Baramati Mission  esakal
महाराष्ट्र बातम्या

याआधी अनेक गड उद्ध्वस्त झालेत; चंद्रशेखर बावनकुळेंचा पवारांना इशारा

भाजपच्या 'मिशन बारामती'ला आजपासून सुरुवात झाली आहे. भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे आज बारामती दौऱ्यावर आहेत.

धनश्री ओतारी

याआधी अनेक गड उद्धवस्त झालेत. असे सूचक व्यक्तव्य करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादचे सर्वेसर्वा शरद पवार यांना इशारा दिला आहे. तसेच राष्ट्रवादीला कंटाळून अनेकजण भाजपमध्ये येतील. असा दावाही बावनकुळे यांनी केला आहे.(Maharashtra Bjp President Chandrashekhar Bawankule Baramati Tour Over Loksabha Election 2024)

भाजपच्या 'मिशन बारामती'ला आजपासून सुरुवात झाली आहे. भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे आज बारामती दौऱ्यावर आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पवार कुटुंबियांच्या प्रचाराचा नारळ ज्या कन्हेरीच्या हनुमान मंदिरात फुटतो, त्याच मंदिरातून आज चंद्रशेखर बावनकुळे दौऱ्याची सुरूवात करणार आहेत.

काय म्हणाले बावनकुळे?

माविआच्या अडीच वर्षातील सामान्यांसाठीच्या योजनांचे ऑडिट होणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी यावेळी दिली. शिंदे गट आणि भाजप युतीत निवडणुका लढवणार. राज्यात भाजपची ताकद वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. २०२४ मध्ये बारामतीत भाजपच विजयी होणार. २०० आमदार आणण्याच लक्ष्य. असा दावा ठोकत जनता आम्हाला कौल देई याची खात्री असल्याचे बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केली.

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपने आतापासूनच सुरु केली आहे. प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून बावनकुळे यांचा पुणे जिल्ह्यात पहिला दौरा आहे, तोही थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कर्मभूमी बारामतीत. भाजपने लोकसभा निवडणूक २०२४ साठी 'मिशन ४५' आखलं आहे. यासंदर्भात बोलताना बावनकुळे यांनी राज्यात ४५ प्लस लोकसभा जिंकण्याचा भाजपचं टार्गेट असल्याचे म्हटलं आहे. २०० आमदार आणण्याच लक्ष्य असल्याचेीही बावनकुळे यांनी सांगितलं आहे.

तसेच, याआधी अनेक गड उद्धवस्त झालेत. असे सूचक व्यक्तव्य करत पवारांच्याच बालेकिल्ल्यात येत बावनकुळे यांनी शरद पवारांना इशारा दिला.

येत्या २२ ते २४ सप्टेंबरदरम्यान देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देखील बारामती दौऱ्यावर येत आहे. त्या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी आज बावनकुळे विशेष बैठक घेणार आहेत. सीतारामन यांच्या दौऱ्यासंदर्भात बोलताना सीतारामन बारामतीत ५ ते ६ वेळा येणार असल्याचे म्हटले आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार गेली ५५ वर्ष राजकारणात आहेत. गेल्या ५५ वर्षात पवार एकही निवडणूक हरलेले नाहीत. तर भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरु केली आहे. त्यासाठी विविध केंद्रीय मंत्र्यांवर तथा भाजप नेत्यांवर देशातल्या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्याच नियोजनातून बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर देण्यात आलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT