mahanirmiti recruitment Ajit Pawar demand domicile certificate mandatory for all to Devendra fadanvis  Sakal media
महाराष्ट्र बातम्या

Winter Session: मुख्यमंत्र्यांसह शिंदे गट विरोधकांकडून टार्गेट? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं!

विरोधकांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज्याचं हिवाळी अधिवेशन गैरव्यवहारांच्या आरोपांवरुन चांगलंच तापलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे मंत्री सध्या विरोधकांच्या रडारवर आहेत. त्यांना टार्गेट करत असल्याच्या चर्चांवर आता अजित पवारांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे.

काय आहे प्रकरण?

हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह त्यांच्या मंत्र्यांवर आरोपाचं सत्र सुरू आहे. आधी मुख्यमंत्र्यांचा NIT जमीन घोटाळा समोर आला. त्यानंतर अब्दुल सत्तारांवर गायरान जमीन आणि सिल्लोड कृषी महोत्सव या संदर्भाने आरोप झाले. संजय राठोड यांचा पण जमिनीचा वाद समोर आला तर मंत्री उदय सामंत यांनी दारूच्या दुकानाला नियमबाह्य परवानगी दिल्याचाही आरोप झाला. मंत्री दादा भुसे एका तरुणाला मारहाण व शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज ट्विट केला आहे.

त्यामुळे आता विरोधकांनी शिंदे सरकारला चांगलंच धारेवर धरल आहे. याबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले, "ज्यांची माहिती मिळेल ते टार्गेट होणारच. सिल्लोड महोत्सवाप्रकरणी उपमुख्यमंत्र्यांनी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करू असं सांगितलं आहे. सत्तेचा गैरवापर करून कृषी विभागाला वेठीस धरून भ्रष्टाचार केला याचे पुरावे आले आहेत त्यामुळे आम्ही राजीनामा मागितला आहे"

तर उदय सामंत यांच्यावरच्या आरोपाबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले, "काही मंत्र्याबाबत माहिती आलेली आहे.पूर्ण पेपर नाहीयेत. पण शिंदे गटाच्या मंत्र्यांना टार्गेट केले जात असे नाही. जे पुरावे येतील त्यानुसार टार्गेट केलं जातं आहे. कुणाला जाणीवपूर्वक टार्गेट केले जात नाही."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT