Uddhav Thackrey Esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackrey: 'घरात बसून मुलाखती झोडण्यापेक्षा हिंमत असेल, तर समोर या...', ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपचा हल्लाबोल

उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपचा हल्लाबोल

अंकिता खाणे (Ankita Khane)

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दैनिक ‘सामना’साठी मुलाखत घेतली आहे. त्यांच्या मुलाखतीचा आज दुसरा भाग आहे. या मुलाखतीवेळी उद्धव ठाकरेंनी आपली रोखठोक मतं मांडताना दिसून आले. यावेळी त्यांनी विरोधकांच्या बैठकीवर, महाविकास आघाडी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि सद्याची राजकीय परिस्थीती या संपुर्ण घडामोडीवर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी भाजपला लक्ष केलं आहे.

दरम्यान उध्दव ठाकरे यांच्या या टिकेवर आता भाजपाने देखील प्रत्युत्तर दिलं आहे. तर 'स्वत:च्या नाकर्तेपणाला भावनांची झालर लावणाऱ्या उद्धव ठाकरेंनी मुलाखतीत व्हिक्टिम कार्ड खेळलं', अशा शब्दांत भाजपने उध्दव ठाकरे यांच्यावर टिका केली आहे. यासंबधीचा एक व्हिडीओ भाजपने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. "घरात बसून टोमणे कोणालाही मारता येतात. हिंमतवान लोक समोरासमोर येऊन चर्चा करतात" असं म्हणत एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. यामध्ये उध्दव ठाकरे यांनी मुलाखतीत केलेल्या टिकेवर उत्तर देण्यात आले आहे.

"घरात बसून मुख्यमंत्रीपद सांभाळणाऱ्या नव्हे, तर मुख्यमंत्रीपद उपभोगणाऱ्या नेत्याकडून दुसरी कोणती अपेक्षा करणार?" असा सवाल भाजपने व्हिडीओमध्ये केला आहे. त्याचबरोबर "घरात बसून मुलाखती झोडण्यापेक्षा हिंमत असेल, तर समोर या. चर्चा करा आणि मुंबईकरांच्या मनातील प्रश्नांची उत्तर द्या. असं आव्हान भाजपने ठाकरेंना दिलं आहे.

काय म्हंटलं आहे व्हिडीओमध्ये?

"उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी नुकतीच स्वत:च्याच पॉडकास्ट चॅनेलला मुलाखत दिली. तेही स्वत:ला विश्वगुरू मानणाऱ्या संजय राऊत यांना. हे म्हणजे माझाच बॉल, माझीच बॅट आणि माझेच मैदान असं आहे. बॉल टाकणारा भिडूही माझाच, म्हणजे आऊट होण्याचा सवालच नाही."

"घरात बसून मुख्यमंत्रीपद सांभाळणाऱ्या नव्हे, तर मुख्यमंत्रीपद उपभोगणाऱ्या नेत्याकडून दुसरी कोणती अपेक्षा करणार? स्वत:च्या नाकर्तेपणाला भावनांची झालर लावणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत व्हिक्टिम कार्ड खेळलं. पण, उद्धव ठाकरे यांनी जनतेला मुर्ख बनवण्याचा प्रयत्न करू नये. कारण, जनतेच्या मनातही अनेक प्रश्न सतावत आहेत. सत्तेसाठी तुम्ही बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वाशी प्रतारणा केली, तेव्हाच जनतेचा तुमच्यावरील विश्वास संपला."

"आताही तुम्ही राहुल गांधींचे गोडवे गात आहेत. हे तेच राहुल गांधी आहेत, ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर शाब्दिक हल्ले केले. त्यांचा आणि हिंदुत्वाचा अपमान करणारे, आता तुम्हाला गोड वाटू लागले आहेत. स्वातंत्र्यानंतर यांच्या सत्तापिपासू पिढ्यांनी जनतेची प्रगती आणि विकास शोषून घेतला. तीच मंडळी तुम्हाला देशभक्त वाटू लागली आहेत. सोनिया गांधींना परदेशी म्हणून कायम हिणावलं, त्या तुम्हाला जवळच्या वाटू लागल्या आहेत. उद्धव ठाकरे इतके सत्तांध झालेत की, महाराष्ट्रातील जनतेचा कौल डावलला आणि आजही डावलत आहेत. स्वत:च्या वडिलांचे विचार, संस्कार, भाजपाशी मित्रत्वाचे नाते उद्धव ठाकरेंनी डावलले. आणि मुख्यमंत्रीपद भोगताना जनतेचा विश्वासही तोडला."

"उद्धव ठाकरेंनी घरात बसून मुलाखती झोडण्यापेक्षा हिंमत असेल, तर समोर या. चर्चा करा आणि मुंबईकरांच्या मनातील प्रश्नांची उत्तर द्या. अडीच वर्षांच्या कार्यकाळात विकास कामे का थांबवली? त्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तुम्ही करणार का? मुंबईला काय घातक आहे? मुंबई महापालिका निवडणुका कोण न्यायालयात गेल्याने रखडल्या आहेत? मुंबईला कोणी किती वर्षे लुटलं? मुंबईतून काय बाहेर गेलं आणि काय आलं? क्रिकटचे सामने मुंबई बाहेर खरंच जाणार का? मुंबईकरांच्या अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावी लागणार आहे. बातोसो सिर्फ वक्त गुजरता है, काम करने के लिए बाहर निकलना जरुरी है" असं म्हणत भाजपाने उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: ठाण्यात पोस्टल मतमोजणी सुरु; एकनाथ शिंदे आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वडाळ्यातून भाजपचे कालिदास कोळमकर ५६५६ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT