narendra modi rahul gandhi uddhav thackeray sharad pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

Loksabha Election 2024 : मोदी, ठाकरे, गांधी, पवार यांचीच हवा

राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी प्रमुख पक्षांनी सुमारे २०० स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला दिली.

सदानंद पाटील

मुंबई - राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी प्रमुख पक्षांनी सुमारे २०० स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला दिली. मात्र आतापर्यंत झालेल्या चार टप्प्याच्या निवडणुकीत भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचीच मोठी हवा असल्याचे पाहायला मिळत आहे. या नेत्यांच्या सभांना होणारी गर्दी मतात मात्र किती रुपांतरीत होणार, यावरच विजयाचे गणित अवलंबून आहे.

लोकसभा निवडणुकीत स्टार प्रचारक उतरण्याची मोठी परंपरा आहे. यावेळीही सर्वच पक्षांनी स्टार प्रचारक उतरवले असेल तरी यात फिल्म इंडस्ट्रीला फारसे प्राधान्य देण्यात आलेले नाही. राज्यातील प्रचारासाठी भाजप, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून प्रत्येकी ४० तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून ३७ स्टार प्रचारकांची नियुक्ती करण्यात आली. मात्र यातील बऱ्याच स्टार प्रचारकांचा प्रभाव एखाद्या लोकसभा किंवा विधानसभा मतदारसंघापुरताच मर्यादित असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पक्ष प्रमुखांवरच प्रचाराची जबाबदारी आली.

उद्धव ठाकरेच्या शिवसेनेत ठाकरे यांच्यासह खा. संजय राऊत, युवा नेते आदित्य ठाकरे आणि सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्रात मशाल पेटवण्याचे काम केले. ठाकरे यांनी सभांत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यांच्या प्रचारसभांना गर्दीही चांगली झाली.

राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर नवीन पक्ष स्थापनेपासून ते पक्षाचे ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्ह राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे मोठे आव्हान होते. मात्र प्रदीर्घ राजकीय अनुभवाच्या आधारावर पक्षप्रमुख शरद पवार यांनी पुन्हा एकदा पक्षाला ऊर्जितावस्था देण्यासाठी कंबर कसली आहे.

यामध्ये त्यांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे, खा.अमोल कोल्हे, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख आणि युवा नेते रोहित पवार यांनी मोठी साथ दिली आहे. शरद पवार हे सातत्याने केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर टीका करत आहेत. राज्यात भाजपची धुरा पूर्णपणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती सोपविण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी प्रचार सभा आणि रॅलीच्या माध्यमातून जनमानसाला साद घातली आहे. तर फडणवीस हे मतदारसंघनिहाय, बारीकसारीक बाबींवर लक्ष ठेवून आहेत. मतांचे विभाजन होणार नाही याकडे लक्ष देत असतानाच युतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. प्रचारादरम्यान त्यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांना लक्ष केले आहे.

महायुतीच्या जागा वाटपात भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज तरी भारी पडले आहेत. मात्र पदरात पडलेल्या जागा निवडून आणण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. मिळालेल्या मतदारसंघातील उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी शिंदे यांच्यावर पडली आहे. पक्षात ४० स्टार प्रचारक असेल तरी शिंदे यांच्या जोडीला इतर कोणी प्रभावशाली नेते नसल्याने एकट्यालाच स्टार प्रचारकाची भूमिका पार पाडावी लागत आहे.

अजित पवारांवरच प्रचाराचा भार

एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था आहे. आपल्या पक्षाला आलेल्या चार जागांसह मित्र पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्याची जबाबदारी अजित पवार यांच्यावर आली आहे. शरद पवार यांच्यावर हल्लाबोल, हेच त्यांच्या प्रचाराचे सूत्र दिसत आहे. श्री. पवारांच्या राष्ट्रवादीने ३७ स्टार प्रचारकांची यादी दिली आहे. मात्र प्रचाराचा बहुतांश भार हा अजित पवार यांच्यावर पडला आहे.

राहुल यांच्यावर काँग्रेसची धुरा

राज्यात काँग्रेस पक्षात राज्यभर वातावरण निर्मिती करेल, अशा नेतृत्वाचा अभाव होता, तो राहुल गांधी यांनी भरून काढला. भारत जोडो पद यात्रा काढून पक्षात चैतन्य निर्माण करण्यात त्यांना यश आले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांनी रॅली, सभा केल्या, यात या पदयात्रेचे प्रतिबिंब दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT