Vidhansabha 
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी : अखेर भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन मागे

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: गेल्या अनेक महिन्यांपासून राज्याच्या राजकारणामध्ये अत्यंत चर्चेचा असा ठरलेला विषय म्हणजे भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन होय. वादग्रस्त ठरलेल्या भाजपा 12 आमदारांचं निलंबन अखेर मागे घेण्यात आलं आहे. हिवाळी अधिवेशनात देखील यासंदर्भात मोठा गदारोळ झाल्याचं बघायला मिळालं होतं. अखेर आता या आमदारांना दिलासा मिळाला आहे. (Maharashtra Assembly )

यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं देखील यासंदर्भात निलंबन कायदेशीर नसल्याचा निर्वाळा दिला होता. त्यानंतर आता हे निलंबन मागे घेण्यासंदर्भात राज्य सरकारवर दबाव वाढला होता. त्यामुळे आज अखेर हे निलंबन मागे घेण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांचा मुंबईचा दौरा होत आहे. त्यांचा हा दौराच या भाजपच्या 12 निलंबित आमदारांसाठी लाभदायी ठरला आहे, असं म्हणायला हरकत नाही. कारण या आमदारांचे निलंबन मागे घेण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात राष्ट्रपतींकडे नाराजी व्यक्त करण्यासाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, उपसभापती नीलम गोऱ्हे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे राष्ट्रपतींना भेटले होते.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय विधीमंडळाच्या अधिकारात हस्तक्षेप करणारा असल्याची प्रतिक्रिया या तिघांनी राष्ट्रपतींकडे व्यक्त केली होती. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना रामराजे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवत आम्ही हे निलंबन मागे घेतल्याची घोषणा केली आहे. पण न्यायालयाने विधिमंडळ कामकाजात हस्तक्षेप करणे योग्य आहे का याबाबत आम्ही राष्ट्रपती यांच्याकडे विचारणा केली आहे. राष्ट्रपती यांनी तपासून योग्य निर्णय घेऊ असे आश्वासन दिलंय. आम्ही संसदेच्या अध्यक्षांना ही पत्र लिहून कळवणार आहोत तसेच आमचे अधिकार कमी झाले आहेत का हे घटनात्मक खंठपीठाकडून स्पष्ट करावे, यासाठी हे पत्र दिले आहे. 12 आमदारांचा प्रश्न हा केवळ महाराष्ट्रा पुरता नाही तर देशासाठी आहे. एका सभागृहासाठी हा विषय राहिला नाही, असे रामराजे यांनी स्पष्ट केलंय.

भाजपचे १२ आमदार कोण?

भाजपच्या या 12 आमदारांमध्ये आशीष शेलार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, जयकुमार रावल, संजय कुटे, अभिमन्यू पवार, हरिश पिंपळे, राम सातपुते, पराग अळवणी, नारायण कुचे, कीर्तिकुमार बागडिया आणि योगेश सागर यांचा समावेश आहे.

नेमकं प्रकरण काय?

अधिवेशनामध्ये विधानसभा सभागृहात इतर मागासवर्गीय आरक्षणाच्या ठरावावर चर्चा सुरू होती. त्यावेळी भाजपच्या सदस्यांनी सभागृहात जोरदार गोंधळ घातला होता. तसेच यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या समोरील राजदंड उचलला आणि माइक खेचण्याचाही प्रयत्न केला होता. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना विधानसभाध्यक्षांच्या दालनात धक्काबुक्की करण्यात आली, अपशब्दही वापरले गेले. त्यांच्या या या गैरवर्तनाच्या कारणांवरून भाजपच्या १२ आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले होते. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंचा फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दक्षिण कराडमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT