Madha Lok Sabha Election 2024 : माढा निंबाळकरांना पाडा इथुन सुरु झालेला प्रवास आता 'माढा पवारांना जोडा' असा सूर उमटतोय तो अकलुजमधून. माढा लोकसभेत धैर्यशील मोहितेंना उमेदवारी मिळावी यासाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे. धैर्यशील मोहितेंना यंदाची लोकसभा लढवायचीये, तशी तयारीसुद्धा धैर्यशील मोहितेंनी केली पण भाजपने रणजित नाईक निंबाळकरांना उमेदवारी दिली. त्यामुळे धैर्यशील मोहिते भाजपच्या या निर्णयावर नाराज आहेत.
त्यांचे काका बाळदादा म्हणजे जयसिंह मोहिते पाटील सुद्धा यासाठी प्रयत्न करतायेत. वेळ पडली तर शरद पवार गटाची तुतारी हातात घेऊ असा इशाराही मोहिते पाटलांनी दिलाय. पण या सगळ्यात रणजितसिंह मोहिते पाटील मात्र भाजपच्या बाजूने आहेत. म्हणजे पवारांसोबत जाण्यावरून मोहिते पाटील घराण्यात मतभेत सुरु झालेत. त्यामुळे माढ्यात आणि मोहिते पाटलांच्या मनात नेमकं काय जाणून घेऊया...
माढ्यातून यंदा लोकसभा लढवायची या हेतूने धैर्यशील मोहिते पाटलांनी प्रयत्न सुरु केले. पण भाजपने या ठिकाणी रणजित नाईक निंबाळकरांना पुन्हा उमेदवारी दिली त्यामुळे धैर्यशील मोहितेंनी नाराजी बोलून दाखवली. त्यानंतर मोहिते पाटील पवारांची तुतारी हातात घेऊन लोकसभा लढवणार अशी चर्चा जोर धरू लागली. मोहिते पाटलांच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांशी गाठी भेटी सुरु झाल्या. धैर्यशील मोहितेंनी तुतारी हातात घेणार असा इशारा जयसिंह मोहितेंनी दिला. प्रकरण इतके तापले की, भाजपच्या नेत्यांना माळशिरस गाठावं लागलं. भाजपचे संकटमोचक असणारे गिरीश महाजन मोहिते पाटलांची नाराजी दुर करायला पोहोचले तेव्हा त्यांना कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. महाजन असंही म्हणाले की मोहितेंची नाराजी भाजपा परवडणारी नाही. त्यामुळे मोहिते पाटलांची नाराजी दुर करण्यासाठी भाजप नेतेमंडळी कामाला लागली.
एकीकडे धैर्यशील मोहिते आणि जयसिंह मोहिते भाजपच्या बाजूने जाण्यासाठी तयार होते मात्र या सगळ्यात सध्या भाजपचे आमदार असलेले रणजितसंग मोहिते पाटलांचं झुकत माप अजुनही भाजपच्या बाजुने आहे. मात्र असं बोललं जात की जेव्हा धैर्यशील मोहिते आणि जयसिंह मोहिते महाविकास आघाडीच्या नेत्यांशी आपल्या कार्यकर्त्यांशी भाजप विरोधात बंड करण्यासाठी गाठी भेटी घेत असताना त्या बैठकीला रणजित सिंह होते पण माध्यमांच्या समोर ते यायला किंवा या प्रकरणावर बोलायला तयार नाहीतय आणि याचा खुलासा स्वत: जयसिंगांनी केला. बाळदादांनी माध्यमांशी बोलताना असंही सांगिकलं की रणसिंह मोहिते फडणवीसांना घाबरतात.
त्यामुळेच जेव्हा धैर्यशील आणि जयसिंह हे बंडाविषयी खुलेआम बोलत असताना रणसिंह मात्र फडणवीसांच्या भाजप नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. पण रणजितसिंहाच्या या भुमिकेमागचं माळशिरस मधील मोहिते पाटलांच्या कारखाने बँका आणि पतसंस्थांवर सुरु असलेली कारवाई असल्याचं बोललं जात. कारण आपल्या विरोधाकांच्या मुसक्या कशा आवळायच्या हे भाजपला चांगलंच ठावूक आहे. त्यात डीसीसी बँकेची केस अजुनही कोर्टात सुरु आहे आणि बहुधा याचीच धास्ती रणजितसिंहांनी घेतलेली दिसते. या सगळ्यामुळे मोहित पाटील घराणं कारवाई्च्या विळख्यात सापडू शकतं.
आणि रणजितसिंहाच्या याच भुमिकेमुळे धैर्यशील मोहिते, जयसिंह मोहिते पवारांसोबत जाण्याचा निर्णयही अद्यापही घेत नाहीयेत.त्यात माळशिरसमध्ये जरी मोहिते पाटलांचा अजुनही दबदबा असला तरी आसपास विरोधकही तितकेच आहेच. त्यामुळे महाविकास आघाडीतील आताचे नेते जे बंडासाठी प्रोत्साहन देतायेत ते शेवटपर्यत कितपत साथ देतील याबद्दल साशंकत मोहितेंच्या मनात आहे.
पण भाजपात राहुन मुस्काटदाबी सुरु असल्याची भावना मोहितेच्या मनात सुरु आहे. त्याच सगळ्यात पहिलं कारण तर लोकसभेची उमेदवारी. त्यात २०१९ च्या लोकसभेला निंबाळकरांना आणि माळशिरस विधानसभेला राम सातपुतेंना निवडणून आणण्यात मोहिते घराण्याचा मोठा वाटा होता. पण २०१९ नंतर खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि आमदार राम सातपुते असे दोन्ही लोकप्रतिनिधी मोहिते-पाटील यांच्या विरोधकांना हाताशी धरून कारभार करू लागले.
विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेचे श्रेय त्यांना मिळू नये म्हणून तिचे नाव बदलून कृष्णा भीमा पूरनियंत्रण योजना म्हणून ती मंजूर करण्यात आली. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी बबनदादा शिंदे आणि संजय शिंदे यांच्यासोबत बैठका घेतल्या, या बैठकांमध्ये त्यांना एकेक लाखांची आघाडी मिळवून देण्याची ग्वाही देण्यात आली.
सांगोल्यात ६७४ मतांनी निवडून आलेल्या शहाजीबापू पाटील यांनी ४० हजारांची आघाडी देण्याची घोषणा केली. निकालानंतर विजयाचे श्रेय मोहिते-पाटील यांना मिळू नये यासाठी आधीच ही व्यूहरचना करण्यात आली. या आणि अशा अनेक कारणामुळे मोहिते पाटील भाजपात नाराज आहे.
पण माध्यमांसमोर जरी मोहितेंनी बंडाची भाषा केली असली तर प्रत्यक्षात मात्र तळ्यात- मळ्यात सुरु आहे. त्यामुळे पवार सुद्धा वेच अँड वॉचच्या भुमिकेत आहेत. जो पर्यंत मोहिते पक्षप्रवेश करत नाही तोवर उमेदवारी नाही अशी भुमिका पवारांनी जयंत पाटलांच्या कानावर टाकल्याचं. त्यामुळे आता मोहितेंच्या मनात नेमकं काय सुरु आहे हे चित्र काही दिवसात स्पष्ट होईल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.