Prakash Ambedkar Asaduddin Owaisi  esakal
महाराष्ट्र बातम्या

प्रकाश आंबेडकर अन् ओवेसींनी बिघडवला मविआचा खेळ? नाहीतर BJP ला मिळाल्या असत्या फक्त 11 जागा! मतांचे गणित समजून घ्या...

Sandip Kapde

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने 13 जागा जिंकल्या. महाविकास आघाडीला आणखी चांगली कामगिरी करता आली असती, असा विश्वास काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाटे  यांनी व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्षामुळे महाविकास आघाडीला फटका बसला असल्याचे सुप्रिया श्रीनाटे म्हणाल्या.

महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर आणि एआयएमआयएममुळे सहा जागा भाजपला मिळाल्या. विजयासाठी आवश्यक असलेल्या मतांपेक्षा वंचित आणि एएआयएमआयएमला जास्त मते मिळाली. 1 काँग्रेस तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या 5 जागांवर पराभव मिळाला. नाहीतर राज्यात महाविकास आघाडीला 48 जागांपैकी 31 नाही तर 37 जागा मिळाल्या असत्या. तर भाजपला 11 जांगावर समाधान मानावे लागले असते.

सहा जागांचे गणित काय?

सुप्रिया श्रीनाटे म्हणाल्या की, अकोल्यात इंडिया आघाडीला 416404 मते मिळाली तर एनडीएला 457030 आणि वंचितला 276747 मते मिळाली. ही जागा महाविकास आघाडीने 40626 मतांनी गमावली. संभाजीनगरच्या जागेवर आघाडीला 93450 मते मिळाली, NDA ला 476130 तर ओवेसींच्या AIMIM ला 341480 मते मिळाली. महाविकास आघाडीनेही ही जागा 182680 मतांनी गमावली. बुलढाण्यात आघाडीला 320388 मते, एनडीएला 349867 मते मिळाली, तर वंचितला 98441 मते मिळाली. महाविकास आघाडीनेही ही जागा 29479 मतांनी गमावली.

हातकणंगले, मुंबई उत्तर पश्चिम आणि पालघरच्या जागांवरही असेच गणित आहे. इंडिया आघाडीने हातकणंगलेची जागा 13426 मतांनी गमावली. या जागेवर वंचितला 32696 मते मिळाली. सर्वात रोचक लढत मुंबई उत्तर पश्चिम जागेवर पाहायला मिळाली.

इंडिया आघाडीला मुंबई उत्तर पश्चिम जागेवर केवळ 48 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. येथून वंचितला 10052 मते मिळाली. पालघरच्या जागेवर 'इंडिया' आघाडीचा 183306 मतांनी पराभव झाला. येथून वंचितला 254517 मते मिळाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT