PhD Degree Alert esakal
महाराष्ट्र बातम्या

Maha Jyoti Ph D Subsidy : महाज्योती संस्थेतर्फे 1884 पीएच. डी. करणाऱ्यांना 24 कोटी; या संकेतस्थळावर करा अर्ज

सकाळ वृत्तसेवा

Mahajyoti Ph D Subsidy : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) संस्थेतर्फे इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील वाचस्पती (पीएच. डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पीएच.डी. अधिछात्रवृत्ती योजना राबविण्यात येते.)

त्याअंतर्गत दोन वर्षांत पीएच.डी. करणाऱ्या एक हजार ८८४ विद्यार्थ्यांना २४ कोटींचे अनुदान देण्यात आले. (Mahajyoti 1 thousand 884 students were given subsidy of 24 crores doing Ph D news)

‘महाज्योती’तर्फे लक्षित गटातील उमेदवारांना संशोधानासाठी सहाय्य व्हावे, संशोधन क्षेत्रात संधी मिळावी व त्यांचा विकास व्हावा, या हेतूने पीएच.डी. अधिछात्रवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. संशोधनासाठी लागणारे संदर्भ ग्रंथ खरेदी, अहवाल तयार करण्यासाठी होणारा प्रवास खर्च व आवश्यक शैक्षणिक सुविधा इत्यादी बाबी अधिछात्रवृत्तीच्या माध्यमातून भागविता येतात.

‘महाज्योती’मार्फत विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीसोबतच घरभाडे व आकस्मिक खर्च दिला जातो. मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

२०२१ मध्ये जुलै ते डिसेंबरदरम्यान निवड झालेले ६४८ विद्यार्थी व २०२२ या वर्षात नोव्हेंबर व डिसेंबर यादरम्यान निवड झालेले एक हजार २३६ विद्यार्थी असे एकूण एक हजार ८८४ विद्यार्थ्यांना २४ कोटी १७ लाख ८७ हजार ७४९ रुपये अधिछात्रवृत्ती वितरित करण्यात आली.

कुठे कराल अर्ज

योजनेसाठी नॉनक्रिमिलेअर उत्पन्न गटातील इच्छुक विद्यार्थी www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT