Ashok Chavan Sakal Digital
महाराष्ट्र बातम्या

मुंबईतील महामोर्चात अनुपस्थित का?, चव्हाण स्पष्टच बोलले

मोर्चा व विवाह सोहळा महत्वाचा.. ज्येष्ठ कार्यकर्त्याच्या विवाह सोहळ्यात उपस्थिती..

सकाळ वृत्तसेवा

अर्धापूर : मुंबईत राज्य शासनाच्या विरुद्ध महाविकास आघाडीने काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी न झाल्याबद्दल उलट सुलट चर्चा सुरू आहे. पूर्व नियोजित विवाह सोहळा असल्याने मोर्चात सहभागी झालो नाही. माझ्यासाठी विवाह सोहळा व मोर्चा महत्वाचा आहे अशी माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शनिवारीअमराबाद (ता. अर्धापूर) येथे संपन्न झालेल्या कल्याणकर -खतगावकर विवाह सोहळ्यात दिली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षात जाणार आशा गेल्या अनेक महिन्यांपासून वावड्या उठल्या जात आहेत.या बाबत चव्हाण यांनी वेळोवेळी खुलासा केला तरीही अधूनमधून पक्ष प्रवेशाच्या चर्चा होतच असते. त्यातच आनखिन भर मुंबईत काढण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या मोर्चाला अनुपस्थित राहिल्याने राज्यात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

महाराष्ट्राच्या स्वाभिनाला ठेच लावून महापुरुषांबद्दची आक्षेपार्ह वक्तव्य, महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाविषयी राज्य शासनाची बोटचेपी भुमिका, राज्यातील उद्योग परराज्यात जाणे या विरुद्ध महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी मुंबईत मोर्चा काढला.यात शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार शरदचंद्र पवार,काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना भाऊ पटोले आदी वरिष्ठ नेते सहभागी झाले होते.पण या मोर्चात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण सहभागी झाले नाहीत.त्यामुळे राज्यात उलट सुलट चर्चा सुरू झाली‌. काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते भाऊराचे संचालक व्यंकटराव कल्याणकर यांच्या नातीचा विवाह सोहळा शनिवारी (ता १७) अमराबाद येथे संपन्न झाला.

या विवाह सोहळ्यात माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, काँग्रेसचे जिल्ह्यातील आमदार माधवराव पाटील जवळगावकर आमदार मोहन हंबर्डे, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीपराव पाटील बेटमोगरेकर, किशोर स्वामी आदी ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या विवाह सोहळ्यात वधूवरांना शुभेच्छा देताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, हा विवाह सोहळा पुर्व नियोजित होता . त्यामुळे मोर्चात सहभागी होता झाले नाही . मोर्चा व विवाह सोहळा महत्त्वाचा असल्याने मी विवाह सोहळ्याला उपस्थित राहिलो तर माजी आमदार अमिता चव्हाण यांना मोर्चासाठी पाठविले आहे. मोर्चात सहभागी न झाल्याबद्दल उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. या विषयी सविस्तर खुलासा करणार आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फडणवीसांना CM पदासाठी पाठिंबा! शिंदेंसाठी दोन पर्याय कोणते? राजकारणातील मोठे संकेत

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

SCROLL FOR NEXT