Yavatmal Chickpea Pest Attack: गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अशातच आता रब्बी हंगामातील हरभरा पिकावर अळीचा हल्ला झाल्याने हरभरा उत्पादक संकटात सापडले आहेत.
खरीप हंगामातील पीक अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातून गेले. त्यानंतर हाती आलेल्या पिकांना योग्य बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांचा लावलेला खर्चही निघाला नाही. शेतकऱ्यांना रब्बी हंगामावरच आशा होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी हरभरा, गहू व इतर पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. गेल्या काही दिवसांपासून
खरिपातील तूर पिकावरही किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. वातावरणातील बदलाने हरभरा पिकावर मोठ्या प्रमाणात कट वर्म किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झालेला दिसून आला. कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या भेटीत अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. ही कीड हरभऱ्याची रोपे, शेंडे, पाने कुरतडून पीक फस्त करते. ही नियमित येणारी कड नाही. त्यामुळे नुकसानीची तीव्रता पाहता किडीचे वेळीच व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत कृषी शास्त्रज्ञांचे आहे. अचानक हवेतील आर्द्रता वाढल्यास ही किडी मोठ्या प्रमाणात बाहेर येते.
याची प्रजननक्रिया वाढते. माडी कीड पिकाच्या पानावर व कोवळ्या शेंडावर समूहाने ४५० पर्यंत अंडी घालते. ही अळी झाडाच्या बुंधाशी, तणाच्या किंवा काडी कचराच्या ढिगाऱ्याखाली मातीत दबून असते. विशेष म्हणजे या किडीचा प्रादुर्भाव रात्री अधिक होत असल्याचे विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. किडीच्या प्रादुर्भावामुळे आधीच कोंडीत असलेले शेतकरी पुन्हा अडचणीत आले आहेत. यंदा शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. त्यात आता किडीचा प्रादुर्भाव हरभरा पिकावर झाल्याने शेतकरी मेटाकुडीस आले आहेत.(Latest Marathi News)
मुळकूज, बुरशी रोगांचा प्रादुर्भाव
■ हरभरा पिकावर अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे वातावरणात गारवा आहे. याचा परिणाम पिकांवर होत आहे. हरभरा पिकावर अळीसोबतच मुळकूज व बुरशी रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यासाठी शेतकयांनी शिफारसशीत बुरशीनाशकांची फवारणी करण्याचे आवाहन कृषी विद्यापिठांच्या शास्त्रज्ञांनी केले आहे. (Latest Marathi News)
जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. ढगाळ वातावरण गेल्या १५ दिवसांपासून आहे. दोन्ही संकटांमुळे रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. शेतकऱ्यांनी कचऱ्याचे, तणाचे ढीग राहणार नाहीत, याची काळजी घ्यावी. प्रती एकरी आठ ते दहा पक्षी थांबे उभारावेत, लष्करी अळीप्रमाणे एकाचवेळी अळी आढळून येते. म्हणून पिकात मादी पतंगाचे अंडी घालू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निंबोळी अर्काची फवारणी करावी. आर्थिक नुकसानीची पातळी आढळून आल्यास क्लोरपायरीफॉसची फवारणी करावी- डॉ. प्रमोद यादगीरवर, सहयोगी संशोधन संचालक, विभागीय कृषी संशोधन केंद्र, यवतमाळ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.