Loksabha Election 2024 esakal
महाराष्ट्र बातम्या

Loksabha Election 2024 : ‘मिशन ४५’ साठी काहीही? अमरावतीत राणा, मावळमध्ये बारणे कमळावर निवडणूक लढवणार?

देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून कोणत्याही क्षणी निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर अनेक पक्षांनी आपापल्या पक्षातील उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. त्यातच येत्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि एनडीकडून देशात अब की पार ४०० पार आणि राज्यात महायुतीचं अब की बार, ४५ पार अशा घोषणा दिल्या जाताहेत.

Komal Jadhav (कोमल जाधव)

देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून कोणत्याही क्षणी निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर अनेक पक्षांनी आपापल्या पक्षातील उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. त्यातच येत्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि एनडीकडून देशात अब की पार ४०० पार आणि राज्यात महायुतीचं अब की बार, ४५ पार अशा घोषणा दिल्या जाताहेत. त्यामुळे महायुतीचं मिशन ४५ म्हणजे राज्यातील ४८ पैकी ४५ जागा जिंकण्यासाठी आता भाजपकडून मोठी मोर्चेबांधणी केली जातेय. अशातच मावळ आणि अमरावतीतून लोकसभेविषयी अपडेट समोर येत आहे.

Navneet Rana Shrirang Barne

अमरावतीमध्ये काय परिस्थिती?

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आगामी लोकसभेची निवडणूक भाजपच्या तिकीटावर लढवणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत खासदार नवनीत राणा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी केंद्रातील मोदी सरकारला आपला पाठिंबा जाहीर केला आणि मागील ५ वर्षांपासून नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा भाजपला समर्थन देताना दिसले आहेत. त्यामुळे आता आगामी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपनेसुद्धा आम्हाला पाठिंबा द्यावा, यासाठी नवनीत राणा आग्रही असल्याचं कळतंय.

Amravati Bjp Candidate

तरी, नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश करून कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, अशा प्रकारची चर्चा भाजप पक्षात असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्यानं साम टीव्हीनं दिली आहे. तर, याआधीही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी अमरावती लोकसभेत भाजपचा उमेदवार असेल, असं विधान केलं होतं. मात्र हे सगळं असताना खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा निकालही महत्वाचा ठरणार आहे. काही दिवसांमध्ये सुप्रीम कोर्ट नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर निकाल देणार आहे. त्यामुळे या निकालावर बरेच काही अवलंबून असणार आहे.

दुसरा मतदारसंघ मावळ

एकनाथ शिंदेंचे मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणेसुद्धा भाजपच्या कमळ निवडणूक चिन्हावर लढणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. कारण आधी महायुतीचे उमेदवार म्हणून श्रीरंग बारणेच निवडणुकीला उभे राहतील, असं निश्चित मानलं जात होतं. पण, आता मावळ लोकसभा मतदारसंघावर महायुतीतून भाजपनंही दावा केल्याचं कळतंय. महायुतीचा उमेदवार कमळ चिन्हावर उभा करण्याची मागणी स्थानिक भाजप नेत्यांनी केली आहे. त्यामुळे शिंदे गटाचे श्रीरंग बारणे भाजपचे उमेदवार असतील? अशी चर्चा सुरु झाली आहे.

Mawal BJP Candidate

खरंतर मावळमधून सध्या शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे आहेत. २०१९ साली त्यांनी आघाडीचे उमेदवार आणि अजितदादांचे चिरंजीव पार्थ पवारांचा पराभव केला होता. पण, आता बदललेली समीकरणं पाहता, मावळच्या जागेवर महायुतीतल्या तीनही पक्षांचा डोळा आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादीपाठोपाठ आता भाजपनंही या जागेवर दावा केला आहे. कारण, सध्याचं पक्षीय बलाबल सांगायचं झाल्यास, मावळ लोकसभेत भाजपचे तीन आमदार, दोन महापालिका तसेच अनेक नगरपरिषद आणि ग्रामपंचायतींवर भाजपची सत्ता आहे. त्या तुलनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची ताकद अतिशय कमकुवत असल्याचा लेखाजोखा मांडत, भाजपने मावळवर हक्क दाखवला आहे.

खरंतर मावळ लोकसभा मतदार संघाची भौगोलिक परिस्थिती तशी विचित्रच आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड आणि मावळ या तीन विधानसभा मतदारसंघासह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत आणि उरण या तीन विधानसभा मतदारसंघांनी बनलेला हा मतदार संघ आहे. तर, याआधी मावळ लोकसभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलीच उमेदवारी असल्याचे सांगितलं. पण आपली उमेदवारी अमित शाहांनीच फिक्स केल्याचा गौप्यस्फोट विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी केला आहे.

त्यामुळे आता महायुतीच्या जागावाटपात अमरावती मतदारसंघावर जरी भाजपानं दावा केला असला तरी, सध्याच्या चर्चेनुसार नवनीत राणाच उमेदवार असतील का? आणि श्रीरंग बारणेंना मावळमधून उमेदवारी मिळाली तर ते कोणत्या पक्षातून किंवा चिन्हावर निवडणूक लढवणार? याविषयी आपली मतं कमेंट करुन नक्की सांगा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT