Lok Sabha elections 2024 people above 80 years of age and with disabilities able to vote from home  
महाराष्ट्र बातम्या

Lok Sabha Election 2024 : लोकसभेसाठी पहिल्यांदाच घरी बसून करता येणार मतदान; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची माहिती

Lok Sabha Election Latest Update : आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या तयारीला सध्या जोमाने सुरूवात झाल्याचे पाहायला मिळत आहे.

रोहित कणसे

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या तयारीला सध्या जोमाने सुरूवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीय पक्ष मोर्चेबांधणीला लागले असून निवडणूक आयोगाकडून देखील तयारी केली जात आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी वातावरण निर्मीती होत असतानाच एक महत्वाची बातमी समोर आली आहे. या आगामी निवडणुकीत आता पहिल्यांदाच घरी बसून मतदान करता येणार आहे. याला परवानगी देण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

त्यांनी सांगितलं की, लोकसभा निवडणुक लवकरच जाहीर होतील. मात्र निवडणूक पूर्वतयारी दीड दोन महिन्यांपूर्वी सुरू झाली असल्याचे श्रीकांत देशपांडे यांनी सांगितलं. निवडणूकांच्या तयारीबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की, सध्या जिल्हयातील निवडणूक कार्यालयाना भेट देणे सुरू आहे. पुण्यात पहिली भेट आहे. यावेळी तयारी पाहणी दौरा तसेच आढाव बैठक घेतल्याचे श्रीकांत देशपांडे म्हणाले.

या आगामी निवडणूकीमध्येकाही धोरणात्मक बदल झाले असल्याचे देखील त्यांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच घरी बसून मतदान करता येणार आहे, त्याला परवानगी देण्यात आली आहे, ८० वर्षांपेक्षा जास्त, दिव्यांग व्यक्ती यांना आता घरी बसून मतदान करता येणार आहे असे श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले.

निवडणूक जाहीर झाली की, १२ड फॉर्म या लोकांना पर्याय निवडण्यासाठी असतील, त्यांना घरपोच फॉर्म दिला जाईल. त्यांच्याकडून ऑप्शन घेऊन जिल्हाधिकारी यांना देण्यात येईल. मतदान होईल त्याअगोदर त्यांचे मतदान करून घेण्यात येईल, मतदान मोठा उत्सव आहे. मतदान केंद्रावर येऊन करण्यासाठी आम्ही वृद्धाना सांगणार आहोत, त्यांच्याकडे पाहून मतदानाला लोक बाहेर पडतील असेही देशपांडे यांनी सांगितले.

तसेच यावेळी त्यांनी घर बसून मतदान करण्याचा प्रयोग कसबा पोट निवडणूकीत करण्यात आला होता, असेही यावेळी सांगितलं. त्यामुळे घरी बसून व्हीडीओ रेकॉर्ड करून मतदान करता येणार आहे. कोणी मतदानापासून वंचित राहू नये यासाठी आमचा प्रयत्न आहे असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला

Women’s Health Tips : गर्भाशयाचा आजार असेल तर शरीरात दिसतात ही लक्षणं, अनेक महिला करतात दुर्लक्ष

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

SCROLL FOR NEXT