Maharashtra Political Leaders Speech sakal
महाराष्ट्र बातम्या

Loksabha Election 2024 : निवडणुका झाल्या; नेते निवांत

लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर राज्यातील सर्व ४८ मतदारसंघातील निवडणूक पूर्ण झाली. याचबरोबर प्रचाराचा आवाजही शांत झाला.

सकाळ वृत्तसेवा

लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर राज्यातील सर्व ४८ मतदारसंघातील निवडणूक पूर्ण झाली. याचबरोबर प्रचाराचा आवाजही शांत झाला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासह सत्ताधारी व विरोधी पक्षांचे नेत्यांचे ‘रोड शो’, प्रचार सभा, पदयात्रा, मुलाखतींनी गावे, शहरे निवडणूकमय झाली होती. जवळजवळ ५२ दिवसांत नेत्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला होता. नेत्यांच्या प्रचाराच्या झंझावातावर एक दृष्टीक्षेप.

राजकीय सभांमधील महत्त्वाचे मुद्दे

देवेंद्र फडणवीस

  • मोदींनी दहा वर्षांत केलेला विकास

  • राष्ट्रहित, आर्थिक व देशाची सुरक्षा

  • राज्य सरकारच्या माध्यमातून झालेल्या स्थानिक विकासाचे मुद्दे, हिंदुत्व

नाना पटोले

  • वाढती बेरोजगारी, महागाई,

  • देशाची संपत्ती विकून देश चालविणार अशी टीका

  • राज्यघटनेचा बचाव, आम्ही युवकांना रोजगार देऊ

एकनाथ शिंदे

  • मराठा आरक्षणाचा प्रश्न आम्ही सोडवला

  • बाळासाहेबांच्या विचारांचा वारसदार पक्ष आमचाच

  • उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार

शरद पवार

  • नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली

  • महागाई रोखण्यात आणि रोजगार निर्मिती करण्यात केंद्र सरकार अपयशी

  • राज्यघटना बदलण्यासाठीच भाजपकडून ‘अब की बार ४०० पार’ चा नारा

अजित पवार

  • कोणी किती काम केलेय ते बघून मतदान करा

  • विकासासाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान होणे आवश्यक

  • महाराष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी केंद्रात आणि राज्यात एकच सरकार येणे गरजेचे

उद्धव ठाकरे

  • शिवसेना फोडणे, निवडणूक चिन्ह, नाव दुसऱ्या गटाला देणे

  • महाविकास आघाडी सरकार कपट काढून पाडणे

  • महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला

निरीक्षणे

  • बावनकुळे यांच्या सभा, बैठका, निवडणूक नियोजन बैठकांची संख्या (३२२) ही फडणवीस यांच्यापेक्षा (११५) जास्त

  • शरद पवार वयाच्या ८४ व्या प्रचारात सक्रिय. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या दहा उमेदवारांसह महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी राज्यभर सभा

  • उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांसह काही ठिकाणी महविकास आघाडीसाठी सभा

  • अमोल कोल्हे स्वतःचा प्रचार सांभाळून सभा घेतल्या

  • काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात राज्यात जास्त सक्रिय

  • भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार प्रचारातून गायब

  • गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील त्यांचाही सभांचा जोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik : 'या मुन्नाचा भांगसुद्धा कोणी वाकडा करू शकत नाही'; खासदार महाडिकांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार नवाब मलिक आणि सना मलिक यांच्या बाईक रॅलीला सुरूवात

मृणाल दुसानिस झाली बिसनेसवूमन! ठाण्यात 'या' ठिकाणी सुरू केलं नवं हॉटेल; पाहा आतून कसं आहे अभिनेत्रीचं 'बेली लाफ्स'

सावधान! व्हॉट्सॲपवर लग्नाची आमंत्रण पत्रिका येताच क्लिक करू नका, नाहीतर होईल मोठी फसवणूक, वाचा 'या' नव्या स्कॅमबद्दल

जिगर लागतो...! खांद्याला दुखापत, तरीही ऑस्ट्रेलियन खेळाडूने संघासाठी एका हाताने केली फलंदाजी

SCROLL FOR NEXT