Uddhav Thackeray Sanjay Raut Sakal
महाराष्ट्र बातम्या

Mahaparinirvan Din 2022 Live :उद्धव ठाकरे चैत्यभूमीवर दाखल

सकाळ डिजिटल टीम

राज्यभरातून आंबेडकर अनुयायी चैत्यभूमीवर दाखल

यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ६६ वा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्ताने राज्यभरातून आंबेडकरांचे अनुयायी मुंबईतल्या चैत्यभूमीवर येत आहेत. तसंच विविध देशांचे दूतही चैत्यभूमीवर येऊन डॉ. आंबेडकरांना अभिवादन करणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उद्धव ठाकरे चैत्यभूमीवर दाखल

शिवसेना (उबाठा) नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. यावेळी उद्धव ठाकरेंसोबत संजय राऊत, अनिल परब, आदित्य ठाकरे, नीलम गोऱ्हे असे शिवसेना नेतेही उपस्थित होते.

CM शिंदेंकडून चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी अन्नदानाची व्यवस्था

राज्यभर आणि देशभरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांची चैत्यभूमी आणि परिसरात गर्दी वाढू लागली आहे. अनुयायांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अन्नदानाची व्यवस्था केली आहे. एकाच वेळी दोन हजार अनुयायी अन्नदानाचा लाभ घेऊ शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. विविध सामाजिक संस्था, संघटनांनी सुद्धा चैत्यभूमी परिसरात अन्नदानाची व्यवस्था केली आहे.

राज ठाकरेंनी उलगडले डॉ. आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे न उलगडलेले पदर...

आपण आपल्या महापुरुषांना अत्यंत संकुचित दृष्टिकोनातून पाहतो, मानतो, जगासमोर मांडतो. पण महामानवाच्या महापरिनिर्वाणदिनी आज मला पुन्हा सांगावंसं वाटतं की आपल्या महापुरुषांचं अष्टावधानी कर्तृत्व लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. जसं छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त अफझल खानाचा कोथळा, शाहिस्तेखानाची बोटं छाटणं, आग्र्याहून सुटका, सुरत स्वारी नाही तर त्यांचा राज्यकारभार, कृषी धोरण, राज्य कोष, वास्तू रचना, राज्य व्यवस्था, न्यायदान पद्धत अशी असंख्य गुण वैशिष्ट्य सांगता येतात.

तसंच परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वालाही अनेक पदर आहेत. बाबासाहेबांनी शेकडो वर्ष गुलामगिरीत जगणाऱ्या वंचितांसाठी यशस्वी लढा दिला हे त्यांचं मोठं कार्य आहेच तसंच भारतीय राज्य घटनाकर्ते हा त्यांच्या आणि देशाच्या कारकिर्दीतला निर्विवादपणे अत्युच्च बिंदू पण त्याव्यतिरिक्तही डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि ते सर्वप्रथम मराठी समाजाला आणि मग विश्वाला कळायलाच हवेत.

बाबासाहेब अर्थशास्त्रात उच्च विद्या विभूषित होते. त्यांनी ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये मांडलेल्या ‘दी प्रॉब्लेम ऑफ दी रूपी’ ह्या प्रबंधाच्या प्रेरणेतून भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. बालविवाह, बहुपत्नीत्व ह्यामुळे ‘स्त्री’ स्वत्व गमावून बसली होती. त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी प्रयत्न केले पण तेव्हा त्यांना विरोध झाला. अखेर भारतीय समाजाने हळूहळू द्विभार्या प्रतिबंधक कायदा स्वीकारला, वडिलांच्या संपत्तीत लेकीला समान वाटा मिळाला, विवाहाच्या निर्णयात स्वातंत्र्य मिळालं.. त्याचवेळेस हा मानवतावादी कायदा आला असता तर आज चित्र वेगळे असते. असो. बाबासाहेबांनी स्त्रियांना बाळंतपणाची भरपगारी रजा, नारायण लोखंडे ह्यांच्या सहमतीने रविवारी कष्टकऱ्यांसाठी साप्ताहिक सुट्टी, कामाचे १२ वरून ८ तास, कामगार संघटनांना मान्यता, आरोग्य विमा, संपाचा कायदेशीर अधिकार अशा अनेक हक्कांसाठी लढा दिला आणि मान्यता मिळवून घेतली. इतकंच काय तर त्यांचं मराठी भाषेवर असणारं प्रभुत्व अद्भुत होतं आजही त्यांचं लिखाण वाचताना थक्क व्हायला होतं. माझ्या आजोबांच्या आवाहनानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी त्यांनी मांडलेली भूमिका ही चळवळीला शक्तिवर्धक ठरली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर निष्णात कायदेतज्ञ, समाजशास्त्रज्ञ, राज्यशास्त्रज्ञ, अर्थतज्ञ, लेखक आणि स्वातंत्र्योत्तर भारताला लाभलेले द्रष्टे राष्ट्रीय नेते होते. अशा ह्या महामानवाला कोटी कोटी प्रणाम ! - राज ठाकरे

