Anandacha Shidha News esakal
महाराष्ट्र बातम्या

Diwali: गोरगरिबांचा घास गोड ! नागरिकांना आनंदाचा शिधा दिवाळीतच, दुकाने उशिरापर्यंत ठेवण्याचे आदेश

सकाळ डिजिटल टीम

Diwali Anandacha Shidha: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, सर्व लाभधारकांना आनंदाचा शिधा हा दिवाळीच्या सणातच मिळाला हवा, त्यासाठी रेशन दुकाने रात्री उशिरापर्यंत चालू ठेवा, असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी दिले आहेत. यातून दिवाळीत गोरगरिबांचा घास गोड होणार आहे.

दिवाळी सणानिमित्त जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानदारांनी शंभर टक्के अन्नधान्य व आनंदाचा शिधा ग्राहकांपर्यंत पोचेल यासाठी प्रयत्न करावे, असे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यामुळे ग्राहकांसोबतच दुकानदारांचीदेखील दिवाळी आनंदी होणार आहे. गुरुवारपर्यंत जिल्ह्यातील सर्व तालुक्यात, गावात प्रत्येक रेशन दुकानांपर्यंत अन्नधान्य व आनंदाचा शिधा जिल्हा पुरवठा विभागाकडून पोचविण्यात आलेला आहे.

१०० टक्के अन्नधान्य हे रेशन दुकानदारांपर्यंत पोचलेले आहे. त्यामुळे वेळेत सर्व ग्राहकांना अन्नधान्य पोचेल याची खबरदारी घेण्याची सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिली आहे .

रेशन कार्डवर ‘हे’देखील मिळणार

आनंदाचा शिधासाठी शंभर रुपये दर आकारण्यात आला आहे. यामध्ये पोहे, मैदा, अर्धा किलो रवा, एक लिटर तेल,एक किलो साखर देण्यात येत आहे.

आकडे बोलतात...

सोलापूर शहर

नियमित धान्य

लोकसंख्या - २४,६९०

अंत्योदय कार्ड - ६१४५

गहू - १२९०.४५ क्विंटल

तांदूळ - ८६०.३० क्विंटल(Latest Marathi News)

अन्नसुरक्षा योजना

लोकसंख्या - ४९,४७१३

कार्ड संख्या - १,०९,८०४

गहू - १४,८४१.३९ क्विंटल

तांदूळ - ९८९४.२६ क्विंटल

सोलापूर ग्रामीण

नियमित धान्य

लोकसंख्या - २,५५,७५६

अंत्योदय कार्ड - ५४,३४७

गहू - ७६७२.६८ क्विंटल

तांदूळ - ५११५.१२ क्विंटल

अन्नसुरक्षा

लोकसंख्या - १७,०१,१५४

कार्ड संख्या - ३,५१,२२१

गहू - ५१,०३४.६२ क्विंटल

तांदूळ - ३४,०२३.०८ क्विंटल (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK : Ramandeep Singh चा अविश्वसनीय झेल; पाकिस्तानी खेळाडू बघतच बसले, फलंदाजाने मारला डोक्यावर हात Video Viral

Delhi Bullet Fire: दिल्लीतील वेलकम मार्केटमध्ये जीन्स विक्रेत्यांमध्ये पैशांवरुन राडा! बंदुकीचे 17 राऊंड फायर, तरुणी जखमी

Nashik Rain: नाशिकच्या चांदवडमध्ये तुफान पाऊस! तामटीचा पाझर तलाव फुटला; नागरिकांचं स्थलांतर

IND vs PAK : दे दना दन...! तिलक वर्माच्या संघातील फलंदाजांनी पाकिस्तानची केली धुलाई

Ambernath Vidhansabha: राष्ट्रीय समाज पक्षाकडून अंबरनाथसाठी रुपेश थोरात यांच्या नावावर अखेर शिक्कमोर्तब!

SCROLL FOR NEXT