ramdas athawale want cabinet minister  esakal
महाराष्ट्र बातम्या

...मात्र यावेळी ते चालणार नाही; १२ जागांची मागणी, भाजपला पत्रही लिहिले, रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?

Vrushal Karmarkar

आरपीआयचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपसमोर आपली मागणी मांडली आहे. रामदास आठवले यांनी महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहून १२ जागांची मागणी केली आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागा आहेत. येथे एनडीएचे मित्रपक्ष भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि आरपीआय एकत्र निवडणूक लढवणार आहेत. तिकीट वाटपावर अजूनही चर्चा सुरू आहे. यानंतर आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यात त्यांनी जागावाटपावर भाष्य केले आहे.

रामदास आठवले यांचा पक्ष आरपीआयनेही पत्र लिहून मुंबईतील काही जागांवर दावा केला आहे. यामध्ये शिवाजीनगर, मालाड आणि धारावीचा समावेश आहे. आठवले यांचे विधान काही दिवसांपूर्वी आले होते. ज्यात त्यांनी आम्हाला किमान १०-१२ जागांवर निवडणूक लढवण्याची संधी दिली पाहिजे, असे म्हटले होते. विदर्भात आरपीआय तीन ते चार जागांची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

रामदास आठवले म्हणाले की, आरपीआयची स्थापना १९५७ मध्ये झाली होती. त्यात आरपीआयचा ६७वा ३ ऑक्टोंबरला वर्धापन सोहळा सातारा येथे पार पडत आहे. उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडत आहे. हजारो कार्यकर्ते या सोहळ्याला येणार आहेत. आम्हाला आगामी विधानसभेत १२ जागा हव्या आहेत. तशी आम्ही मागणी केली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत माझी इच्छा होती लढायची पण लढलो नाही.जागा न घेता सर्वत्र प्रचार केला. मात्र विरोधकांनी संविधानाचा अपप्रचार करुन निवडणूक जिंकली. मात्र यावेळी ते चालणार नाही, असं ते म्हणाले आहेत.

ते पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी आणि शिवसेनेसारखी आमच्या पक्षाला दोन महामंडळ द्यावी. १२ विधान परिषद अमदारांमध्ये एक जागा आम्हाला द्या, कोल्हापूर, धारावी, मालाड, वाशिम, नांदेड या सारख्या जागा आम्ही विधानसभेसाठी मागितल्या आहेत. दरम्यान मुंबईत विधानसभेच्या एकूण ३६ जागा धारावी आणि मालाडमध्ये काँग्रेसच्या ताब्यात आहेत. गेल्या दोन निवडणुकांपासून शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात भाजपचे वर्चस्व आहे. अशा परिस्थितीत भाजप ही जागा आरपीआयला देते की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर, गेल्या तीन निवडणुकांपासून मालाड पश्चिमची जागा काँग्रेसने जिंकली आहे. अस्लम शेख १५ वर्षांपासून येथून आमदार आहेत. धारावीतही काँग्रेसचे वर्चस्व आहे. ही जागा २००४ पासून काँग्रेसकडे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: महाराष्ट्र गिळायचा प्रयत्न केला तर... विरोधकांना थेट इशारा, नागपुरात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

Akshay Shinde: कळवा रुग्णालयातून मृतदेह पाठवल्यापासून ते दफनविधीपर्यंत नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण प्रकरण...

"त्याने माझी फसवणूक केली", युट्युबर फ्लाईंग बिस्ट म्हणजेच गौरव तनेजाच्या पत्नीचा कथित व्हिडीओ व्हायरल, "माझ्या मुलांची आई..."

Steve Smith पुन्हा झाला वनडे कर्णधार, पण मिचेल मार्शने का घेतली माघार? जाणून घ्या कारण

Latest Maharashtra News Live Updates: ...तर तुम्ही अहमदशाह अब्दाली आहात, ठाकरेंचा शाहांवर घणाघात

SCROLL FOR NEXT