नीट पेपरफुटी प्रकरणी दोन्ही सभागृहात चर्चा व्हावी, यासाठी इंडिया आघाडीची दोन्ही सभागृहाच्या अध्यक्षांना पत्र लिहिणार आहे. याबाबतचा निर्णय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
झारखंडमधल्या रांची विशेष पीएमएलए न्यायालयानं माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ केली आहे. जमीन घोटाळ्यातून मनी लाँड्रिंग केल्याच्या आरोपाखाली सोरेन यांना रांचीच्या बिरसा मुंडा सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आले आहे.
गडचिरोली पोलीस दलासमोर दोन जहाल महिला माओवाद्यांनी आज आत्मसमर्पण केले. महाराष्ट्र शासनाने आत्मसमर्पण केल्या 16 लाख रूपयाचे बक्षिस देण्याची घोषणा केली होती.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल सीबीआय मुख्यालयातून बाहेर पडल्या. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दररोज 30 मिनिटे भेटण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे.
दौंड : पुणे जिल्ह्यात किरकोळ कौंटुंबिक वादातून पत्नीला पट्ट्याने बेदम मारहाण केल्याप्रकरणी दौंड शहरात पोलिस नाईक पदावर कार्यरत सोमनाथ शिंदे याच्याविरूध्द मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्मार्ट मीटर सर्वसामान्यांसाठी बसवण्यात येणार नाही तर केवळ सरकारी कार्यालयांसाठीच असतील असा निर्णय सरकारनं घेतला आहे.
मुंबई शहराच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे आणि GPO आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस भागातील व्हिडिओ वृत्तसंस्था एएनआयने शेअर केले आहे.
नीट -युजी परीक्षा पेपर लीक प्रकरणी सीबीआयने मनीष प्रकाश आणि आशुतोष यांना पटणा येथून अटक केली आहे.
कुलाबा नरिमन पॉइंट सी-लिंकचा मार्गाचा प्रश्न सुटला; शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात मोठा निर्णय
समाजवादी पक्षाचे खासदार आणि सपा प्रमुख अखिलेश यादव म्हणाले, "जेव्हा सरकार दावा करते की भारत जगातील 5वी अर्थव्यवस्था आहे आणि भारत तिसरी अर्थव्यवस्था होईल, तर शेतकरी का नाराज आहेत? शेतकरी संकटात का आहे? आमचे शेतकरीही समृद्ध झालेत का, एवढी महागाई का?''
बीसीसीआयचे उपाध्यक्ष आणि काँग्रेस खासदार राजीव शुक्ला म्हणाले, "भारत आज उपांत्य फेरी खेळणार आहे. मला विश्वास आहे की आम्ही जिंकू, आम्ही फायनल देखील जिंकू आणि चॅम्पियन बनू. टीम इंडियाला शुभेच्छा."
उद्या राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. या अर्थसंकल्पानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा आहे.
मुंबईतल्या पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आगामी काळात सरकारकडून घोषणांचा पाऊस पडण्याची शक्यता.
मुंबईत शिवेसना आमदार आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली असून, या परिषदेत बोलताना उद्धव ठाकरेंनी महायुतीवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, २ वर्षांमध्ये सरकारने काय काम केले? हे सांगावे.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंची मुंबईत पत्रकार परिषद सुरू आहे. या परिषदेला उद्धव ठाकरेंची प्रमुख उपस्थिती आहे.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणात पेपर फुटीचा उल्लेख करण्यात आला आहे. पेपर फुटीच्या प्रकरणांची स्वतंत्र चौकशी होणार असल्याचे राष्ट्रपतींनी नमूद केलं. पेपर फुटीच्या प्रकरणांवर ठोस उपायांची गरज असून पेपर फुटीच्या विरोधात सरकारने कायदा बनवला आहे.
विधानभवनाच्या अधिवेशनासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, विजय वड्डेटीवार हे देखील उपस्थित होते.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन सुरु केले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांनी घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून त्यांना अभिवादन केले.
नीट परीक्षेचे लातूर कनेक्शन समोर आले आहे. लातूर पोलिसांना नीट प्रकरणात १४ अॅडमिट कार्ड आरोपींकडे आढळले आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील पाच दिवस कोकण किनारपट्टी भागात पावसाचा जोर राहणार आहे.
नीट परिक्षेचे पेपर फूटले. संपर्ण देशात असे प्रकार घडले मात्र यावर मोदी काहीच बोलत नाहीयेत असे संजय राऊत म्हणाले.
Ahmednagar Live Update : अहमदनगरच् शहरातील सारसनगर भागामध्ये चोर असल्याच्या संशयावरून एका परप्रांतीय युवकाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.
आप खासदार संजय सिंह यांचं निलंबन मागे घेण्यात आले आहे. राज्यसभा सचिवालयाने निलंबन मागे घेत असल्याचं परिपत्रक काढल आहे.
विधानपरिषद निवडणूकीनंतर आता राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीबाबत देखील सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महायुतीत राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. 12 आमदारांमध्ये भाजप स्वतःसाठी जास्त वाटा घेण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे.
Mumbai Local Latest Update: मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलच्या अपघातात अनेक प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. अपघातांचे हे सत्र असेच सुरू असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने आज रेल्वेच्या अकार्यक्षमतेवर बोट ठेवत प्रशासनाची चांगलीच खरडपट्टी काढली.
Mumbai Local News: उपनगरीय हार्बर मार्गावरील गाड्यांचा वेग वाढावा म्हणून मध्य रेल्वेने टिळकनगर ते पनवेलदरम्यान लोकलचा वेग ताशी ८० किलोमीटरवरून ९५ किलोमीटरपर्यंत वाढविला आहे. यामुळे सीएसएमटी ते पनवेलदरम्यान प्रवासाचा वेळ दोन ते तीन मिनिटांनी कमी झाला, मात्र मध्य रेल्वेने वेगापेक्षा हार्बर मार्गावरील लोकल सेवांच्या वक्तशीरपणाकडे लक्ष द्यावे, अशी विनंती प्रवासीवर्गातून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.