गुजरातला पुढे नेऊन महाराष्ट्राला खड्यात घालण्याचे काम महायुती सरकार करत आहे. महाराष्ट्राच्या मागे असलेला गुजरात हा महायुती सरकारच्या काळात पुढे जात आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी विधी मंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी केला.
विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभा सदस्य संजय शिरसाट, कालिदास कोळंबकर, अमिन पटेल, डॉ.किरण लहामटे, समाधान आवताडे यांची विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा केली.
पोलीस भरती संदर्भात विद्यार्थी मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे असा मुद्दा अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विद्यार्थ्यांची सोय केली आहे. मात्र कुठे गैरसोय असेल त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.
देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ती योगायोगाने झालेली भेट असल्याचे ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर टीका केली.
उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल झाले असून ते विधानपरिषदेत कोणते प्रश्न मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये आज विधानभवनात चर्चा झाली. दोघेही लिफ्टमध्ये चर्चा करताना दिसले.
देशाचा आणि राज्याचा जीडीपी सारखाच राहण्याची शक्यता आहे. ७.६ टक्के दराने अर्थव्यवस्था राहण्याची शक्यता असून कृषी क्षेत्रात १.९ टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे.
राज्यातील पिकांच्या उत्पादनात १.५ टक्क्यांची घट अपेक्षित आहे. तसेच उद्योग क्षेत्र ७.६ तर सेवा क्षेत्रात ८.८ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे.
राज्याच्या उत्पन्नात १०.९ टक्के वाढ अपेक्षित
दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र राज्य ६ व्या क्रमांकावर
दरडोई पहिल्या क्रमांकावर तेलंगणा राज्य
धनगर समाजाच्या मागण्यांसाठी विधीमंडळात बैठक होणार आहे.चौंडी येथील उपोषणकर्त्यांसोबत सरकार चर्चा करणार असून ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी बोलावली तातडीची बैठक बोलावली.
आज दुपारी अतुल सावेंच्या दालनात दुपारी २ वाजता बैठकआहे.
ओबीसी मंत्र्यांसह ग्रामविकास मंत्री व सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राहणार उपस्थित
धनगर आरक्षणासाठी लढणाऱ्या यशवंत सेनेच्या प्रतिनिधींना चर्चेचे निमंत्रण
राजू पारवे
निलेश लंके
प्रणती शिंदे
बळवंत वानखेडे
प्रतिभा धानोरकर
संदीपान भुमरे
रविंद्र वायकर
वर्षा गायकवाड
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना चॉकलेट देखील दिले.
विधानभवनाच्या अधिवेशनासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, विजय वड्डेटीवार हे देखील उपस्थित होते.
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले आहेत. शेतकरी प्रश्नावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. विधानसभा परिसरामध्ये विरोधक आंदोलन करत असून जोरदार घोषणाबाजी करत आहेत.
Maharashtra Assembly Monsoon Session LIVE Day 1 Updates in Marathi : आजपासून विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. विरोधक कोणत्या मुद्द्यावरून राज्य सरकारला घेरणार हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. आजच्या अधिवेशनात कोणते मुद्दे गाजणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.