आजपासून राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूरमध्ये सुरुवात होत आहे. आज अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांना अनेक मुद्यांवरून घेरण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या अवकाळी पाऊस, पीकविमा, मराठा आणि धनगर यांच्या आरक्षणाचा मुद्दा यासारख्या विषयावरून विरोधक सरकारमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)
सत्ताधारी विरोधकांच्या आरोप-प्रत्यारोपांना काय उत्तर देणार? त्याचबरोबर या अधिवेशनामध्ये कोणकोणते मोठे निर्णय होणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरुन जुंपण्याची शक्यता आहे.
मराठा आरक्षण, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात समोर आलेली ड्रग्ज प्रकरणे, आरोग्य विभागावर विरोधकांनी केलेले घोटाळ्याचे आरोप या सर्व विषयांवर अधिवेशनात (Winter Assembly Session 2023) चर्चा होण्याची शक्यता आहे. (Hiwali Adhiveshan 2023)
त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकार काही घोषणा करणार का? आणि मराठा आरक्षणासंदर्भात सरकार काही निर्णय घेणार का? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला(काल) सरकारच्यावतीने चहापाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. (Maharashtra Assembly Winter Session 2023)
आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी या वेळी दिली. "आमच्या सरकारने मागील सरकारप्रमाणे कुणावर खोटे गुन्हे दाखल केले नाहीत. गुन्हे लपवून कातडी वाचविणारेही आमचे सरकार नाही," असेही मुख्यमंत्री शिदि विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.