Ashish Shelar sakal
महाराष्ट्र बातम्या

Ashish Shelar : जिंकून येण्याच्या निकषावर महायुतीचे जागा वाटप

पुणे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता. त्यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषदेत ॲड. आशिष शेलार यांनी संवाद साधला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - प्रत्येक पक्षाला त्यांचे संघटन वाढविण्याचा अधिकार आहे, त्यामुळे त्यासाठी प्रयत्न सुरु असतात. पण लोकसभा निवडणुकीत सर्वांनी चर्चा करून जिंकून येण्याच्या निकषावर जागा वाटप केले आहे. आम्ही कोणाच्याही जागा कमी करत नसल्याचे मुंबई भाजपचे अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.

पुणे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता. त्यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला. प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे, महायुती समन्वयक संदीप खर्डेकर आदी यावेळी उपस्थित होते.

आशिष शेलार म्हणाले, ‘ही निवडणूक देशाची असल्याने ती मोदी विरुद्ध गांधी अशी होत आहे. नरेंद्र मोदी युवकांच्या अपेक्षा पूर्ण करतील अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी असल्याने त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे यांनी आमचे जुने व्हिडिओ लावले होते, पण उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी, शरद पवार यांच्याबद्दल काय बोलले हे जुने व्हिडिओ काढून पहा.

मतदानासाठी धमक्या दिल्या जात आहेत, असे म्हणणे योग्य नाही. विरोधकांना त्यांचा पराभव दिसत असल्याने ते अशी वक्तव्य करून त्यांच्या पराभवाच्या कारणांची पार्श्‍वभूमी तयार करत आहेत. मोदी सरकारने महागाई कमी केली आहे, रोजगार उपलब्ध करून दिला आहे, या चांगल्या कामामुळे महायुतीचा विजय निश्‍चीत आहे.

शेलारे म्हणाले पराभव होणार

पत्रकार परिषदेत बारामतीच्या जागेचे काय असे विचारले असता आशिष शेलार यांनी चुकून सुनेत्रा पवार पराभव होणार आहे असे बोलून गेले. पण चूक लक्षात येताच सुनेत्रा पवार या जिंकणार आहेत असे म्हणत सारवासारव केली.

महायुतीमध्ये राजकीय ॲडजेस्टमेंट - उदय सामंत

महायुतीमध्ये राजकीय ॲडजेस्टमेंट आहे, नारायण राणे इच्छुक नव्हते, मग ते आता का तयार झाले यावर आता चर्चा करून उपयोग नाही, त्यांनी अर्ज भरला आहे. महायुतीच्या जागावाटपात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी सर्वांचा सन्मान करत जागा वाटप केले आहे.

देशभरात आम्ही ४०० पेक्षा जास्त जागा जिंकणार असून, पुणे जिल्ह्यातील चारीही जागेवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT