Beed Loksabha Election 2024  esakal
महाराष्ट्र बातम्या

Beed Loksabha Election 2024 : ...तर बीडमधून पंकजा मुंडेंना ज्योती मेटे तगडी फाईट देऊ शकतील; शरद पवारांची नेमकी खेळी काय?

निवडणूक आयोगाने १८ व्या लोकसभा निवडणुकांसाठी वेळापत्रक जाहीर केल्याने आता सर्वच राजकीय पक्षांची धावपळ वाढली आहे. महायुती आणि महाआघाडी यांच्यात अजूनही जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. यामध्ये भाजपने २० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.

Yash Wadekar

Beed Loksabha Election 2024

निवडणूक आयोगाने १८ व्या लोकसभा निवडणुकांसाठी वेळापत्रक जाहीर केल्याने आता सर्वच राजकीय पक्षांची धावपळ वाढली आहे. महायुती आणि महाआघाडी यांच्यात अजूनही जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. यामध्ये भाजपने २० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. पंकजा मुंडेंना बीड मतदारसंघातून उमेदवारी देत, त्यांचे राजकीय पुर्नवसन केल्याचे बोललं जात आहे. आता महाविकास आघाडी बीडमधून कोणाल उमेदवारी देणार यावरून पंकजा मुंडेंचा दिल्लीचा प्रवास सुखकर होणार की खडतर होणार, हे समजेल.

बीड लोकसभेची जागा महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुटणार आहे. त्यामुळे शरद पवार बीडमधून कोणाला उमेदवारी देतात. याची बीडकरांमध्ये उत्सुकता वाढली असतानाच, ज्योती मेटेंनी शरद पवारांची भेट घेतल्याची बातमी आली आणि पवारांचा डाव काय असू शकतो याचा अंदाज बांधणे सुरू झाले. बीडमध्ये नेमकं काय घडतंय? पंकजा मुंडेंना लोकसभा अवघड जाणार का? हे पाहाणं औत्सुक्याचं आहे.

बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडेंना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राजकीय वादातून लांब गेलेले बहिण भाऊ, महायुतीत तिसरं चाकं जोडल्या गेल्याने पुन्हा एकत्र आल्याचं चित्र आहे. धनंजय मुंडेंच्या साथीने पंकजा मुंडेंचा विजय सोपा झाला, असं अनेकांना वाटत आहे. पण ही लढाई शरद पवारांच्या निर्णयावर अलबंवून आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने महाराष्ट्रभर सरकार विरोधी वातावरण तयार झाल्याचे मत राजकीय विश्लेषक मांडत आहेत. त्यातही मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा जास्त आक्रमक होऊ शकतो. या सर्व बाबी लोकसभा निवडणुकीसाठी महत्तावाच्या असताना, ज्योती मेटेंनी शरद पवारांची भेट घेतल्याने बीडमधील लढाई अटीतटीची होणार हे सिद्ध झाले आहे.

ज्योती मेटे ह्या दिवंगत नेते विनायकराव मेटे यांच्या पत्नी आहेत. विनायक मेटेंच्या अकाली निधनाने शिवसंग्राम पक्षाचे काम त्या पाहतात. प्रशासनात अधिकारी असणाऱ्या ज्योती मेटेंकडे उच्च शिक्षित आणि सर्वात म्हत्त्वाचं म्हणजे मराठा समाजाशी मेटेंशी असणारी नाळ, यामुळे त्याचं नाव आता बीड लोकसभेसाठी चर्चेत येत आहे.

बीड लोकसभा मतदार संघात ६ विधानसभा मतदार संघ येतात. यात बीड, माजलगाव, परळी, केज, आष्टी आणि गेवराई; या मतदारसंघांचा समावेश आहे. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत. माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. परळीतून धनंजय मुंडे- राष्ट्रवादी, आष्टीतून बाळासाहेब आजबे- राष्ट्रवादी, गेवराईमधून लक्ष्मण पवार हे भाजपचे आमदार असून केजमधूनही नमिता मुंदडा ह्या भाजपच्या आमदार आहेत.

शरद पवारांकडून ज्योती मेटे उमेदवार असल्यास शिवसंग्राम पक्षाची बीड जिल्ह्यात असणारी ताकद ही मुंडेंसाठी नक्कीच डोकेदुखी ठरू शकते. मराठा आरक्षण आणि ज्योती मेटे हे समीकरण जुळून आल्यास पंकजा मुंडेंचे टेन्शन वाढणार एवढी नक्की.

दुसरीकडे मात्र बुधवारी बजरंग सोनवणे यांनी अजित पवार गटातून शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आहे. त्यांना शरद पवार उमेदवारी देऊ शकतात, असंही बोललं जातंय. तसं झालं तर पंकजा मुंडेंना खासदार होणं, सोपं जाणार आहे. सोनवणे हे धनंजय मुंडे यांचे जवळचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT