Prakash Ambedkar esakal
महाराष्ट्र बातम्या

Prakash Ambedkar : 'मविआ'चं ठरलं! पण प्रकाश आंबेडकरांकडून उद्धव ठाकरेंना 'या' अपेक्षा; थेटच बोलले...

संतोष कानडे

Loksabha election 2024 : महाविकास आघाडीचं अंतिम जागावाटप झालं आहे. राज्यातील ४८ जागांपैकी २१ जागांवर शिवसेना आपले उमेदवार उभे करेल तर काँग्रेस १७ आणि शरद पवार गट १० जागांवर निवडणूक लढवणार आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी वंचितच्या मुद्द्यावरुन उत्तर देताना प्रकाश आंबेडकरांबद्दल अपेक्षा व्यक्त केली आहे.

अंतिम जागावाटप जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही सर्वांना सोबत घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आमच्यासोबत अनेकजण आलेत, पण ज्यांनी एकही जागा न मागता पाठिंबा दिला, मी त्यांचे आभार मानतो. प्रकाश आंबेडकर यांनी जरी काही म्हटलं तरी मी त्यांच्यावर काही बोलणार नाही.. त्यांच्याविषयी आमच्या मनामध्ये प्रेम आहे.

''संविधान वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका घ्यायला हवी'' अशी अपेक्षा उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, परंतु आता ते शक्य झालं नाही पण पुढे बघू. असं म्हणून त्यांनी प्रकाश आंबेडकरांवर जास्त बोलणं टाळलं.

दरम्यान, इथून पुढे महाविकास आघाडीचे नेते आंबेडकरांच्या टीकेला उत्तर देतील, असं वाटत नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी चंद्रपूर येथे जाहीर सभा झाली. या सभेमध्ये पंतप्रधानांनी खरी शिवसेना आमच्यासोबत असून डुप्लिकेट शिवसेना तिकडे आहे, असं म्हटलं होतं. त्यावर उद्धव ठाकरेंनी भाजप आणि नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, काल सूर्यग्रहण, अमावस्या आणि त्यांची सभा होती, विचित्र असं चित्र काल बघायला मिळालं. कालचं त्यांचं भाषण भेकड पार्टीचं भाषण होतं.

''पंतप्रधान पदाचा आम्ही अवमान करणार नाही. आम्हाला नकली शिवसेना म्हणाले.. यांचा पक्ष हा खंडणीखोर पक्ष आहे... अमित शाह लोटांगण घालायला आले होते, तुम्हाला विसर पडला असेल पण जनतेला पडणार नाही, खंडणीखोर पक्षाच्या नेत्यांनी आम्हाला नकली शिवसेना म्हणायचं नाही'' असा सज्जड दम ठाकरेंनी दिला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

  • प्रकाश आंबेडकर यांना काही जागा देऊ केल्या होत्या

  • आता ते काही जरी बोलले तरी आम्ही काही बोलणार नाही

  • आम्हाला अजूनही त्यांच्याबद्दल आदर आहे

  • काल जे भाषण झालं ते पंतप्रधान यांचं नव्हतं , ते भेकडं जनता पक्षाचे नेते मोदी यांचं होतं

  • भ्रष्ट तितुका मेळवावा, भाजप पक्ष वाढवावा.. असा भाजप पक्ष झाला आहे

  • जेव्हा शिवसेना निर्माण झाली, तेव्हा ते मोदी हिमालयात असतील

  • यांचा भाजप पक्ष खंडणीखोर आहे. चंदा दो धंदा लो.. असं यांचं काम आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK : Ramandeep Singh चा अविश्वसनीय झेल; पाकिस्तानी खेळाडू बघतच बसले, फलंदाजाने मारला डोक्यावर हात Video Viral

Delhi Bullet Fire: दिल्लीतील वेलकम मार्केटमध्ये जीन्स विक्रेत्यांमध्ये पैशांवरुन राडा! बंदुकीचे 17 राऊंड फायर, तरुणी जखमी

Nashik Rain: नाशिकच्या चांदवडमध्ये तुफान पाऊस! तामटीचा पाझर तलाव फुटला; नागरिकांचं स्थलांतर

IND vs PAK : दे दना दन...! तिलक वर्माच्या संघातील फलंदाजांनी पाकिस्तानची केली धुलाई

Ambernath Vidhansabha: राष्ट्रीय समाज पक्षाकडून अंबरनाथसाठी रुपेश थोरात यांच्या नावावर अखेर शिक्कमोर्तब!

SCROLL FOR NEXT