eknath shinde Sakal
महाराष्ट्र बातम्या

देशानं या घटनेची नोंद घेतली; बंडावर मुख्यमंत्री शिंदे स्पष्टच बोलले!

विधिमंडळातील पहिली लढाई भाजपने जिंकली आहे - मुख्यमंत्री शिंदे

सकाळ डिजिटल टीम

राज्याच्या विधानसभा अध्यक्ष पदाची गौरवशाली परंपरा आहे

नव्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केलं आहे राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधानसभेचे सर्वात तरुण अध्यक्ष आहेत, असं म्हणत त्यांनी कौतुक केलं आहे. राज्याच्या विधानसभा अध्यक्ष पदाची गौरवशाली परंपरा असून पारदर्शक पद्धतीने आम्हाला राज्याचा कारभार चालवणार आहोत. आतापर्यंत अध्यक्षांनी पदाची प्रतिष्ठा जपली आहे, आताही ती जपली जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. आज मुख्यमंत्री शिंदे यांनी विधिमंडळांत पहिलंच भाषण केलं आहे. (maharashtra politics)

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, विधिमंडळातील पहिली लढाई भाजपने जिंकली आहे. सत्तेतून पायउतार होत आम्ही हे पाऊल उचलले आहे. राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार स्थापन झाले असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. विरोधकांवर टोलेबाजी करत मुख्यमंत्री म्हणाले, एकीकडे राज्यातले मोठे नेते तर दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा सैनिक होता, मात्र असे असूनही आमचा विजय झाला आहे. सध्या सत्तेतील नेते पायउतार झाले असून या घटनेची देशानं नोंद घेतली आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

पुढे ते म्हणाले, कोणत्याही आमदारावर जबरदस्ती झालेली नाही. आमदारांना अनेक प्रलोभन दाखवली पण आम्ही 50 जण एकत्र आलो. या आमदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला. भाजपाने मनाचा मोठेपणा दाखवून मुख्यमंत्री करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. राज्यात शिवसेना भाजपच्या सरकार स्थापन झाले असल्याचेही ते म्हणाले आहेत. त्यामुळं बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जात सरकार चालवणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwa: केजरीवालांना मोठा धक्का! दिल्ली सरकारच्या मंत्र्याने दिला राजीनामा; भाजपचं नाव घेत पक्षावर आरोप

बापाच्या जिवावर कॉन्‍ट्रॅक्‍टर झालेल्या नारळफोड्याने माझ्यासमोर उभं राहून दाखवावं; आमदार गोरेंचा कोणाला इशारा?

बाप'माणूस! सरकारी रुग्णालयातील अग्निकांडात याकूबने परक्यांच्या बाळांना वाचवले, मात्र आपल्या जुळ्या मुली गमावल्या...

Chh. Sambhajinagar Crime : नऊ तोळे सोने मोडले दुसऱ्याच्या नावाने, यशस्विनी पतसंस्थेच्या घोटाळ्याची न्यायालयात माहिती

'Rishabh Pant ला हॉस्पिटलमध्ये पाहिलं तेव्हा वाटलं परत क्रिकेट...', रवी शास्त्रींनी सांगितली आठवण

SCROLL FOR NEXT