Maharashtra assembly election 2024 Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते विधानसभा निवडणूक; मतदान अन् निकालाची संभाव्य तारीख समोर

आशुतोष मसगौंडे

मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वातील चौदा जणांचे पथक आज रात्री मुंबईत दाखल झाले आहे. हे पथक पुढील शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस केंद्रीय पथक राज्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेणार असून महाराष्ट्रात १५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान मतदान आणि २० नोव्हेंबरपर्यंत निकाल असा कार्यक्रम असेल, अशी शक्यता निवडणूक कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

आयोगाचे अधिकारी उद्या (ता. २७) सकाळी १० वाजता विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करणार आहेत. त्यानंतर दुपारी एक वाजता राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी व नोडल ऑफिसर यांची बैठक होणार असून दुपारी तीन वाजता गुप्तचर व विविध अंमलबजावणी संस्थांच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली जाईल. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता राज्याचे मुख्य सचिव, राज्याचे पोलिस महानिरीक्षक, प्रशासकीय विभागाचे विविध सचिव आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतील.

शनिवारी (ता. २९) केंद्रीय निवडणूक पथकाची राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि सर्व जिल्ह्यातील पोलिस आयुक्त, पोलिस अधिक्षक यांच्यासोबत बैठक होईल. प्रशासनाची प्रशासकीय तयारी, पोलिस अधिकाऱ्यांकडून कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडून माहिती, आढावा घेतल्यानंतर आयोगाचे पथकाची पत्रकार परिषद होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deepak Kesarkar : राजकोट किल्ल्याजवळ नव्याने उभारण्यात येणार 100 कोटींची 'शिवसृष्टी'; काय असणार वैशिष्ट्ये?

Pune Court To Swargate Metro Station: दीवानी न्यायालय मेट्रो स्टेशनवर राडा! भुयारी मार्ग सुरू करण्यासाठी महाविकास आघाडी आक्रमक

BB Marathi 5: घरात आलेल्या आईने निक्कीला सांगितलं अरबाजचं ते सत्य; धक्का बसलेल्या निक्कीने थेट...

IND vs BAN 2nd Test : कानपूर कसोटीत सुरक्षारक्षक म्हणून बोलावले Langurs; ऐकावं तर नवलंच, का केलाय हा जुगाड?

Sugar Symptoms In Men's: पुरुषांच्या शरीरात शुगर वाढल्यास दिसतात हे 3 वेगवेगळी लक्षणे, वेळीच घ्या डॉक्टरांचा सल्ला

SCROLL FOR NEXT