आमचं सरकार बाबासाहेबांच्या मार्गावर वाटचाल करेल; CM शिंदेंचा निर्धार 

"भारतीय स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरं करतोय. या महामानवामुळे आपण सगळ्या जगात ताठ मानेने उभे आहोत. डॉ. आंबेडकरांच्या घटनेने सगळ्यांना अधिकार दिले, जगण्याचे हक्क दिले. यामुळेच सर्वसामान्य माणूस सर्वोच्च पदावर जाऊन देशाची सेवा करू शकला. माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातला एक मुख्यमंत्री झाला आणि राज्याची सेवा करण्याची संधी मिळाली ते केवळ बाबासाहेबांच्या संविधानामुळे. महापुरुष इतिहास घडवतात, पण बाबासाहेबांनी अपमानकारक जीवन जगणाऱ्यांना दिलासा देऊन इतिहास बदलला. आपल्या ज्ञानाचा वापर त्यांनी दीनदलितांना सशक्त करण्यासाठी केला. त्यांनी जगभरातल्या शोषित, पीडितांच्या हक्कांना, वैचारिक संघटनात्मक बळ दिलं. संघटित होण्याचं बळ त्यांनी दिलं. दलित बांधवांच्यातल्या आत्मविश्वासाचं सगळं श्रेय फक्त बाबासाहेबांनाच. आमच्या सरकारमध्ये इंदू मिलचं स्मारक लवकरात लवकर पूर्ण होईल. आम्ही कामाची पाहणी केली तसंच आढावा घेतला आहे. आमचं सरकार बाबासाहेबांच्या मार्गावर वाटचाल करेल, असा निर्धार केला आहे. राजगृह हा आपला ऐतिहासिक ठेवा आहे. तो जोपासला जाईल. लोअर परेल इथल्या स्मारकाची पाहणी केली जाईल, बाबासाहेबांच्या आठवणी जपण्याचं काम केलं जाईल", असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या जनतेला दिला आहे.

इंदू मिलचं काम लवकरच पूर्ण होईल - फडणवीसांचं आश्वासन

"संविधानाने लोकशाही जिवंत ठेवली. सामान्यातल्या सामान्य लोकांसाठी संधी उपलब्ध करून दिली, त्यांचे आभार मानण्यासाठी आपण त्यांना मानवंदना देतो, त्यांनी जगाच्या कल्याणाचा संदेश दिला, गौतम बुद्धाचे विचार प्रत्येक विचार् संविधानिक मूल्य म्हणून प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. चहावाला मुलगा पंतप्रधान होतो, हे घडवण्याचं काम संविधान करतं. आपले पंतप्रधान म्हणतात, माझ्यासाठी संविधान हा एकच धर्मग्रंथ आहे, याने मी देश चालवेन. महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आश्वासन देतो की इंदू मिलवर अतिभव्य स्मारक हातात घेतलंय, वेगाने काम सुरू आहे, लवकरच काम पूर्ण होईल. सर्वांच्या वतीने डॉ. आंबेडकरांना विनम्र आदरांजली", अशी भावना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमीवर व्यक्त केली आहे.

CM शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह राज्यपाल कोश्यारी चैत्यभूमीवर दाखल 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दाखल झाले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारीदेखील आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी डॉ. आंबेडकरांना मानवंदना दिली आणि राष्ट्रगीत गायलं.

विरोधी पक्षनेते अजित पवार,जयंत पाटील यांचं बाबासाहेबांना अभिवादन

विरोधी पक्षनेते अजित पवार, तसंच राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी चैत्यभूमीला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. चैत्यभूमीवरची कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे. दोन वर्षांनंतर मोठ्या प्रमाणात महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनेक अनुयायी दाखल झाले आहेत. २०२४ पर्यंत इंदू मिल स्मारक व्हायला हवं, यामध्ये कोणी राजकारण करू नये, अशी भावना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT