devendra fadnavis 
महाराष्ट्र बातम्या

BJP Assembly Seat: इतक्या जागांपेक्षा कमी जागा लढायच्याच नाहीत; भाजपची ठाम भूमिका, दिल्लीला कळवलं?

Maharashtra bjp leader Assembly seats Demand: ऑक्टोंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका लागू शकतात. त्या दृष्टीने भाजप नेत्यांनी दिल्लीच्या प्रमुख नेत्यांकडे असा आग्रह धरला आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. विधानसभेमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. लोकसभेमध्ये भाजपला चांगले यश मिळाले नव्हते. त्यामुळे भाजपने विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप नेत्यांची किमान १६० जागांवर लढण्याची इच्छा आहे.

भाजपच्या राज्यातील नेत्यांनी १६०-१७० जागांपेक्षा कमी जागा लढवू नये असं दिल्लीच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. १६० पेक्षा कमी जागा लढवायच्याच नाहीत यावर भाजपचे स्थानिक नेते ठाम आहेत. ऑक्टोंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका लागू शकतात. त्या दृष्टीने भाजप नेत्यांनी दिल्लीच्या प्रमुख नेत्यांकडे १६० तरी जागा लढून असा आग्रह धरला आहे.

महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. भाजपने एकट्याने १६० जागा लढण्याचं ठरवल्यास, याबाबत शिंदे आणि अजित पवार गटामध्ये नाराजी पाहायला मिळू शकते. कारण त्यांच्या वाट्याला फक्त प्रत्येकी ६० ते ७० जागा येऊ शकतात. इतक्या कमी जागा घेण्यास दोन्ही गट तयार नसल्याची माहिती आहे.

शिंदे गटाने १०० जागा लढण्याची तयारी दाखवली आहे. अजित पवार गटाची देखील अशीच तयारी आहे. त्यामुळे भाजपला खरंच १६० जागा लढवता येतील का हा प्रश्न आहे. भाजपने मागील विधानसभा निवडणुकीमध्ये १०५ जागा जिंकल्या होत्या. भाजप मोठा भाऊ आहे. पण, लोकसभेतील खराब कामगिरीमुळे भाजप बॅकफूटवर गेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीमध्ये शिंदे गटाचे महत्त्व वाढलं आहे. भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी ते मान्य केलेलं असून शिंदेंना विधानसभेमध्ये झुकते माप दिली दिले जाऊ शकते. लोकसभेमध्ये शिंदे गटाने १५ पैकी ७ जागा जिंकल्या आहेत. त्यांचा स्ट्राईट रेट महायुतीमध्ये सर्वाधिक आहे. त्यामुळे शिंदेंना विधानसभेमध्ये देखील चांगल्या जागा देऊन भाजप कमीपणा घेऊ शकतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT