर्वेक्षणाच्या  नावाखाली शिंदेंना फसवतंय, असाही आरोप नवले यांनी केला आहे.

ते पुढे म्हणाले की त्यांच्याकडून आमचे उमेदवार बदलण्यासाठी वारंवार सर्वेक्षणाची कारणे दिली जात आहेत. आमचा अहवाल विरोधात आहे, त्यामुळे तुम्ही उमेदवार बदला, ही भाजपची मागणी चुकीची आहे. भाजपला जे नको आहेत. ते लोक बदलले पाहिजेत. यासाठीच त्यांचा आग्रह आहे. यावर शिंदे गटातील ही अनेक नेत्यांशी संपर्क साधला असता यातील अनेक विद्यमान खासदारांनी व नेत्यांनी हा आरोप एक प्रकारे मान्यच केला आहे. जो तो पक्ष आपल्या धोरणानुसार सर्वेक्षण करत असतो. आपले सर्वेक्षण इतर पक्षांवर लादण्याचा कोणत्याही पक्षाला अधिकार नाही. हे सर्वेक्षण आमच्या अंगलट आले आहे, अशीही माहिती नवले यांनी ‘सकाळ’ची बोलताना दिली.

अर्जुन खोतकर यांचीही नाराजी


काही दिवसांपूर्वीच शिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनीही भाजपच्या सर्वेक्षणावर नाराजी व्यक्त केली होती. ‘सकाळ’ने खोतकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही आपण व्यक्त केलेली नाराजी योग्य होती, असे मत पुन्हा व्यक्त केले.

भाजप ‘आयबी’मार्फत सर्वेक्षण करत आहे, असे सांगितले जात आहे. आता या ‘आयबी’चे प्रमुख भाजपचे गृहमंत्री अमित शहा आहेत. मग हा भाजपचाच रिपोर्ट झाला ना. मग हे एका पक्षाच्या हिशोबानेच होत आहे. त्यामुळे या सर्वेक्षणाला काही अर्थ नाही. या सर्वेक्षणाच्या नावाखाली आमची चांगली लोकं टाळण्याचा प्रयत्न होत आहे. हिंगोली, नाशिक, हातकणंगले, यवतमाळ- वाशिम या जागेवर उद्भवलेले प्रश्न हा भाजपच्या सर्वेक्षणाचाच परिणाम आहे.
- सुरेश नवले (माजी मंत्री, शिवसेना शिंदे गट)

भाजपच्या सर्वेक्षणावर शिंदे गट का नाराज?


- शिंदे गटाच्या अनेक जागांवर भाजपचा दावा
- अनेक विद्यमान खासदारांना अहवाल नकारात्मक असल्याचे सांगितल्याने खासदारांच्या पोटात गोळा.
- तिकीट मिळवण्यासाठी खासदारांची पळापळ
- वीस ते बावीस जागांची मागणी असताना तेरा ते १४ जागावर शिंदे गटाची बोळवण
- असाच प्रकार विधानसभेच्याही निवडणुकीत होण्याची शिंदे गटाला धास्ती.
- शिंदे गटाचे मतदारसंघ महायुतीच्या इतर घटक पक्षांना देण्याचा भाजपचा डाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

SCROLL FOR NEXT