Maharashtra Assembly Budget Session Updates sakal media
महाराष्ट्र बातम्या

अर्थसंकल्पीय अधिवेशन : विधानसभेचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनचा आज तिसरा दिवस होता. आज सभागृहात ओबीसी विधेयकाला मंजुरी देण्यात आली. तसेच वीजबिलाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. पंढरपुरातील तरुण शेतकऱ्याच्या आत्महत्येचा मुद्दासभागृहात गाजला. 

दिवसभरात घडलेल्या घडामोडी -

ओबीसी आरक्षण विधेयक मंजूर -

ओबीसी आरक्षण विधेयक सभागृहात मांडण्यात आले आहे. सभागृहात एकमताने हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. आता निवडणूक वगळता सर्व अधिकार राज्यसरकारने स्वतःकडे घेतले आहे.

सभागृहाचं कामकाज अडीच वाजेपर्यंत तहकूब

वीजबीलाचा मुद्दा तापला -

सभागृहात वीजबिलाचा मुद्दा तापला. नाना पटोलेंनी वीजबिलाच्या मुद्द्यावरून सरकारला प्रश्न विचारले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस देखील आक्रमक झाले. तुम्हाला समर्थन देणाऱ्यांनी राजू शेट्टींनी महावितरणचं कार्यालय जाळलं. शेतकऱ्यांच्या संदर्भात संवेदनशील भूमिका घ्या, अशी मागणी फडणवीसांनी केली.

महिला आमदारांना संरक्षण देण्याची विरोधकांची मागणी. भाजप आमदारांकडून जोरदार घोषणाबाजी.

पंढरपुरातील त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला मदत मिळणार

पंढरपुरातील शेतकरी सुरज जाधव या शेतकऱ्यानं व्हिडिओ बनवून आत्महत्या केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित केला असून स्थगन प्रस्ताव आणण्याची मागणी केली. तसेच वीजतोडणी तत्काळ थांबवण्यात यावी, अशी मागणीही फडणवीसांनी केली. त्यानंतर अध्यक्षांनी स्थगन प्रस्ताव आता आणता येणार नाही. पण, आम्ही याची नोंद घेतोय, असं सांगितलं. याबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊत सायंकाळपर्यंत निवेदन देतील. तसेच सरकार तत्काळ मदत करतील, असे आदेश अध्यक्षांनी दिले आहेत.

रवी राणा प्रकरणाची चौकशी करणार - दिलीप वळसे पाटील

रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा का दाखल करण्यात आला? याचा विचार त्यांनी करावा. याप्रकरणी कुठलीही कृती करण्यासाठी मुख्यमंत्री आणि मी आदेश दिले नव्हते. एखाद्या शहरात परिस्थिती स्फोटक बनते त्यावेळी माहिती घेणं आमचं कर्तव्य आहे. याप्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल आल्यानंतर विरोधी पक्षनेत्यांबाबत चर्चा करू, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील.

आमदार रवी राणा सभागृहात आक्रमक -

आयुक्तांवर शाई फेक प्रकरणात रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच मुद्द्यावरून राणा सभागृहात आक्रमक झाले. माझ्यावर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचा आरोप आमदार राणा यांनी केला. त्यानंतर विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला.

  • राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक सहा महिन्यांसाठी पुढे जाण्याच्या हालचाली

  • त्यासतही आज दोन्ही सभागृहात दोन विधेयक मांडली जाणार

  • आज सभागृहात मांडल्या जाणारे विधेयक

  • १) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम१९६१ यात सुधारणा विधेयक

  • २)मुंबई महापालिका अधिनियम महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ यामध्ये सुधारणा

  • दोन्ही सभागृहात आजच OBC विधेयक येणार

  • या विधेयक नंतर प्रभाग रचना, वॉर्ड रचना, मतदार याद्या बनवणे आणि निवडणूक कार्यक्रम, त्याच्या तारीख हे सगळे अधिकार राज्य सरकारकडे येणार

    निवडणूक आयोगाच्या सहमतीने निवडणूक तारीख ठरणार

  • विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आक्रमक

  • नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी

  • विधानभवनच्या पायऱ्यांवर बसून विरोधी सरकार विरोधी घोषणा बाजी करत आहेत

  • ओबीसी राजकीय आरक्षणवर चर्चा

  • बैठकीला सुरुवात

  • बाळासाहेब थोरात, अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, देवेंद्र फडणवीस, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, आशिष शेलार उपस्थित

  • ओबीसी आरक्षण प्रश्नी थोड्याच वेळात विधानभवनमध्ये बैठक

  • बैठकीला महविकास आघाडीचे राहणार उपस्थित

  • बैठकीत विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांत ओबीसी राजकिय आरक्षण संदर्भात विधेयक मांडण्यात येणार यावर चर्चा

  • विधेयकामध्ये निवडणुक आयोगाककडून वॉर्ड रचना आणि सिमांकनाचे अधीकार राज्य सरकारला देण्यासंदर्भात चर्चा

  • महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेल्या शुक्रवारी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुनच मोठा गोंधळ झालेला पहायला मिळाला होताा. हे सरकार या आरक्षणासंदर्भात गाफील असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता, तर आम्ही पुरेपुर प्रयत्न करत असून कायदेशीर बाबींमुळे या अडचणी येत असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं. आपण दोन्ही बाजूंनी ओबीसींसाठी पुन्हा प्रयत्न करु. आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत, हे देखील सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय. यासंदर्भातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वासन देत म्हटलं होतं की, ओबीसी अरक्षणाबाबत आम्ही विधेयक तयार करत आहोत, ते सोमवारी पटलावर मांडू. या प्रश्नावर मार्ग निघावं हीच इच्छा आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली होती.

  • अधिवेशनाच्या या दुसऱ्या आठवड्यामध्ये नवाब मलिकांचा राजीनामा तसेच ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजणार अशी शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Whatsapp Call Recording : मिनिटांत रेकॉर्ड करा व्हॉट्सॲप कॉल, सोपी स्टेप वाचा एका क्लिकमध्ये..

Margashirsha Amavasya 2024: मार्गशीर्ष अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर करा गंगा स्नान, जाणून घ्या महत्व

SCROLL FOR NEXT