Assembly Elections 2024 esakal
महाराष्ट्र बातम्या

Assembly Elections 2024: भाजप खरंच विधानसभा स्वबळावर लढणार? अजित पवारांना दूर ठेवण्यासाठी सर्व्हे? अधिकृत माहिती वाचा

Sandip Kapde

लोकसभा निवडणूक २०२४ नंतर महाराष्ट्रात राजकीय उलथा-पालथ झाली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय भूकंप होणार असल्याची देखील राजकीय वर्तुळात रंगली आहे. एकनाथ शिंदे-अजित पवार सोबत असताना देखील राज्यात महायुतीला यश मिळाले नाही. त्यामुळे भाजप आता पराभवाचे विश्लेषण करत आहे. भाजप विधानसभा स्वबळावर लढणार अशी देखील चर्चा आहे.

मित्रपक्ष सोबत असताना देखील मिळालेल्या अपयशानंतर भाजप पक्षांतर्गत एक सर्वे करत असल्याची माहिती आहे. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा सर्वाधिक आहेत. उत्तर प्रदेशात ८० तर महाराष्ट्रात ४८ जागा आहेत. महाराष्ट्रात भाजपला फक्त ९ जागांवर विजय मिळाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रात अजित पवार यांना भाजपने सोबत घेतल्यामुळे नाराजी व्यक्त केली. बहुमत असताना अजित पवार यांना सोबत का घेतले, असा सवाल देखील मुखपत्रात उपस्थित करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर भाजप अंतर्गत सर्वे करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजप विधानसभा स्वबळावर लढणार का?, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्यात विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे सर्व पक्ष रणनीती बनवण्यात व्यस्त आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने २८८ विधानसभांमधील संपर्कप्रमुखांची बैठक घेतली. आता भाजपने विधानसभांचे सर्वेक्षण सुरु केले आहे. आतापर्यंत भाजपने अजित पवार यांना सोडण्याचा कोणताही निर्णय घेतला नाही. पण भाजप सध्याची परिस्थिती लक्षात घेता स्वबळावर निवडणूक लढवणार का, याचा अंदाज घेत आहे. इतर १८२ विधानसभा मतदारसंघातही भाजप सर्वेक्षण करणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता आहे.

अधिकृत माहिती काय?

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी युती करून भाजपची कामगिरी कशी असेल, राष्ट्रवादीसोबतची आघाडी कायम राहायची की नाही, असे प्रश्न सर्वेक्षणात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र भाजपचे प्रदेश सह मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांनी ही चर्चा फेटाळली आहे. ह्या विरोधकांनी पेरलेल्या बातम्या असल्याचे अजित चव्हाण म्हणाले.

आज पक्षांच्या वरिष्ठांट्या बैठका झाल्या देवेंद्र फडणवीस देखील होती. असा कुठलाही विचार भाजपच्या मनात नाही. महायुती म्हणून आम्ही विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेस आणि सर्व विरोधी पक्षांमध्ये विस्तव जात नाही आहे. बातम्या सोडायची मर्यादा असते. विरोधकांनी बातम्या पेरायच्या आणि आम्ही त्याला उत्तर देत फिरायचं हे अजिबात चालणार नाही, असे अजित चव्हाण यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.

भाजपचा वोट शेअर वाढला

विरोधकांकडून अशा बातम्या सोडण्याचे काम होते. त्यांचे ते कामच आहे. मात्र असं काही नाही. सुनेत्रा पवार बिनविरोध निवडून गेल्या राज्यसभेवर, त्या गेल्या असत्या का? राज्यसभेवर खासदार म्हणजे मोठी गोष्ट आहे, असे देखील चव्हाण म्हणाले.

अजित चव्हाण म्हणाले,  सध्या राज्यात भाजपचा वोट शेअर वाढला आहे. ज्याला डेस्टींगशन मिळतं त्याला फर्स्ट क्लासपेक्षा जरा जास्त मार्क मिळाले आणि नापास होणाऱ्या माणसाला ४१ टक्के मिळाले त्याचा ते आनंद व्यक्त करायत, ज्याची त्याची पाहण्याची दृष्टी असते. आम्ही थोडेसे कमी झालो तरी आत्मपरिक्षण करतो. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT